.
अनुभव Experiences

विपरित शक्यता टाळण्यासाठी नियोजन


काल दिल्लीच्या खजुराओ खास भागातील एका सरकारी शाळेत घडलेल्या घट्नेची बातमी वाचली आणि मन सुन्न झाले. या शाळेत सहामाही परिक्षा चालू होती. शाळेत इतर वेळी दोन पाळ्या असतात. एका पाळीत मुलांचे वर्ग असतात तर दुसर्‍या पाळीत मुलींचे. दोन्ही पाळ्यांची परिक्षा मात्र एकदम घेतली जाते. दिल्लीत 2 दिवसापूर्वी झालेल्या तुफान पावसामुळे या शाळेतील तळमजल्यावरच्या वर्गांत पाणी शिरले होते. या वर्गात मुलांना बसता येणार नाही ही गोष्ट बहुदा परिक्षा सुरू झाल्यावर शाळेच्या शिक्षकवर्गाच्या लक्षात आली असावी. त्यामुळे घाईघाईने आसन व्यवस्था बदलण्यात आली. बदललेल्या आसन व्यवस्थेप्रमाणे वरच्या मजल्यावर बसलेल्या मुलींना खाली व खालच्या वर्गामधे बसलेल्या मुलांना एकदम वर पाठवण्यात आले. शाळेला 4 फूट रूंद असलेला एकच जिना आहे व तो शाळेच्या वापरासाठी म्हणून अतिशय अरूंद आहे. अशा वेळी तीस चाळीस मुलांचा एक गट जिन्यावरून वर जाण्याचा प्रयत्न करत असताना या मुली वरून खाली येऊ लागल्या. पुढे नक्की काय झाले ते समजले नाही पण गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाली आणि परिणामी 5 मुली मृत्युमुखी पडल्या.

या शाळेतल्या घटनेचे वर्णन वाचल्यावर असे मनात आले की साठ सत्तर मुलांचा गट एका जागेवरून दुसरीकडे नेणे ही तर सर्व शाळांच्यात सतत घडत असलेली गोष्ट आहे, मुले खेळासाठी व्यायामासाठी नेहमीच वर्गातून दुसरीकडे जातात व येतात. अशा रोज घडणार्‍या हालचालींने या दिवशी एवढे गंभीर रूप कसे धारण केले? या शाळेतला शिक्षकवर्ग आणि कर्मचारी वर्ग तर या दुर्दैवी घटनेला प्रामुख्याने जबाबदार आहेतच. त्यांचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा या पाच निरागस मुलींचा बळी घेण्यास कारण ठरला हे खरेच आहे. त्यांची चौकशी होऊन, अपराधी कर्मचार्‍यांना योग्य ती शिक्षा मिळेल अशी आपण आशा करूया.

स्वातंत्रवीर सावरकरांचे एक प्रसिद्ध वचन आहे. कोणत्याही परिस्थितीत जे जास्तीत जास्त प्रतिकूल आहे तेच घडेल अशी मनाची धारणा ठेवून, त्यासाठीची उपाययोजना आधीच योजून ठेवावी असा काहीसा या वचनाचा अर्थ आहे. ‘विपरित शक्यता टाळण्यासाठीचे नियोजन’ या नियोजन प्रणालीचा, हे वचन म्हणजे गाभा आहे. कोणतीही नवीन इमारत बांधताना, कोणत्याही संस्थेचे व्यवस्थापन करताना किंवा कोणत्याही सभासमारंभाचे आयोजन करताना, ही नियोजन प्रणाली(Worst Case Scenario Management) वापरणे आवश्यक असते. आपल्याकडे एक म्हण आहे “ शुभ बोल रे नार्‍या म्हणे मांडवाला आग लागली तर”. प्रत्यक्षात हा नार्‍या जे म्हणतो आहे त्याचा विचार कोणताही समारंभ आयोजित करताना, करणे अतिशय महत्वाचे असते.

हेच उदाहरण लक्षात घ्यायचे तर खरोखरच मांडवाला आग लागली तर त्या मांडवातून लोक चटकन बाहेर पडू शकतील का? शॉर्ट सर्किट होणार नाही याची काळजी घेतली आहे का? मांडवाच्या बांधणीत ज्वालाग्रही कापड वापरलेले नाही ना? या सर्व बाबींचा आधीच विचार केलेला असला तर दुर्घटना घडलीच तर त्यामुळे होणारी वित्त किंवा मनुष्यहानी अतिशय सीमित राहते.

आपण नवीन घर बांधतो, सदनिका घेतो तेंव्हा आग लागली तर किंवा धरणीकंप झाला तर आपल्याला या घरातून बाहेर कसे पडता येईल? घर तळमजल्यावर असले तर घरात अतिवृष्टीचे पाणि आत शिरणार नाही ना? घरात सापविंचू प्रवेश करणार नाहीत ना? याचा आधीच विचार करून आराखड्यात योग्य बदल करणे महत्वाचे ठरते. लग्नप्रसंगी जेंव्हा सोन्याने मढलेल्या पन्नास शंभर बायका एका मांडवात किंवा हॉलमधे लगबग करत असतात तेंव्हा कोणी दरोडेखोरी करू नये म्हणून आपण काय काळजी घेतो? अशा ठिकाणी लहान मुले पळापळ करत असतात. त्यांनी रस्त्यावर पळत जाउ नये म्हणून काय उपाययोजना असते. बाहेर सुरक्षा रक्षक तैनात आहेत की नाही हे बघणे अशा प्रसंगी अतिशय महत्वाचे असते.

थोडा खोलवर विचार केला तर आग, पूर, दंगे, दरोडे, अतिरेकी हल्ला अशासारख्या विपरित घटना सारख्या घडत असतातच. त्या घडू नयेत म्हणून सुनियोजित शिस्तबद्ध कारवाई (Protocol of Action) आणि इमारत किंवा इतर गोष्टींच्या आराखड्यातले सुयोग्य बदल, हे प्रथमपासून करून ठेवणे अतिशय आवश्यक असते.

आता आपल्याकडेही, ‘विपरित शक्यता टाळण्यासाठीचे नियोजन’(Worst Case Scenario Management Planning) कसे करावे याचा सल्ला देणारे सल्लागार आहेत. आपल्या नव्या प्रकल्पात यांचा सल्ला घेतल्यास अनेक संकटे टाळता येऊ शकतात. दिल्लीच्या शाळेचेच उदाहरण परत घ्यायचे असले. तर शाळेत विद्यार्थ्यांची गटामधील हालचाल कशी करायची त्याचा आराखडा(Protocol of Movement) आवश्यक होता.  सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारी या आराखड्याप्रमाणेच मुलांची ने-आण करतात किंवा नाही हे व्यवस्थापनाने बघणेही जरूरीचे होते. तसेच शाळेला एकच अरूंद जिना न ठेवता जाण्यासाठी एक व येण्यासाठी एक असे स्वतंत्र जिने आवश्यकच होते.या गोष्टी विचारात कोणी घेतल्याच नसाव्यात.

दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भारतीय लोकांची मानसिकताच अशी आहे की विपरित, अशुभ गोष्टींचा साधा विचारही त्यांना नकोसा वाटतो. परंतु तो विचार करणेच आवश्यक असते नाहीतर अशा घटना घडतात व आयुष्यभर पश्चाताप करत बसण्याची वेळ येते.

11 सप्टेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “विपरित शक्यता टाळण्यासाठी नियोजन

 1. “दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भारतीय लोकांची मानसिकताच अशी आहे की विपरित, अशुभ गोष्टींचा साधा विचारही त्यांना नकोसा वाटतो. परंतु तो विचार करणेच आवश्यक असते नाहीतर अशा घटना घडतात व आयुष्यभर पश्चाताप करत बसण्याची वेळ येते.”

  अगदी खरे आहे तुमचे म्हणणे!

  त्याशिवाय “शुभ बोल रे नार्‍या” अशी म्हण पडली नसती!
  खरे तर अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यावर आपण विचारच करत नाही.
  उदा – इस्त्री झाल्यावर प्लग पिन सुद्धा काढून ठेवणे, शाळेच्या आवारात शाळा सुटल्यावर डझन भर व्हॅन्स, गाड्या उभ्या असतात, त्या बिनदिक्कत रिव्हर्स घेतात आणि लहान लहान मुले आपापल्या गाड्यांकडे पळत जाण्याच्या नादात असतात इ इ

  Posted by आरती | सप्टेंबर 11, 2009, 2:31 pm
 2. Inablity of teachers to anticipate reaction of students is the cause of stamped.

  Posted by Manohar W. Rawool | सप्टेंबर 13, 2009, 12:50 सकाळी
 3. दुर्दैवाचा फेरा ! बाकी काही नाही. समर्थांनी म्हंटलंय’ अखंड असावे सावधान—-“

  Posted by savadhan | फेब्रुवारी 20, 2010, 3:47 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: