.
ताज्या घडामोडी Current Affairs

कुंपणाने शेत खाल्ले!


आंध्र प्रदेश या दक्षिण भारतीय राज्यात, तिरुमाला या नावाच्या अतिशय निसर्गरम्य अशा टेकड्या आहेत. या टेकड्यांच्यावर सुप्रसिद्ध व लोकप्रिय असलेले तिरुपतीचे मंदीर आहे. पंढरपूरच्या विठोबाप्रमाणेच या मंदीरातली व्यंकटेश्वराची मूर्ती काळ्या पाषाणाची बनवलेली आहे. दर रोज अंदाजे 1 लाख भाविक व्यंकटेश्वराचे दर्शन करण्यासाठी तिरुपतीला भेट देतात. रोम मधे असलेल्या व्हॅटिकनच्या खालोखाल, तिरुपतीचे हे मंदीर जगातील अत्यंत श्रीमंत मंदीर म्हणून गणले जाते.

tirumala hills

व्यंकटेश्वर हा देव, भक्तांना इहलौकिक संपत्ती देणारा म्हणून मानला जातो. प्रत्यक्षात मात्र भक्तजनच या देवळाला आपली संपत्ती दान करताना दिसतात. या देवळात ‘हुंड्या’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या मोठमोठ्या लोखंडी पेट्या ठेवलेल्या आहेत. या हुंड्यांच्यात, भाविक, सोन्याची नाणी व बिस्किटे, चांदीच्या लगडी, हिरेजडीत दागिने आणि मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम टाकत असतात. हे देवस्थान एवढे श्रीमंत आहे की या देवळाच्या मालकीचे असलेले फक्त सोनेच 11 टनाहून आधिक आहे.

tirupathi

आंध्र प्रदेशाच्या हाय कोर्टात एका भक्ताने, काही दिवसापूर्वी एक याचिका दाखल केली होती. या देवस्थानातील पुजारी वर्ग, या देवस्थानाच्या जवळ जवळ 50,000 कोटी रुपयाच्या संपत्तीचा गैरव्यवहार करण्यात गुंतलेला असून देवस्थानातील हिशोबांत गोंधळ असून जबाबदार अशी कोणीच व्यक्ती नसल्याने कोर्टाने हस्तक्षेप करून गैरव्यवहाराला प्रतिबंध करावा असे या याचिकेचे स्वरूप होते.

ही याचिका कोर्टाने विचारासाठी दाखल करून घेतली व ‘तिरुपती-तिरुमाला देवस्थानम’या ट्रस्टच्या व्यवस्थापनेखाली असलेल्या तिरुपती व इतर सर्व मंदीरांच्या मालकीचे जडजवाहिर व इतर संपत्ती याची मोजमाप व गणती करावी असे आदेश दिले.ही गणती करत असताना, या याचिकेत म्हटल्याप्रमाणे, मोठ्या प्रमाणात गैर-व्यवहार आढळून आल्याने, देवळांतील जडजवाहिर्‍याचे खजिनदार, श्री. वेंकटरमण दिक्षितलु यांना पोलिसांनी नुकतीच, अटक केली. त्यांच्यावर देवस्थानाचे जडजवाहिर गहाण टाकल्याचा संशय आहे. ही बातमी समजताच भक्तांच्यात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होईल याची कल्पना असल्याने, ‘तिरुपती-तिरुमाला देवस्थानम’ ट्रस्टचे पब्लिक रिलेशन्स ऑफिसर श्री. टी. रवी यांनी बरीच सारवासरव करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते श्री. वेंकटरमण दिक्षितलु हे व्यंकेटश्वर मंदीराचे पुजारी नसून काही छोट्या देवळांचे खजिनदार आहेत.

कुंपणाने शेत खाल्ले अशी एक गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहेच. या म्हणीची प्रचितीच ‘तिरुपती-तिरुमाला देवस्थानम’ च्या पुजारी वर्गाने आणून दिली आहे यात शंकाच नाही.

7 सप्टेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

नुकतीच प्रकाशित केलेली ब्लॉगपोस्ट्स

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

%d bloggers like this: