.
ताज्या घडामोडी Current Affairs

स्वप्न आणि लाल फीत


ही गोष्ट आहे ‘मॉन्ग थॉन्गडी’ या बारा वर्षाच्या एका मुलाची. मॉन्गचे आई-वडील मूळचे  ब्रम्हदेशातल्या शान या अदिवासी जमातीचे. ब्रम्हदेशातल्या जुलमी राजवटीला ते कंटाळले व थायलंड मधे निर्वासित म्हणून आले व ‘चियान्ग माय’ या गावात स्थायिक झाले. या दोन देशांमधली सीमा अतिशय घनदाट अशा जंगली प्रदेशातून जाते. ब्रम्हदेश व या भागातल्या इतर देशांच्या मानाने, थायलंड हा देश बराच श्रीमंत असल्याने, येथे कारखाने, शेत मजूर व घरगुती कामासाठी नोकर्‍या सहजपणे उपलब्ध होतात. ही जंगली सीमा पार करून आलेले अंदाजे  20 लाख तरी निर्वासित, थायलंडमधे वास्तव्य करून आहेत. मॉन्गच्या आई-वडीलांना प्रथम शेतमजूर म्हणून काम मिळाले व नंतर ते बांधकाम मजूर म्हणून काम करू लागले.

मॉन्गचा जन्म थायलंडमधलाच. तिथेच तो, चौथीच्या वर्गात, प्राथमिक शाळेत शिकतो. या मुलाला, अगदी लहान असल्यापासून, आभाळात उडणार्‍या विमानांचे मनस्वी वेड. आकाशातून एखादे विमान जाताना दिसले की तो हातातला खेळ किंवा अभ्यासाचे पुस्तक वही टाकून वेड्यासारखा विमानाकडे बघत रहातो. या नंतर या मुलाने हातात येईल तो रद्दी कागद, प्लॅस्टिक यांची विमाने स्वत’च्या मनाने बनवायला सुरवात केली. हळू हळू ही कागदी विमाने बनवण्याच्या कलेत, तो चांगलाच पारंगत बनला. जपानमधे लोकप्रिय असलेल्या ओरिगामी या कलेत, कागदाला फक्त घड्या घालून निरनिराळी मॉडेल्स बनवतात. या ओरिगामी पद्धतीची, डिंकाचा वापर न केलेली व फक्त घड्या घालून केलेली विमाने, मॉन्गने स्वत:च्या मनानेच बनवली. थायलंडमधे अशी विमाने उडवण्याच्या स्पर्धा निरनिराळ्या पातळीवर होत असतात. मॉन्गची विमाने या स्पर्धांत सर्वोत्कृष्ट ठरली. या वर्षी मॉन्गने बनवलेले विमान 12.5 सेकंद हवेत तरंगत राहले व त्याच्या वयोगटासाठी हा वेळ, जपानमधल्या चिबा या गावात होणार्‍या जागतिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र ठरला.  मॉन्गला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी निमंत्रण आले. या स्पर्धांचे आयोजकच या स्पर्धकांचा सर्व खर्चही करणार होते.

lens5845092_1247363679origamiairplane

मॉन्गने उत्साहाने विमानाचे नवीन डिझाईन बनवण्यास सुरवात केली. ही विमाने हाताने हवेत जोरात फेकणे आवश्यक असते. यासाठी मॉन्गने व्यायाम करण्यासही सुरवात केली. त्याच्या उत्साहावर प्रथम पाणी ओतले ते पासपोर्ट ऑफिसने. मॉन्ग, थायलंडचा काय पण कोणत्याच देशाचा नागरिक नाही हे त्यांनी शोधून काढले व त्याला पासपोर्ट देणे शक्य नसल्याचे कळवले. थायलंडच्या गृहमंत्रालयाने तर कमालच केली. मॉन्ग हा 12 वर्षाचा मुलगा, देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक व्यक्ती आहे असा जावईशोध त्यांनी लावला. मॉन्गच्या चिमुरड्या विश्वावर हा एक वज्राघातच होता. या निराशेने तो दिवसभर खूप रडला पण लाल फितीपुढे कोणाचेच शहाणपण चालत नाही हे त्याला कुठले माहित असणार!

Takuo-Toda_Paper_Airplane_Record1

थायलंडमधल्या प्रसार माध्यमांना जेंव्हा हा लाल फितीचा वेडगळपणा समजला तेंव्हा त्यांनी त्याला खूपच प्रसिद्धी दिली. मॉन्ग व त्याची विमाने सर्व थायलंडभर एकदम प्रसिद्ध बनली. अखेरीस लाल फितीला त्याची दखल घेणे भागच पडले. थायलंडचे पंतप्रधान श्री अभिजित वेजिअजिवा यांनी त्याला आपल्या ऑफिसमधे येण्याचे खास निमंत्रण दिले. शाळेच्या युनिफॉर्मला व्हिजिटर पास लावलेला मॉन्ग व त्याची विमाने परत एकदा टी. व्ही वर झळकली. हे झाल्यावर सरकारी यंत्रणा एकदम जागी झाली व मॉन्गला तात्पुरती प्रवासासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे देण्यात आली.

abhisit-vejjajiva-mong-thongdee-2009-9-4-1-40-59

मॉन्गमुळे थायलंडमधील निर्वासितांचा प्रश्न, पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या 20 लाख निर्वासिताना नोकरी असल्यास सरकार रजिस्टर करून घेते परंतु त्यांना जिल्ह्याच्या बाहेर जाता येत नाही किंवा दवाखान्यांसारख्या कोणत्याही सरकारी सुविधाही मिळत नाहीत. मॉन्ग आणि त्याचे आई-वडील यांच्या नागरिकत्वासाठीचा अर्ज, पुढच्या वर्षी किचारात घेतला जाणार आहे.

मॉन्ग स्वत:ला थाई समजतो. त्याला थायलंड, तिथले जेवणखाण हेच आवडते. त्याला पुढे कॉलेजात जायचे आहे व पायलट बनायचे आहे.

पण सध्या तरी त्याच्यापुढचा सर्वात महत्वाचा प्रश्न, जपानमधे थंड हवा असल्याने गरम कपडे कोठून मिळवायचे? हाच आहे.

14 सप्टेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “स्वप्न आणि लाल फीत

  1. Chandrashekhar Hatts off to you. The “GREAT ARTICLE”

    Posted by sunil shinde | सप्टेंबर 14, 2009, 2:28 pm
  2. तुमच्या ब्लॉगवरील ईतर लेखांप्रमाणेच माहितीपुर्ण लेख…..वाईट वाटले ते त्या लहानग्यासाठी……

    Posted by sahajach | सप्टेंबर 15, 2009, 6:46 pm
  3. या मुलाचा त्याने भाग घेतलेल्या स्पर्धेत तिसरा नंबर आला….एरवी पेपरमधे ही बातमी वाचली गेली असती की नाही कल्पना नाही पण तुमच्या ब्लॉगवरील हा लेख वाचलेला असल्यामूळे बातमीचा संदर्भ पटकन लक्षात आला……

    Posted by sahajach | सप्टेंबर 26, 2009, 7:27 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: