.
Health- आरोग्य

स्वच्छतागृहांचे राजदूत


सुलभ इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेचे नाव बहुतेक सगळ्यांनी ऐकलेले असेल. शहरांच्या गरीब वस्त्यांत व ग्रामीण भागात, स्वच्छतागृहांचा प्रसार व प्रचार कसा वाढेल याचा प्रयत्न ही संस्था करत असते. या संस्थेचे संस्थापक श्री. बिंदेश्वर पाठक यांना, अतिशय कमी खर्चाचे व पर्यावरणास हानी न पोचवणारे स्वच्छतागृह तयार केल्याबद्दल, या वर्षीचे स्टॉकहोम वॉटरबक्षिस नुकतेच मिळाले. श्री. पाठक यांनी हे कार्य जेंव्हा सुरू केले तेंव्हा स्वच्छतागृहांबद्दल साधे बोलणे सुद्धा हीनपणाचे लक्षण मानले जात असे. असे असताना सुद्धा श्री. पाठक यांनी आपले काम नेटानेच चालू ठेवले व ग्रामीण व गरीब शहरी स्त्रियांना मोठाच दिलासा मिळवून दिला. श्री पाठक यांना या कार्याबद्दल आदराने स्वच्छतागृहांचे राजदूतम्हणून संबोधले तरी चालण्यासारखे आहे इतकी त्यांची या कार्यामागे निष्ठा व तळमळ आहे.

भारतासारख्या देशात या प्रकारचे कार्य, एक सामाजिक चळवळ म्हणूनच चालवणे आवश्यक असले तरी ज्या देशाच्या नसानसातून फक्त व्यापारी रक्त वाहत आहे अशा अमेरिकेसारख्या देशात, जेंव्हा अशा प्रकारच्या कार्याची गरज भासू लागते तेंव्हा अशा स्वच्छतागृह राजदूतांची पगारी नेमणूकच करण्याशिवाय इलाज नाही हे लक्षात येते.

स्वच्छतागृहात वापर करण्याचे टॉयलेट पेपर बनवणार्‍या चारमिनया कंपनीने, नुकतीच न्यूयॉर्क शहराच्या मधवर्ती भागात असलेल्या टाईम्स स्क्वेअरया चौकाजवळ, नवीन स्वच्छतागृहे चालू केली आहेत. न्यूयॉर्कच्या या भागात, प्रवाशांची नेहमीच प्रचंड वर्दळ असते व सोईस्कर पडतील अशी स्वच्छतागृहे जवळपास नसल्याने त्यांची नेहमीच अडचण होते. ही गोष्ट लक्षात घेऊन ही स्वच्छतागृहे चालू करण्यात आली आहेत. सहा आठवड्यांपूर्वी चालू केलेल्या या स्वच्छतागृहांना किमान 5 लाख लोक तरी एका वर्षभरात भेट देतील अशी या कंपनीची अपेक्षा आहे.

toilettes

या स्वच्छतागृहांची पुरेशी माहिती लोकांना नसल्याने या स्वच्छतागृहांना पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाहीये असे वाटल्याने, या कंपनीने आता 5 जणांची भरभक्कम पगारावर, स्वच्छतागृह राजदूत म्हणून नेमणूक करावयाची ठरवले आहे. या राजदूतांचे कॉन्ट्रॅक्ट फक्त 6 आठवड्यांचे असणार असून व त्या साठी त्यांना 10000 यू.एस. डॉलर्स एवढा मोबदला ही कंपनी देणार आहे.

अमेरिकेत नोकर्‍यांची सध्या प्रचंड वानवा असल्याने शेकडो तरूणतरूणींनी या कामासाठी अर्ज केले आहेत. या राजदूतांचे काम, टाईम्स स्क्वेअरमधल्या गर्दीत मिसळून, लोकांना या टॉयलेट्सचे महत्व समजवून सांगणे हे रहाणार आहे. या शिवाय फेसबूक किंवा ट्विटर सारख्या वेब साइट्स वर जाऊन या राजदूतांनी स्वच्छतागृहांचे महत्व लोकांना पटवावे अशीही कंपनीची अपेक्षा आहे. कंपनीने संभाव्य उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले होते तेंव्हा काही उमेदवार पहाटे 4 वाजताच हजर झाले. एवढ्या लवकर का आलात म्हणून विचारणा केली असता माझे स्वच्छतागृहांशी किती जवळचे संबंध आहेत हे परिक्षकांना कळावे म्हणूम मी पहाटे आलोअसे मासलेवाईक उत्तर एका उमेदवाराने दिले. नोकरीसाठी आलेल्या उमेदवारात सध्या काम नसलेले नटनट्या, विद्यार्थी व धंदेवाईकही होते. शिक्षणासाठी फीची व धंद्यासाठी भांडवल उभे करण्यासाठी आपण हे काम करण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाखतीसाठी काही उमेदवार टॉयलेट पेपरचे ड्रेसेस घालून आले होते. “मी निवडला गेलो तर मी माझ्या टॉयलेटला चिकटून व त्याच्याशी एकनिष्ठ राहीनअसेही एका उमेदवाराने सांगितले.

ही नोकरी सहा आठवड्यांपुरती मर्यादित आहे. ‘चारमिन‘  या  कंपनीने या स्वच्छतागृहांसाठी 150 लोकांना, सहाय्यक म्हणून नोकरीवर ठेवलेलेच आहे. हे राजदूत या व्यतिरिक्त काम करणार आहेत. अमेरिकेत सध्या 10 टक्के लोक बेकारच आहेत. सहा आठवड्यांनंतर हे राजदूत परत बेकारच होणार आहेत. त्यांच्या या अभिनव अनुभवामुळे त्यांना भारतात सुलभ इंटरनॅशनलसारख्या कंपनीत कायम नोकरी नक्कीच मिळू शकेल यात शंकाच नाही.

9 नोव्हेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: