.
Science

चंद्रयान-1! यशोगाथा की नुसतीच पोकळ बढाई


मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात, भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या, चंद्रयान-1  या अवकाश उपकरणाला  घेउन जाणार्‍या रॉकेटचे उड्डाण, श्रीहरीकोटा येथून झाले. तेंव्हापासूनच या उड्डाणाच्या आणि या अवकाश उपकरणाच्या यशाबद्दल अनेक शंका कुशंका घेणे सुरू झाले. 29 ऑगस्टला, या चंद्रयानाचा, अवकाश संस्थेबरोबर असलेला संपर्क पूर्णपणे थांबला व ही चंद्र मोहिम ठरलेल्या दोन वर्षांच्याऐवजी, 10 महिन्यातच संपली. या सफरीचे यश किती? किंवा यश आहे की अपयश? याबाबत इतक्या उलटसुलट बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत की सत्य परिस्थिती काय आहे याचे आकलनच होत नाही असे मला वाटले व मी जालावर शोधाशोध करण्यास सुरवात केली. हा लेख माझ्या या शोधाशोधीचे  फलित आहे.

थोडक्यात सांगायचे तर ही मोहिम सुरू करताना शास्त्रज्ञांच्या समोर जी काही ध्येये होती त्यातील बहुतेक या चंद्रयानाने गाठली आहेत असे वाटते. परंतु या मधून जी माहिती (डेटा) मिळाली आहे त्याचे विश्लेषण अजून झालेले नाही व ते झाल्यावरच ही मोहिम फत्ते झाली किंवा नाही याचे पूर्णपणे आकलन होईल.

94713_chandrayan1willgetwithin500kmofthemoontoday

शास्त्रीय प्रयोगांच्या व्यतिरिक्त, या मोहिमेपुढे असलेली व पूर्ण झालेली धेये अशी आहेत.

1. चंद्रयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या बाहेर नेऊन चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत नेणे व चंद्राभोवती एका ठराविक उंचीवर प्रदक्षिणा घालेल असे नेऊन ठेवणे.

2. आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनच्या आकाराचा व भारताचा ध्वजाचे चित्र असलेला इंम्पॅक्टर, चंद्राच्या पृष्ठभागावर नेऊन ठेवणे. भविष्यकालात चंद्रावरची खनिजे किंवा इतर काही स्त्रोत पृथ्वीवरील राष्ट्रांच्यात वाटून घ्यायचे ठरले तर भारताने हा इंम्पॅक्टर चंद्राच्या पृष्ठभागावर नेऊन ठेवलेला असल्यामुळे त्याला या खनिजांवर हक्क प्राप्त होतो. आतापर्यंत, अमेरिका, रशिया व युरोपियन अवकाश संस्था यांनीच असे इंम्पॅक्टर चंद्राच्या पृष्ठभागावर नेऊन ठेवले आहेत.

3.चंद्रयानावर, निरनिराळ्या खंडातील राष्ट्रांनी तयार केलेली उपकरणे बसवलेली होती. त्यामुळे ही एक खरी आंर्तराष्ट्रीय मोहिम होती. या सर्व उपकरणांचे उत्कृष्ट एकत्रीकरण करून ती व्यवस्थित चालतील अशी व्यवस्था करणे आवश्यक होते. अवकाश संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ही जबाबदारी पूर्णपणे पेलली व या उपकरणांनी, चंद्राजवळ आपले कार्य उत्तम रित्या केले.

या चंद्रयानाने खालील प्रयोगांचा डेटा पृथ्वीवर पाठवला आहे.

1. चंद्राच्या छायेत असलेल्या पृष्ठभागावरील खोल खाचखळग्यांच्यात पाणी आहे का? याचा रडारच्या सहाय्याने शोध घेणे.

अमेरिकेतल्या ह्यूस्टनमधील ‘ल्यूनर ऍन्ड प्लॅनेटरी इन्स्टिट्यूट’ या संस्थेचे श्री. पॉल डी. स्पडीस म्हणतात की चंद्रावरील खोल खळग्यांची इतकी सुंदर छायाचित्रे मी आधी कधीच बघितली नव्हती.

2. चंद्राचा त्रिमितीतील नकाशा तयार करणे.

3. चंद्रावरच्या स्त्रोतांचा (रिसोर्सेस) शोध घेणे.

_46295776_launch3ap226

या चांद्रमोहिमेत आलेल्या अडचणी अशा होत्या.

1.उड्डाणाच्या वेळी रॉकेटच्या इंधनातील गळतीमुळे उड्डाण रद्द करण्यापर्यंत वेळ आली होती.

2 चंद्राजवळ पोचल्यावर काही महिन्यातच यानाची मुख्य पॉवर सप्लाय सिस्टीम बंद पडली. आपत्कालीन दुसर्‍या सिस्टीमवर चंद्रयान कार्यरत ठेवावे लागले.

3. चंद्राच्या पृष्ठभागावरच्या उष्णतेचे केलेले अंदाज पूर्ण चुकीचे ठरले. त्यामुळे यानावरील निरनिराळी उपकरणे बंद पडत राहिली. पण भारतीय अवकाश संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या विस्मयकारक कामगिरीने चंद्रयानाचे कार्य चालूच राहिले.

4. या उष्णतेमुळेच चंद्रयानाने बहुदा आपले कार्य 10 महिन्यानंतर थांबवले.

हा आढावा वाचल्यावर आपण आपली स्वत:ची अनुमाने काढू शकतो.

_46295867_chandrayancrater226

माझे स्वत:चे असे मत झाले आहे की चंद्रयान मोहिम ही बर्‍यापैकी यशस्वी झाली आहे. सर्व प्रथम चंद्रयानाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर काढून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालावयास लावणे, हेच मोठे महाकर्मकठिण काम होते. त्याचेच यश एवढे मोठे आहे की यानाचे आयुष्य 24 महिन्याऐवजी 10 महिन्यात संपले ही अत्यंत किरकोळ बाब वाटते. अमेरिका व रशिया या देशांच्या पहिल्या चंद्रयानांना, हे शक्यच झाले नव्हते. कित्येक अपयशानंतर त्यांना हे साध्य झाले होते. चीनला हे पहिल्या प्रयत्नातच शक्य झाले होते पण त्यांचे यान चंद्राभोवती फक्त प्रदक्षिणा घालण्यातच यशस्वी झाले होते.

तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर इंम्पॅक्टर नेऊन ठेवल्याने, भारताला आंर्तराष्ट्रीय समुदायात एक मानाचे स्थान प्राप्त झाले आहे ही गोष्टही सत्यच आहे. आतापर्यंत, अमेरिका, रशिया, युरोपियन अवकाश संस्था व भारत एवढ्या चारच राष्ट्रांना, ही गोष्ट करून दाखवता आली आहे. चंद्रयान मोहिमेच्या वेळी परदेशातील वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्या आणि भारताचे झालेले कौतुक मी तिथेच असल्याने बघितले होते

एकाच मोहिमेत ही दोन्ही उद्दीष्ट्ये पार पाडणे दुसर्‍या कोणत्याच राष्ट्राला आतापर्यंत शक्य झाले नव्हते. भारतीय शास्त्रज्ञांनी हे करून दाखवले. ही मोहिम ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे व अंदाजपत्रकाप्रमाणे पार पाडण्यात आली हे ही विशेष आहे.

चंद्रयानावरील सर्व प्रायोगिक उपकरणे, 10 महिने चालू ठेवण्यात, भारतीय शास्त्रज्ञांना अनेक अडचणी येऊन सुद्धा शक्य झाले ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे.

राजाचा मृत्यू झाला आहे. राजा चिरायू होवो! या प्रसिद्ध वाक्याच्या धर्तीवर, भारतीय अवकाश संस्थेच्या एका शास्त्रज्ञाने केलेले विधान “ चंद्रयान मृत्यू पावले आहे. चंद्रयान चिरायू होवो!” या पहिल्या चंद्रयानाच्या मोहिमेचे यश व पुढचे भारतीय चंद्रयान, थोड्याच कालावधीत असलेल्या उड्डाणाच्या (2011 मधे) तयारीत आहे या दोन्ही गोष्टी योग्य रित्या दर्शवते.

10 सप्टेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “चंद्रयान-1! यशोगाथा की नुसतीच पोकळ बढाई

  1. You have forgot to mention that trajectory of chandrayan was different from moon probes of other countries.

    Posted by Manohar W. Rawool | सप्टेंबर 12, 2009, 12:42 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: