.
Health- आरोग्य

स्टफी ऍन्ड ब्लॉक्ड नोज


आज पहाटे जरा लवकरच जाग आली. जाग आल्यावर लक्षात आले की आपली एक नाकपुडी पूर्ण चोंदलेली आहे. त्या बाजूने श्वास सुद्धा घेणे कठिण जाते आहे. मग शिंका सुरू झाल्या. मधून मधून खोकलाही येऊ लागला. आता डोळ्यावरची झोप केंव्हाच पळाली होती. उठून दिनक्रमाला लागलो. मनात ही भिती होतीच की आपल्याला सर्दी झाली आहे की काय़? पण तास दोन तासांनी श्वास नेहमीसारखा घेता येऊ लागला. सर्दीची सर्व लक्षणे दिसेनाशी झाली.

awesome-sneeze

हा अनुभव बर्‍याच वेळा मला येतो. ही लक्षणे असतात अगदी किरकोळ. पण जाम वैतागायला होते. सकाळचे सगळे रूटिन बिघडून जाते हे मात्र खरे. डॉक्टरांना विचारून एकदा पाहिले. या वैतागाचे नाव अलॅर्जिक ह्रायनायटिस (Allergic Rhinitis) आहे व त्याला काही उपाय नाही एवढीच माहिती मात्र कळली. याचा ऍटॅक आला की काही सुचत नाही हे मात्र खरे.

हवेत तरंगणारे काही सूक्ष्म पदार्थ व धुळीत असणारे माइट (house dust mites) हे कृमी यांची आपल्या शरीराला ऍलर्जी असल्याने  AR चा हा ऍटॅक येतो. हा ऍटॅक आला की घसा, नाक व डोळे यांच्यावर प्रचंड सर्दी झाल्यावर जसा परिणाम होतो तसाच होतो. नाक पूर्ण चोंदते तरी किंवा त्यातून पाणी वाहू लागते. डोळे लाल होतात, खाजतात आणि त्यांच्यातून पाणी येऊ लागते. घसा खवखवतो. हा ऍटॅक वर्षभरात कोणत्याही ऋतुत येऊ शकतो.

हा AR म्हणजे काही मोठा आजार नव्हे किंवा काळजी करण्याची गोष्ट नव्हे पण याच्यामुळे तुमच्या कामावर, अभ्यासावर नक्कीच परिणाम होतो. कोणत्याही ऋतुमधे, 8% तरी लोक या त्रासाने पिडीत असतातच आणि त्यात निम्मी तरी मुले असतात. मुलांना या ऍटॅकचा जास्त त्रास होतो व अभ्यासावर परिणाम होऊन त्यांना परिक्षेत गुणही कमी मिळू शकतात. झोपेवर याचा परिणाम होतो व सतत शिंका येणे, डोळे चुरचुरणे असे प्रकार घडल्यामुळे त्यांना सतत दमछाक झाल्यासारखे वाटत रहाते.

या त्रासावर स्टिरॉइड्सचे नाकात मारायचे स्प्रे मिळतात. पण त्याचा सतत कसा उपयोग करणार? अलॅर्जी सप्रेस करणार्‍या गोळ्यांनी बरे वाटते पण हा ही उपाय सतत करता येत नाही. थोडक्यात म्हणजे हा त्रास सहन करण्याशिवाय याच्यावर उपाय नाही.

एखाद्या वाचकाला या ऍटॅकचा अनुभव असला आणि त्याच्यावरचा कोणताही उपाय माहित असला तर वाचकांच्या प्रतिक्रियेमधे जरूर द्यावा. माझ्यासारखे अनेक जण आपले आभार मानतील हे नक्की.

1 ऑक्टोबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “स्टफी ऍन्ड ब्लॉक्ड नोज

  1. mala hi ha prob hota.pan me doc parag khatawakar,pune yanache treatment ghetali.ata ha tras khup kami zala ahe.if you want i can give you no.

    Posted by leena | ऑक्टोबर 2, 2009, 1:41 pm
  2. झोप येत नसताना व जाग आल्यावर अंथरुणावर पडून रहाणे टाळावे.

    Posted by मनोहर | ऑक्टोबर 2, 2009, 10:12 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: