.
Health- आरोग्य

छुपा व्यायाम


अलीकडे कोणतेही मासिक किंवा वर्तमानपत्र उघडून बघितले तर एखादा तरी, आरोग्य या विषयावरचा लेख, आपल्या दृष्टीला नक्की पडतो. दूरदर्शनच्या वाहिन्यांच्यावर किंवा रेडियोवर, आरोग्यासंबंधीची भाषणे किंवा ‘फोन इन’ कार्यक्रम नेहमीच बघायला मिळतात. या सर्व लेखांत किंवा कार्यक्रमात एक समान सल्ला नक्की असतोच. व्यायाम करण्याची आवश्यकता यावर सतत भर दिला जातो. ज्यांना व्यायामाची नावड किंवा कंटाळा असतो त्यांना हे लेख किंवा कार्यक्रम अगदी नकोसे वाटतात. काही दशकांपूर्वी व्यायामाला एवढे महत्व कोणीच देत नसे. ज्यांना खेळांची, व्यायामाची आवड होती ते जरूर खेळत किंवा व्यायाम करत. परंतु सर्व साधारण मध्यमवर्गीय माणसे, उठ सुठ जिमला जा, पळायला जा असे करताना दिसत नसत. एवढे सगळे असून अलीकडे आजारांचे स्वरूप मात्र जास्त जास्त गंभीर होत चालले आहे. मधुमेह, हृदय विकार आणि कर्करोगाचे प्रमाण कितीतरी वाढले आहे. बहुतांशी लोक आणि त्यात स्त्रिया प्रामुख्याने, जास्त जास्तच लठ्ठ झालेल्या दिसतात.

काही दशकांपूर्वीची जीवनशैली आठवण्याचा प्रयत्न करा. त्या वेळेस सर्व साधारण मध्यम वर्गाचे आयुष्य अगदी साधे आणि कितीतरी पटींनी जास्त कष्टप्रद होते. घरातले स्वैपाक- पाणी घरातल्या स्त्रिया स्वत:च करत असत. स्वैपाकघरातील कोणतीच उपकरणे तेंव्हा उपलब्ध नव्हती. त्यामुळे वाटणे घाटणे सारख्या गोष्टी हातानेच कराव्या लागत. आपले कपडे लोक स्वत:च धुवून टाकत. ऑफिसला जाण्यायेण्याचे प्रमुख वाहन सायकल हेच होते. कोचावर लोळत टी.व्ही बघत तास-तास घालवण्याची चैन तेंव्हा शक्यच नव्हती. या सगळ्यातून, व्यायाम, जॉगिंग करायला वेळ कोणाला होता? पण एवढे मात्र नक्की की तेंव्हा गंभीर आजारांचे प्रमाण कमीच असे.

बहुतेक लोकांना, व्यायाम म्हणले की घामानी थबथबलेले व्यायामपटू डोळ्यासमोर येतात. घामाचा वास नकोसाच वाटतो. व्यायाम करण्यासाठी रोज वेळ काढून कशाला शरीराला कष्ट देत रहायचे? असेच वाटते, त्यामुळे बहुतेक लोक “वेळच होत नाही हो!”, “फार काम असते हो!” किंवा “व्यायाम केल्यावर फारच दमल्यासारखे वाटते.” यासारखी काही ना काही सबब देऊन व्यायाम टाळण्याचा प्रयत्न करतात. असे नसते की या लोकांना व्यायामाचे महत्वच कळत नसते. व्यायाम करून वजन घटवले, तर आपले आयुष्यमान वाढेल. मधुमेहासारखे रोग होण्याची शक्यता कमी होईल. व्यायाम केला तर आपल्याला दिवसभरात कराव्या लागणार्‍या गोष्टी करताना जास्त उत्साह वाटेल. आपल्या हातून काम जास्त कामे  तेवढ्याच श्रमात होतील या सर्व गोष्टी त्यांना पूर्ण माहिती असतात आणि पटत असतात. पण या लोकांची अवस्था ‘कळते पण वळत नाही अशी असते.’

अशा न वळणार्‍या लोकांसाठी, सिंगापूरमधल्या ‘हेल्थ प्रमोशन बोर्डाच्या’ एक उप संचालिका श्रीमती चान योक यिन (Mrs Chan Yoke Yin) यांनी व्यायामाच्या या कंटाळ्यावर, एक सोपा उपाय शोधून काढला आहे. त्या म्हणतात की एकदम एकाच वेळेस अर्धा किंवा पाऊण तास व्यायाम करण्याच्या ऐवजी तो दहा, दहा मिनिटाच्या छोट्या छोट्या भागांत केला तरी शरीराला होणारे फायदे तेवढेच रहातात. जिम मधे जाणे आवडत नसले तर कामाला जाता येता, दोन किंवा तीन स्टॉप अलीकडे बसमधून उतरा किंवा नंतर बसमधे चढा आणि हे अंतर भरभर चाला. इमारतींना लिफ्ट असला तरी जिना चढूनच वर जा. दुकानात घरगुती वस्तू खरेदीला गेलात तर सामानाची ट्रॉली न घेता टोपली घ्या. सामान हातातल्या टोपलीत ठेवा व ती टोपली दुकानभर हातातच ठेवा. कामातून काही मिनिटासाठी आपण सुट्टी घेतो तेंव्हा स्वस्थ बसून न रहाता काहीतरी व्यायाम होणारी हालचाल करत रहा.

sb10064435a-001

इतकेच काय पण ज्या लोकांना सतत टेबलाशी बसून रहावे लागते त्यांनाही असे व्यायाम करणे शक्य आहे. त्यांनी त्यांच्या टेबलाला एखादा इलॅस्टिकचा पट्टा बसवून घेतला तर हात किंवा पाय त्या पट्ट्यात अडकवून तो इलॅस्टिकचा पट्टा ताणला जाईल अशा रितीने आपले हात, पाय हलवून, ते रेझिस्टन्स प्रकारचा व्यायाम घेऊ शकतात किंवा टेबलावर छोट्या आकाराची वजने ठेवून मधून मधून हाताना कर्लिंग सारखा व्यायाम देऊ शकतात.

श्रीमती. चान यांच्या सूचना गंमतीदार असल्या तरी महत्वाच्या नक्कीच आहेत. प्रत्येक माणूस, त्याच्या दैनंदिन रूटिनमधे, अशा प्रकारचे स्वत:साठीचे व्यायाम नक्कीच शोधून काढू शकतो. अशा प्रकारच्या व्यायामात, शरीराला व्यायाम तर होतोच पण मनाला कंटाळा येण्याच्या आतच व्यायाम संपतो देखील.

20 सप्टेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “छुपा व्यायाम

  1. आधीची आपली जीवन शैलीच अशी होती की दैनदिन क्रियामध्ये नैसार्गिक्रित्याच शरीराला व्यायाम घडत असे.जशी जशी टेक्नोलोजी सुधारात गेली माणुस जास्त आळशि होत गेला.केवळ शारीरिकरित्या नाही तर बौद्धिक पातळीवरही.पहिला बरेचसे दूरध्वनी क्रमांक आपल्या लक्षात असायचे पण मोबाइलच्या आगमनानंतर अगदी जवळच्या व्यक्तीचा क्रमांकाही कोणी विचारल्यास ‘अरे थांब ह मोबाइल च्या फोनेबूक मध्ये बघावा लागेल’ अस म्हणाव लागत, म्हणजेच मोबाइल च फोनेबूक, मेमोरी कार्ड फुल पण आपला वरचा मजला मात्र रिकामा ….

    Posted by देवेंद्र चुरी | सप्टेंबर 20, 2009, 12:09 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: