.
ताज्या घडामोडी Current Affairs

बंगलुरूमधली उद्याने


बंगलुरू महानगर, उद्यानांचे शहर म्हणूनच ओळखले जाते. या शहरात असलेली दोन प्रमुख उद्याने, कब्बन पार्क व लालबाग ही अतिशय प्रसिद्ध आहेत. विस्तीर्ण आवार, निरनिराळ्या प्रकारची भरपूर झाडे, फुलझाडे अतिशय नीटनेटका आराखडा यामुळे बंगलुरूला प्रवासीभेट देणार्‍या सर्वांच्या मनात एकदा तरी या उद्यानांना भेट देण्याचा प्लॅन ठरलेलाच असतो. स्थानिक लोकांच्यात सुद्धा, सकाळ संध्याकाळ जॉगिंग करणारी मंडळी, पक्षी निरिक्षक, व्यायामपटू व प्रेमी युगुले यांची निदान एक तरी उद्यान भेट त्यांच्या दैनिक कार्यक्रमात ठरलेलीच असते.

200 एकर एवढ्या मोठ्या आवारात पसरलेले लालबाग उद्यान अडीचशे वर्षे तरी जुने आहे. कब्बन पार्क सुद्धा शंभरहून आधिक वर्षांपूर्वी, तेंव्हाच्या इंग्रज व्यवस्थापनाने, बनवले होते. त्यामुळे या दोन्ही उद्यानात असंख्य जुने व भव्य वृक्ष आहेत. यांच्या घनदाट छायेखाली पिकनिक करणारी अनेक कुटुंबे या उद्यानांत नेहमीच दिसतात. या दोन्ही उद्यानांत जाण्यासाठी कोणतेही प्रवेशमूल्य आकारण्यात येत नाही. त्यामुळे खर्‍या अर्थाने ती सार्वजनिक उद्याने आहेत असे म्हटले तरी चालेल.

मागच्या वर्षीच्या 26/11 ला मुंबईत झालेल्या जीवघेण्या दहशतवादी हल्यांचा एक परिणाम म्हणून हे सगळे बदलणार आहे असे दिसते आहे. मागच्या काही वर्षांत दहशतवाद्यांनी गर्दीने भरलेले बाजार, धार्मिक स्थळे, हॉटेले या साख्या सार्वजनिक जागांना आपले लक्ष बनवले असल्यामुळे या सर्व ठिकाणी उंच उंच काटेरी तारांची कुंपणे व हत्यारधारक सुरक्षा सेवक सगळीकडे दिसू लागले आहेत. मुंबईतल्या मागच्या वर्षाच्या हल्ल्याच्या स्मृती लोकांच्या मनातून अजून पुसल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळेच बंगलुरु उद्यानांच्या व्यवस्थापनांना जास्त काळजीची गरज भासू लागली आहे यात काही नवल नाही. पण यामुळेच या उद्यानांच्या सार्वजनिक स्वरूपाचा आता बळी जाणार असे दिसते आहे.

या उद्यानांच्या व्यवस्थापनाने आता या उद्यानांत प्रवेश करण्यावर बरेच निर्बंध आणण्याचे ठरवले आहे. जॉगर्स, पक्षी निरिक्षक किंवा व्यायामपटू या सारख्या लोकांना ज्यांना पहाटे व सूर्यास्तानंतर या उद्यानांत नियमित प्रवेश हवा असतो त्यांना ओळखपत्रे देण्यात येणार आहेत व त्या साठी, काही शुल्क भरून, त्यांना अर्ज भरून देण्यास सांगण्यात आले आहे. दिवसातल्या इतर वेळी, ज्यांना प्रवेश हवा असेल, त्यांना तो काही शुल्क भरल्यावरच देण्यात येणार आहे.

बंगलुरुच्या सर्वसाधारण नागरिकांना मात्र उद्यानांचे हे प्रवेश शुल्क आपल्या हक्कांवर आलेले एक संकट वाटते आहे. बंगलुरू जॉगर्स असोसिएशनने या शुल्काला विरोध दाखवला आहे. त्यांच्या मताने ताज्या शुद्ध हवेत श्वासोश्वास करण्यासाठी पैसे भरायला लागावे ही मूलभूत हकांवर आलेली एक गदा आहे. तर काही पर्यावरणवादी गटांना, बंगलुरू शहर एक एलिट व पर्यावरणाची काळजी घेणारे शहर आहे असे दाखवण्याच्या हव्यासापायी सर्वसाधारण गरीब लोकांची या उद्यांनातून हकालपट्टी करण्याचा हा डाव आहे असे वाटते. बंगलुरूची बेघर मुले, वृद्ध, स्थलांतरीत कामगार यांना ही उद्याने म्हणजे एक आधार वाटतो. तसेच लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे कुठेच निवांत जागा न मिळणार्‍या बंगलुरूच्या प्रेमी युगुलांना ही उद्याने म्हणजे एक सुरक्षित जागा वाटते. या सर्व मंडळींना प्रवेश शुल्क भरणे न परवडणारे असल्याने त्यांना ही एक आपत्तीच वाटते आहे

उद्यान व्यवस्थापनाच्या मताने मात्र हे प्रवेश शुल्क ओळ्खपत्रे देण्यासाठी व सुरक्षा सेवकांचा खर्च भागवण्यापुरतेच असून त्यातून उत्पन्न काहीच मिळणार नसल्याने लोकांच्या तक्रारी अनाठायी आहेत असे वाटते. काही लोकांचे मत, हे प्रवेश शुल्क इतके कमी आहे की यातून हे खर्च सुद्धा भागणार नाहीत असे आहे.

एक गोष्ट मात्र नक्की की बंगलुरूमधल्या सार्वजनिक उद्यानांचे स्वरूप आता सार्वजनिक असे काहीच उरणार नाहीये.

24 डिसेंबर 2009

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

7 thoughts on “बंगलुरूमधली उद्याने

  1. प्रतिक्रियांना पोच द्यायला आवडत नाही का? कदाचित वेळ मिळत नसेल. पण तुमचा ब्लॉग छान आहे. म्हणून यावेसे वाटते वाचण्यासाठी. आजची पण पोस्ट छान आहे. फोटो सुरेख!! मी tag केला आहे. वाट पाहत आहे.

    Posted by anukshre | डिसेंबर 24, 2009, 5:03 pm
    • प्रतिक्रियेला पोच द्यायला कोणाला आवडणार नाही. परंतु अनेक वेळा जमत नाही. काही विशेष मुद्दा जर कोणी उपस्थित केलेला असला तर मी बहुदा लगेच उत्तर देतो. आपल्या प्रतिक्रियेकडे मी दुर्लक्ष केले आहे असा याचा अजिबात अर्थ नाही. आपला माझ्या ब्लॉगवरचा लोभ असाच कायम ठेवावा ही विनंति.

      Posted by chandrashekhara | डिसेंबर 24, 2009, 8:32 pm
  2. अनुजाबाई : या स्तंभातले सगळेच लेख वाचनीय असतात. आणि ‘प्रतिक्रियांची पोच’ या विषयावर ‘अक्षरधूळ’कर्ते काय म्हणतात याची मला कल्पना नाही; पण अशी पोच देण्याची अजिबात आवश्यकता नसते, असं माझं मत आहे. मूळ लेखविषयाशी संबंधित काही चर्चा प्रतिक्रियेद्‌वारा घडणार असेल तर ती गोष्ट वेगळी. त्यातही प्रतिक्रिया देणार्‍याला आपली प्रतिक्रिया नेहमीच महत्त्वाची वाटते, पण लेखकाला तशी ती वाटेल असं नाही. हे माझं मत (उर्फ़, नाक खुपसणे), बरं का.

    – डी एन

    Posted by Naniwadekar | डिसेंबर 24, 2009, 7:18 pm
  3. नमस्कार धनंजय नानिवडेकर उर्फ डी एन.
    माझे आणि चंद्रशेखर यांचे संभाषण आहे. कृपया याची आपण नोंद घ्यावी. आपण दुसऱ्यांच्या ब्लॉग वर का बरे बोलावे?? असो माझे ब्लॉग विश्वात
    बरेच काम सुरु आहे. मला त्यांच्याशी मैत्री हवी आहे. अर्थात त्यांच्या ब्लॉग विषयी. आपला हस्तक्षेप नसावा.

    Posted by anukshre | डिसेंबर 25, 2009, 3:02 सकाळी
    • अनुजाबाई : श्री चंद्रशेखर आठवले आपले निर्णय घ्यायला समर्थ आहेत. मी त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच नाही. ज़ाहीर संभाषणावर तिसर्‍यानी मत व्यक्त करू नये, ही तुमची अपेक्षा चूक आहे. उदा. आर डी बर्मन आणि ए आर रहमान यांपैकी सर्वश्रेष्ठ संगीतकार कोण, या ज़ाहीर चर्चेत एखाद्यानी : ‘पण तुम्हां विद्‌वानांनी मास्तर कृष्णरावांचं संगीत ऐकलं आहे का’ असा मुद्‌दा मांडल्यास तो चर्चेला धरून आहे. (काही ज़णांनी ते ऐकलंही असतं, आणि तरीही त्यांना बर्मन जास्त आवडतो !, पण हे भलतंच विषयांतर झालं.)

      प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देणारे मी पाहिले आहेत. तुम्हीही तसे करता. त्यात काही गैर नाही; पण उत्तर न देणं चुकीचं आहे असा सूर लावलेला मला बरेचदा ज़ाणवतो, आणि तसा आग्रह मला योग्य वाटत नाही. असे काही ब्लॉग्ज आहेत ज्यांवर मी अनेकदा पसंतीची पावती देऊन त्याची एकही पोच मिळालेली नाही. पोच मिळाली असती, तर आनंद होता. पण पोच न दिल्याबद्‌दल माझी तक्रार नाही. तो त्या लेखकांचा हक्क आहे. सध्याची प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देण्याची आणि अशा उत्तराची अपेक्षा करण्याची पद्‌धत रूढ होत चाललेली पाहून त्याबद्दलची दुसरी बाज़ू मला मांडावाशी वाटली.

      – डी एन

      Posted by Naniwadekar | डिसेंबर 25, 2009, 3:36 सकाळी
  4. नमस्कार श्री. चंद्रशेखर,
    आपण माझ्या ब्लॉग वर एक टेस्ट प्रतिक्रिया द्या. मला आपला मेल आयडी मिळेल. आपणाला माझ्या कडून मेल येईल. मी माझ्या कामाचा व
    आपल्या ब्लॉग संबंधी काय काम आहे त्याचा खुलासा करीन. किंवा माझ्या प्रतिक्रिये चा माझा मेल आयडी आपणाला पण मिळाला असेलच आपण
    माझ्या मेल वर संपर्क साधावा अशी विनंती. अधिक खुलासा मेल वर होईलच. आपल्या कडून सहकार्याची अपेक्षा आहे. कळवावेत.

    Posted by anukshre | डिसेंबर 25, 2009, 3:12 सकाळी
  5. tumcha blog kharach vachnyasarkha ahe ! ekdum uttam !! pan images var rollover kela ki je yete te kharech irritating ahe. User jenva images pahto tenvha to click karnyachi tyachi mansikta aste. ani tumhi jo “snapshot” vaprtay tyane kahich sadhya hot nahi. karan snapshot na vaprta hi user click karu shakto ani image pahu shakto.
    normally snapshot mi links var click kele ki tyan link che page dakhavnyasathi vaprtat. disnari image parat dakhavne mala tari yogya vatat nahi.takrari baddal kshmasv. pan khup disturb vyayla hot hote vachtana.Thnx

    Posted by harshal chavan | जानेवारी 5, 2010, 7:10 pm

यावर आपले मत नोंदवा

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 396 other subscribers
MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात