.
Health- आरोग्य

आमटी – भात


कुठल्याही सच्च्या मराठी माणसाला, जेवणातला कोणता पदार्थ खरा खुरा मनापासून आवडत असेल तर तो म्हणजे तुरीच्या डाळीची खमंग फोडणी घालून केलेली आमटी. अशी आमटी मस्त भुरके मारून भाकरी बरोबर खावी किंवा आंबे मोहर तांदुळाच्या भातावर ओतून, आमटीभात खावा. या आमटी भाताची सर सुद्धा कोणत्याही पक्वान्नाला येणार नाही. प्रत्येक सुगरण सुगृहिणीच्या हाताच्या आमटीला निराळीच सर असते. कोणी मसाला सढळ हाताने घालतात तर कोणाच्या आमटीला आंबटगोड चव असते. आमटीत प्रकार सुद्धा किती असावेत? पातळ आमटी, घट्ट फोडणीचे वरण, मुळ्याचे काप किंवा पालक घातलेली आमटी. प्रत्येक आमटीची चव निराळी, ढंग निराळा.

tti

असे जरी असले तरी सगळ्या प्रकारच्या आमट्यांच्यात एक मसाल्याचा पदार्थ हा असतोच असतो. मसाला, लाल तिखट, जिरे, हिंग सगळे वैकल्पिक असते पण हळदीची चिमूटभर तरी पूड ही प्रत्येक प्रकारच्या आमटीत असतेच असते. हळदीचे अनेक गुण आयुर्वेदात सांगितलेले आहेत. हळद जंतूनाशक असते. हळद सांधेदुखी (arthritis) किंवा स्मृतीभ्रंश (dementia.) सारख्या रोगांवर उपयोगी असते असे म्हणतात. इंग्लंडमधले डॉक्टर शॅरन मॅककेना (Dr Sharon McKenna)व कॉर्क़ कॅ न्सर संशोधन केंन्द्रातले (Cork Cancer Research Centre ) त्यांचे सहकारी, यांनी हळदीचा एक नवाच गुणधर्म शोधून काढला आहे.

हळदीमधे असलेला कर्क्युमिन (curcumin) या मूल पदार्थचा एक नवीनच गुणधर्म शोधून काढण्यात या संशोधकांना यश मिळाले आहे. प्रयोगशाळेत केलेल्या संशोधनात या डॉक्टरांना असे आढळून आले की कर्क्युमिन हा पदार्थ अन्ननलिकेच्या कर्करोगी पेशींना 24 तासात नष्ट करतो. या पदार्थाच्या तावडीत सापडलेल्या कर्क पेशी स्वत:च स्वत:ला नष्ट करणे सुरू करतात.

गेल्या तीस वर्षात अन्ननलिकेच्या कर्करोगाचे प्रमाण जवळ जवळ दुप्पट झाले आहे. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की समाजातील वाढता लठ्ठपणा, मद्यपींची वाढती संख्या या सारख्या गोष्टी या कर्करोगाच्या प्रसाराला कारणीभूत आहेत. मृत्युला कारणीभूत होणार्‍या कर्करोगांच्यामधे, हा कर्करोग सहाव्या क्रमांकावर आहे असे मानतात. त्यामुळेच या संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे.

recipes-dals-n-curries-rajma-roti

आमटी भात भुरकताना त्या आमटीतली हळद किती औषधी आहे हे समजल्यामुळे डावभर आमटी आधिक वाढून घ्यायला काहीच हरकत दिसत नाहीये.

30 ऑक्टोबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “आमटी – भात

 1. हळद बहुगुणी म्हणून ओळखली जाते. त्यात आता नव्या शोधामुळे भरच पडली. ही माहिती दिल्याबद्दल आभार. (इतके छान फोटो लावलेत. भूक नसलेल्या माणसालाही भूक लागेल, हे फोटो पाहून.)

  Posted by कांचन कराई | ऑक्टोबर 30, 2009, 9:58 pm
 2. हळद ही शरीरात (पचन संस्थेत आतून) घेता येण्यायोग्य असे एकमेव अ‍ॅन्टिसेप्टिक आहे. घशाच्या होण्यार्‍या कुठल्याही संसर्गावर हळद मिठाच्या गुळण्या सारखा रामबाण उपाय असताना बरेच जण एक्पेक्टोरंट सारखी महागडी ओषधे घेवुन आजार वाढवत असतात. त्वचेच्या विकारांवर पण हळद उपयोगी असते, उघड्या जखमेवर हळदीची पूड दाबुन लावणे हा एक अगदी आयत्या वेळेचा उपाय असतो, हळदीचे गुण असंख्य आहेत. त्यासाठी एक प्रबंध देखील कमी पडेल.

  डॉ. माशेळकरांनी (बहुधा) हळदी च्या पेटंटसाठी परदेशी कंपनीच्या चाललेल्या प्रयत्ना विरुद्ध लढा दिलेला आहे असे ह्या निमित्ताने आठवते.

  रवि करंदीकर

  Posted by रवि करंदीकर | ऑक्टोबर 31, 2009, 9:19 pm
 3. dear shekhar,
  aamati bhaat yachi sir kasha kashaala nahi
  ek dav jastch aamati tu mhatlya pramane vadhun ghetali

  Posted by ashok | नोव्हेंबर 8, 2009, 8:37 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: