.
History इतिहास

पेशवेकालीन पुण्यातला दसरा


दुर्गा भवानी माता ही भोंसले कुलाची इष्टदेवता असल्याने, सातार्‍याच्या शाहू महाराजांच्या हयातीत, नवरात्रीचे नऊ दिवस व त्यानंतर येणारा दसरा असा दहा दिवसाचा सण, मोठ्या थाटामाटाने, सातार्‍याला मराठी राज्याचा सण म्हणून साजरा होत असे. शाहू महाराजांच्या निधनानंतर, बाळाजी बाजीराव किंवा नानासाहेब पेशव्यांनी हा सण तितक्याच थाटामाटाने पुण्यात साजरा करण्यास सुरवात केली. या प्रसंगी अनेक धार्मिक विधी करण्यात येत असले तरी पेशव्यांची मिरवणूक व नंतर भरवण्यात येणारा खास दरबार हे या सणाचे विशेष वैशिष्ट्य होते.

दसर्‍याच्या दिवशी सकाळी श्रीमंत पेशवे व त्यांचे सर्व सरदार हे एका मिरवणूकीने पुणे शहराबाहेरच्या एका छावणीकडे जाण्यास निघत. या प्रसंगी सर्व सरदारांच्या तुकड्या  स्वत:च्या रंगीबेरंगी आणि फडफडणार्‍या ध्वजाच्या किंवा निशाणांच्या मागे आपापल्या सर्वोत्तम घोड्यांवर स्वार झालेले असत. प्रत्येकाच्या अंगावर उत्कृष्ट कपडे व दागदागिने असत. त्यांची शस्त्रे घासूनपुसून अगदी चकचकीत केलेली असत. सर्व घोडे, उंट व हती हे त्यांच्या अलंकारांनी सजवलेले असत.

पुण्यातील जवळजवळ सर्व नागरिक मिरवणूकीत भाग घेणारे किंवा प्रेक्षक म्हणून या मिरवणूकीबरोबर चालत येत असत. ही अतिशय भव्य अशी मिरवणूक, आधी ठरवलेल्या एका शमी वृक्षापाशी येऊन थांबत असे. यानंतर श्रीमंत पेशवे या शमी वृक्षाची पूजा करत असत. ती झाल्यावर पेशवे या शमी वृक्षाची काही पाने तोडून घेत असत. त्या वेळी सैनिकांच्याजवळच्या सर्व तोफा व बंदुका डागण्यात येत व सर्व आसमंत दुमदुमुन जात असे. या नंतर या प्रसंगासाठी मुद्दाम विकत घेतलेल्या एका ज्वारी किंवा बाजरीच्या शेतात पेशवे जात व पिकाची एक दोन कणसे तोडून घेत. या क्षणी परत एकदा सैनिक बंदुका डागत, काहीजण धनुष्य़ाने बाणांचा वर्षाव करत. व अत्यंत आनंदाने व जल्लोशाने सर्वजण त्या शेताकडे धाव घेत व जमेल तेवढी कणसे खुडून घेण्याचा प्रयत्न करत व घरी परतत. उरलेल्रा सर्व दिवस हर्ष उल्हासात घालवण्यात येत असे. काही मराठा सरदार या प्रसंगी शेळी किंवा बैलाचा बळी देत असत. बळीचे रक्त अतिशय विधीपूर्वक घोड्यांच्या अंगावर शिंपडण्यात येत असे व ते अत्यंत शुभ मानले जाई. बळी जनावराचे मांस आपल्या हाताखालच्या, ब्राम्हण सोडून इतर, सर्व सैनिकांमधे, प्रसाद म्हणून वाटण्यात येत असे. काही मोठे सरदार हाताखालच्या लोकांना, बळीची जनावरे विकत घेण्यासाठी पैसे देत असत व बळी देऊन त्या बळीचे मांसभक्षण करणे हा दसर्‍याचा सर्वात मुख्य विधी मानला जाई.

सीमोल्लंघनाच्या स्वारीवरून परत आल्यावर शनिवारवाड्यातल्या दरबार महालात एक खास दरबार भरवला जात असे. या दरबारात सेनापती, सरदार व शिलेदार पेशव्यांना नजराणा पेश करत व पेशवे दरबारकडून सर्वांना त्यांच्या त्यांच्या स्थानाप्रमाणे मानाची वस्त्रे मिळत. हे मानाचे वस्त्र मिळणे हे त्या काळी अतिशय सन्मानाचे मानले जाई. इ. स. 1794 मधे पेशव्यांनी रुपये 2 लाख वीस हजार एकशे चव्वेचाळीस एवढ्या किंमतीची मानाची वस्त्रे मान्यवरांना दिली होती. त्यातील प्रमुख काही असे होते.

सातार्‍याचे राजे त्यांचे कुटुंब व सरदार:- रु. 27383/-

पंत प्रतिनिधी, कुटुंब व सरदार :- रु. 1283/-

पंत सचीव व कुटुंब:- रु. 603/-

चिंतामणराव पटवर्धन:- रु. 1238/-

परशुराम रामचंद्र :-रु. 1089/-

तुकोजी पवार:- रु. 789/-

खंडेराव विंचुरकर :-रु.2756/-

कृष्णराव बळवंत:- रु 2398/-

हणमंतराव दरेकर रु.:- 827/-

दौलतराव घोरपडे :- रु. 604/-

रघुजी भोंसले :- रु 6440/-

हैद्राबादचे निझाम:- रु.5888/-

चिंतामणराव फडके;- रु 1120/-

दौलतराव शिंदे :- रु. 11297/-

अलीबहादुर:- रु. 2015/-

या शिवाय घोडदळाच्या अधिकार्‍यांना रु. 34033/- व शिलेदारांना रु. 79703/- एवढ्या किंमतीची मानाची वस्त्रे दिली होती. इंग्रज रेसिडेंट व त्याचा वकील यांनाही मानाची वस्त्रे देण्यात आली होती. सर्व सैनिक व इतर अधिकारी यांना ही मानवस्त्रे मिळवण्याचा हक्क होता. मजेची गोष्ट म्हणजे राघोबा पेशव्यांच्या अंगवस्त्रांचीही नावे या यादीत होती.

दसर्‍याच्या निमित्ताने सैनिकांचे स्पर्धात्मक खेळ आयोजित केले जात असत व नंतर इंग्रजांच्या काळातही ही प्रथा चालू होती.

मानवस्त्रे देण्याची प्रथा पेशवाईचा अंत होईपर्यंत तर चालू होतीच पण नंतरही इंग्रजांनी ती अनेक वर्षे चालू ठेवली होती. काही वर्षांनी ही मानवस्त्रे दसर्‍याला न देता इंग्रज राजाच्या वाढदिवशी देण्याची प्रथा सुरू झाली व या वेळी इंग्रज एजंट, दरबारही भरवत असे.

या सर्व प्रथा कधी बंद झाल्या कोण जाणे? पेशवे दरबारने ज्या काही रूढी सुरू करून त्यांचे जतन केले होते त्यापैकीच एक हा दसर्‍याचा समारंभ होता. ज्या सैन्याच्या जिवावर मराठी सामार्‍ज्य उभे होते त्या सैनिकांचा व अधिकार्‍यांचा दसर्‍याच्या निमित्ताने सत्कार करण्याची पद्धत अतिशय योग्य होती यात शंकाच नाही.

24 सप्टेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

9 thoughts on “पेशवेकालीन पुण्यातला दसरा

 1. Hi Chandrashekhar,
  I have started reading your blog for some time now and frankly speaking I have become your fan .I religiously forward your very thought provoking articles to all my friends and relatives .Your range is amazingly wide and your comments apt and precise .
  Looking forward to many such articles from you.
  I am a retired professor from National Defence Academy , prresently settled in Pune
  Do keep in touch in case you are here
  Regards====JKBhagwat

  Posted by jkbhagwat | सप्टेंबर 26, 2009, 1:03 सकाळी
 2. . इ. स. 1974 मधे पेशव्यांनी रुपये 2 लाख वीस हजार एकशे चव्वेचाळीस एवढ्या किंमतीची मानाची वस्त्रे मान्यवरांना दिली होती………….इ. स. 1974 ????

  Posted by nimisha | सप्टेंबर 26, 2009, 2:08 pm
 3. dear shekhar,
  there is a typographical error in your article on dussera.
  i hope you may be meaning 1774 as a year instead you have typed 1974.
  ashok

  Posted by ashok | सप्टेंबर 26, 2009, 2:51 pm
 4. Hi,CS
  mahitipurn aeetihahsic lekh.
  dusserachya hardik shubhechya.

  Posted by sadanand | सप्टेंबर 27, 2009, 1:19 सकाळी
 5. मी मुलत: आंबळे ता.पुरंदर येथील सरदार दरेकर घराण्यातील आहे.मला आमच्या घराण्याचा संपुर्ण इतिहास जाणणे आहे.काही मदत होईल का

  Posted by लहुराज(नारायणराव)बजरंग दरेकर-ईनामदार | मार्च 7, 2012, 1:37 pm
  • लहुराज –

   पेशवे कालीन मराठा सरदारांचा फारसा इतिहास मला ज्ञात नाही. तुम्ही पुण्याच्य भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये चौकशी केल्यास तुम्हाला काही मदत मिळू शकेल. त्याच प्रमाणे
   http://www.archive.org/stream/kaifiyatsyadiscc00vdga#page/n5/mode/2up
   हे पुस्तक जालावर उपलब्ध आहे ते बघा. यात बर्‍याच सरदार घराण्यांसंबंधी माहिती आहे.

   Posted by chandrashekhara | मार्च 8, 2012, 6:59 सकाळी
  • Darekars are from More Maratha clan. Many Sardars of Marathas like in Shivaji period showed bravery from this clan. e.g. Rrayaji Darekar etc. The Darekars glory reached to zenith under Chhatrapati Shahu of Satara as many Darekars were Sardars, Saranjamdars, Mokasa Holders like Subhanji, Rrayaji, Hhiroji etc. Similarly Many were instrumental in wars like Panipat, Kharda and many. Maratha Ballads or Powadas includes Ddarekar in them. Darekars were prominant Maratha Chief. I am postin article on darekars on wikipidia soon. If you want to collect Darekar Histories kindly visit archeological departments of Maharashtra and Bharat Itihhaas sanshodhak mandal pune etc. alongwith searching histories of Darekars in your relative Marathas. e.g. Sardar Ghorpades son-in-law was a Darekar also Darekars related to Baroda, Gwalior etc. principalities.

   Posted by Rahul Bhoite | ऑक्टोबर 14, 2012, 2:32 pm
 6. मला आंबळे ता.पुरंदर येथील सरदार दरेकर घराण्याचा संपुर्ण इतिहास जाणून घ्यायचा आहे.काही माहिती असल्यास कृपया कळवावे.

  Posted by लहुराज(नारायणराव)बजरंग दरेकर-ईनामदार | मार्च 7, 2012, 1:41 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: