.
History इतिहास

गुप्त खजिना


काही काही लोकांना गुप्त खजिन्याच्या वेडाने झपाटलेले असते. कुठल्याही जुन्या भग्न अवशेषांमध्ये, पडक्या भिंतींमधे, त्याना कुठेतरी मोहरांचा हंडा नक्की सापडेल असे वाटत असते. इंग्लंडमधल्या स्टॅफर्डशायर परगाण्यातल्या बर्नटवूड या गावातले, 55 वर्षाचे मिस्टर. टेरी हरबर्ट हे गृहस्थ, या अशा खजिना शोधकांच्यापैकीच एक. त्यांची खासियत म्हणजे ते भग्न अवशेष किंवा पडक्या भिंतीमधे शोधाशोध न करता, जमीनीत पुरलेले गुप्त धन शोधण्याच्या मागे असतात. या साठी ते अगदी नवीन तंत्रज्ञानाची धातूशोधक यंत्रे वापरतात.

_46430043_treasure_1

मिस्टर हरबर्ट नुकतेच आपल्या एका शेतकरी मित्राच्या शेतावर आपले धातूशोधक यंत्र वापरून गुप्त खजिन्याचा शोध घेत होते. अचानक धातूशोधक यंत्रावरचा बझर वाजू लागला. अर्थातच हरबर्ट व त्यांचा शेतकरी मित्र यांनी त्या जागी उत्खनन केले. उत्खनन केलेल्या जागी त्यांना अनेक पेट्या पुरलेल्या आहेत असे आढळून आले. या पेट्या बाहेर काढून उघडल्यावर हरबर्ट आणि त्यांचा मित्र यांच्या तोंडून अक्षरश: शब्द फुटेनासा झाला. या सर्व पेट्या सोन्या व चांदीच्या निरनिराळा वस्तूंनी ठासून भरलेल्या होत्या. टेरी हर्बर्ट यांनी घाईघाईने स्टॅफर्डशायरचे एक अधिकारी मिस्टर डंकन स्लार्प यांना बोलावून आणले. ते सोने बघून त्यांचीही जीभ टाळूला चिकटल्यासारखी झाली. ते म्हणतात की “ मी जे समोर पहात होतो त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता.” या पेट्यांच्यात सॅक्सन कारागिरीचा अप्रतिम नमुना असलेल्या अनेक वस्तू होत्या. त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे दाग दागिने अजिबात नव्हते. या खजिन्यात, तलवारींची म्याने, रत्नजडीत मुठी व अशा सारख्या इतर अनेक गोष्टी होत्या.

_46431950_gold1

आता बर्मिंगहॅम म्युझियममधे डॉक्टर केव्हिन लीहाय या तज्ञांचा मार्गदर्शनाखाली या खजिन्याचे वर्गीकरण आणि कॅटलॉग बनवणे चालू आहे. यात एकूण 1500 वस्तू असून सोने 5 किलोपर्यंत व चांदी 1.5 किलो एवढी आहे. मिस्टर लीहाय म्हणतात की ज्या ज्या पुराणवस्तू शास्त्रज्ञांनी हा खजिना बघितला आहे ते सर्व अतिशय आश्चर्यचकीतच झालेले आहेत. हा खजिना इ.स. 700 या शतकातला आहे.

_46432062_3931743026_62797b2e0d_o

त्या काळात झालेल्या कोणत्या तरी युद्धात, जेत्यांनी, पराभूत सैन्याच्या शस्त्रास्त्रांच्या मुठी वगैरे, आपल्या विजयाची स्मृतीचिन्हे म्हणून, काढून घेतल्या असव्यात. त्या वेळेस हा खजिना घेऊन जाणे त्यांना शक्य न झाल्याने त्यांनी तो पुरून ठेवला असावा असा अंदाज या खजिन्याबद्दल बांधला गेला आहे. पण कोणाचे युध्द झाले कोण जेते होते वगैरे काहीही सांगणे अशक्यप्रायच आहे. या खजिन्याची किंमत काय असावी याचा अंदाज बांधण्याचे कार्य सध्या चालू आहे. बर्मिंगहॅम संग्रहालयात हा खजिना 13 ऑक्टोबर पर्यंत लोकांना पहाण्यासाठी ठेवला जाणार आहे.

या खजिना कसा सापडला हे सांगताना मिस्टर टेरी हरबर्ट म्हणतात की “पुरातन आत्मे मला नाणी कोठे सापडतील ते सांगतात. यावेळी नाण्यांच्या ऐवजी सोने सापडले.”

24 सप्टेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

7 thoughts on “गुप्त खजिना

  1. I love your blog

    Posted by harekrishnaji | सप्टेंबर 24, 2009, 10:59 pm
  2. anthoer info.riquire

    Posted by alay kunjir | नोव्हेंबर 1, 2010, 3:31 pm
  3. ya prakare sone sapdu shakel ka

    Posted by ram bhende | सप्टेंबर 24, 2012, 8:28 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: