.
अनुभव Experiences

सर्वसाधारण माणूस व आर्थिक मंदी


गेले वर्षभर, सर्व प्रसार माध्यमांच्यातून, आपण जागतिक मंदीबद्दल सतत ऐकत आलो आहोत. या मंदीचा सर्व राष्ट्रांच्यावर कसा दुष्परिणाम झाला आहे, याबद्दल, मोठमोठे उद्योजक, अर्थशास्त्रज्ञ व राजकारणी आपल्याला वारंवार सांगताना दिसतात. विशेषत: प्रगत राष्ट्रांच्यात काम करणार्‍या अनेकांच्या या मंदीमुळे नोकर्‍या गेल्या आहेत. अनेक कंपन्यांची विक्री कमी झाली आहे. अमेरिकेतील काही बॅन्का बुडल्या आहेत. हे सगळे जरी माहिती असले तरी ही अर्थिक मंदी सगळ्यांसाठीच खरोखरच इतकी वाईट आहे का? असा प्रश्न मला पडला आहे. कोणत्याही नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच या घटनेलाही असल्या पाहिजेत असे मला तरी वाटते.

CB022158

आता वैयक्तिक माझ्यापुरते बोलायचे झाले तर मला तरी या जागतिक मंदीमुळे काहीही तोटा न होता फायदाच झाला आहे. मागच्या वर्षी पेट्रोलच्या किंमती चांगल्याच घसरल्या. आता आता पर्यंत वस्तूंच्या किंमती बर्‍यापैकी स्थिर होत्या. शेअरच्या किंमती खूप पडल्यामुळे काही चांगल्या कंपन्यांचे शेअर स्वस्तात खरेदी करण्याची सुसंधी चालून आली. मार्च एप्रिल महिन्यपर्यंत बॅन्कांनी ठेवीवरचे व्याज दर बरेच वाढवले होते. एकूणच कोणत्याही गोष्टीचा बाजारात साठा नाही असे न घडता सर्व गोष्टी हव्या तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत्या.

मलेशियामधल्या सिनोव्हेट(Synovate) या पाहणी करणार्‍या कंपनीने, नुकतीच एक जागतिक पाहणी याच बाबतीत केली. या कंपनीने 16 निरनिराळ्या मार्केट्स मधल्या तब्बल 11400 लोकांची मते लक्षात घेऊन ही पाहणी केली. या सर्वांना एकच प्रश्न विचारण्यात आला होता. जर तुम्हाला 1000 अमेरिकन डॉलर्स दिले तर तुम्ही ते कसे खर्च कराल? या पाहणीच्या निष्कर्षांप्रमाणे, असे लक्षात आले आहे की जगातल्या सर्व देशातल्या लोकांच्या पैशांच्या वापराबद्दलच्या प्रवृत्तीत, मोठा क्रांतीकारक बदल मागच्या एका वर्षात घडून आला आहे. 25% लोक या आर्थिक मंदीला एक इष्टापतीच मानतात. त्यांच्या मते या आर्थिक मंदीमुळे त्यांना पैशाचे व त्याची बचत करण्याचे महत्व आधिक चांगल्या रितीने कळू लागले आहे. मलेशियामधले तर 80 % लोक याच मताचे आहेत.

अमेरिकन लोक पैसे खर्च करण्याच्या बाबतीत अत्यंत उधळे म्हणून स्मजले जातात. पण आता 35% अमेरिकन आपण हे 1000 डॉलर कर्जफेडीसाठी वापरू असे म्हणतात तर 23% हे पैसे सरळ बॅन्केत ठेवू असे म्हणतात. 21% टक्के लोक आवश्यक गरजांसाठी हे पैसे खर्च करतील तर फक्त 7% अमेरिकन पैसे उधळण्यास तयार आहेत. जागतिक पातळीवर पैसे बॅन्केत ठेवणार्‍यांची टक्केवारी 28% आहे तर कर्ज फेडून टाकू असे म्हणणार्‍यांची टक्केवारी 17%

या पाहणीतले 58% लोक आपण पैसे पूर्वीसारखे कधीच खर्च करणार नाही असे म्हणतात तर 42% लोकांना आपली बचत वाढवण्याची इच्छा आहे. स्थावर मालमत्तेच्या किंमती जरी मागच्या वर्षी कोसळल्या असल्या तरी त्यातली गुंतवणूक कमी करण्याची फारशी कोणाची इच्छा दिसत नाही.

stock-markets

या पाहणीमधे भारतामधल्या तब्बल 1024 लोकांचा समावेश केलेला होता. या संस्थेचे भारतातले मुख्य मिस्टर मिक गार्डन यांच्या मते भारतातले लोक त्यांना न परवडणार्‍या गोष्टी कधीच खरेदी करत नाहीत. भारतीय कोणत्याही अनावश्यक गोष्टीची खरेदी त्यांच्या बचतीमधून सहसा करत नाहीत. अडचणीसाठी भारतीयांकडे नेहमीच बचत रक्कम असते. त्याला ते कधीच हात लावत नाहीत. या कारणामुळेच, बहुदा या पहाणीत, बहुतेक (62%) भारतीयांनी आपल्याकडे अतिरिक्त रोख रक्कम नसल्याने, आपण हे पैसे अडीअडचणीसाठी ठेवून देऊ म्हणून सांगितले असावे.

वाईटातून चांगले निघते ते असे.

2 नोव्हेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “सर्वसाधारण माणूस व आर्थिक मंदी

  1. मंदीचा परिणाम म्हणून कंपन्याना तयार ग्राहकवर्गाऐवजी ग्राहकवर्ग तयार करण्याकडे लक्ष द्यावे लागले. याचा परिणाम गरिबाना आपल्या परिस्थितीतून बाहेर पडावे असे वाटण्यात होऊ शकतो.

    Posted by मनोहर | नोव्हेंबर 3, 2009, 7:40 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: