.
ताज्या घडामोडी Current Affairs, People व्यक्ती

“गर्वसे कहो हम कंजुष है”


तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण भारतातल्या एका अतिशय वेगाने वाढणार्‍या, डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या साखळीत काम करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याला ही शपथ घ्यावी लागते. मी बोलतो आहे बिग बझार या दुकानांच्याबद्दल. या दुकानांना आधी हेटाळणीपूर्वक आणि नंतर कौतुकाने भारतीय वॉल मार्ट म्हणून संबोधले जाऊ लागले आहे. पाच दहा वर्षांपूर्वी ग्राहकोपयोगी आणि वाणी सामान रिटेलिंग करण्याच्या उद्योगात अनेक उद्योग समुहांनी उडी घेतली होती. यातल्या बहुतेकांनी धंद्यात चांगलीच खोट खाल्ली. पैशांचे जबरदस्त पाठबळ असणारे रिलायन्स सारखे काही कसेबसे टिकून आहेत. या पार्श्वभूमीवर बिग बझारचे यश जास्तीच डोळ्यात भरण्यासारखे आहे.

मागच्या वर्षी बिग बझार दुकानांनी एकूण 1.5 बिलियन यू.एस. डॉलर्स एवढ्या किंमतीची वार्षिक उलाढाल केली. 250 मिलियन खरेदीदारांनी या दुकानांना भेट दिली. पॅन्टलून इंडिया हा उद्योग समूह ही दुकाने चालवतो. या समुहाचे प्रमुख श्री बियाणी यांचे असे स्पष्ट मतच आहे की भारतीय ग्राहक हा वस्तूंच्या किंमतींच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असतो. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे पैसे वाचवण्याच्या बिग बझारच्या संस्कृतिमुळे ते वस्तूंच्या विक्रीच्या किंमती आणखी खाली आणू शकतात. बिग बझारची पैसे वाचवण्याची संस्कृति अगदी बारीक बारीक गोष्टींतून सुद्धा दिसून येते, बिग बझारच्या ऑफिसांना भेट देणार्‍यांना चहाचा कप अर्धाच भरलेला मिळतो. त्यांचा कोणताच कर्मचारी विमानाने बिझिनेस क्लासने कधीच प्रवास करत नाही. कोणताही कर्मचारी कधीच तुम्हाला जॅकेट किंवा टाय लावलेला आढळणार नाही. स्वत: बियाणीच हाफ शर्ट व पॅन्ट याच वेशात नेहमी असतात. कंपनीसाठी प्रवास करून आलेल्या प्रत्येक कर्मचार्‍याला प्रवास खर्च परत मिळण्याआधी हा प्रवास खरोखरच जरूरीचा होता का? या प्रश्नाचे लेखी उत्तर व्यवस्थापनाला द्यावे लागते. कंपनीच्या ऑफिससाठी लागणारी जागा कमीत कमी क्षेत्रफळाची असावी या कडेही कंपनी लक्ष देते. मुख्य कचेरीत जास्त जागा आहे हे बघितल्यावर तिथल्या 400 लोकांत दुसरीकडच्या ऑफिसांतले 260 लोक आणून बसवले गेले व जागेचा जास्तीत जास्त उपयोग कसा केला जाईल हे बघितले गेले.

big-bazaar

बिग बझारची दुकाने उत्तम प्रकाशयोजना असलेली व वातानुकुलित असली तरी ग्राहकांच्या ढकलगाड्या जेमतेम जातील एवढेच अंतर मधे ठेवून सामानाची शेल्फ्स मांडलेली असतात. पण ग्राहकांचे मानसशास्त्र मात्र ही दुकाने बरोबर ओळखतात. धान्ये मोठ्या पोत्यांच्यातून उघडीच ठेवलेली असल्याने ग्राहकांना त्यात हात घालून बघता येतो. बटाट्यांना नेहमीच माती असते, ज्यायोगे हे बटाटे नुकतेच शेतावरून आले असावेत असे वाटते. किंवा काही कुजलेले कांदे काळजीपूर्वक जमिनीवर पडलेले दिसतील असे बघितले जाते. त्यामुळे वर पेटीत ठेवलेले कांदे चांगले आहेत याची गिर्‍हाईकाला खात्री वाटते. स्वैपाकांच्या पळ्या, चमचे, झारे हे प्लॅस्टिकच्या आवरणात कधीच नसतात. गृहिणींना ते हातात धरून किती उपयोगी आहेत हे अजमावता येये. कोपर्‍यात ठेवलेल्या एका छोट्या चक्कीत ग्राहक थोडेसे धान्य दळून त्याचे पीठ कसे होते आहे हे बघू शकतो.

bigbazar2

काही छोट्या छोट्या गोष्टींत लक्ष घालून, दुकाने चालवण्याचा खर्च कसा कमी करता येईल हे बघितले जाते. दुकानांचे तपमान थोडे जास्त ठेवणे, पाण्याची नासाडी टाळणे, पॅकिंग मटेरियल परत वापरणे, भंगार विक्री करणे या सारख्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात.

वॉल-मार्ट, टेसको, काफू, सारख्या अनेक मोठ्या आंर्तराष्ट्रीय कंपन्या, भारतातील धंद्यात कधी उतरता येईल याची आतुरतेने वाट पहात आहेत. आज ना उद्या त्यांना सरकारी परवानगी मिळेल पण भारतात येण्याआधी बिग-बझारच्या कार्यपद्धतीचा त्यांनी थोडा अभ्यास केला तर ते त्यांना आणि मुख्य म्हणजे भारतातल्या ग्राहकांनाही फायदेशीर होईल.

31 ऑगस्ट 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on ““गर्वसे कहो हम कंजुष है”

 1. मस्त जमलय !

  तुम्ही सेल्स आणि मार्केटींगवर खुप छान लिहिता…

  Posted by सतिश गावडे | ऑगस्ट 31, 2009, 12:58 सकाळी
 2. चंद्रशेखरजी,
  रोजच्या पेपरची वाट पहावी,तशीच आता तुमच्या या ब्लॉगवरील लेखांची वाटही मोठया उत्सुकतेने पाह्यली जाते.आपण विविध विषयांवर अगदी ओघवत्या भाषेत लिहीत असता. आपल्याला एक विनंति आहे, आपण रविवारच्या म.टा.किंवा सकाळ,लोकसत्ता अशा वृत्तपत्रांमध्येही लिहीलेत तर आणखी अनेक वाचकांपर्यंत पोहचु शकाल, अशांपर्यंत की ज्यांना नेटचा वापर शक्य नाही किंवा या माध्यमाची गोडी नाही.
  मला हे सुचवावेसे वाटले कारण माझ्या वडिलांना (वय ८३) मी आपले लेख ऑनलाईन वाचायला दिले;ते त्यांना फार आवडले पण आता मात्र मला रोज एक़ प्रिंट आउट काढून द्यावा लागतो कारण ‘ वाचन कसं छान सवडीने ,आरामखुर्चीत रेलून करावं म्हणजे ते नीट एन्जॉय करता येतं ‘यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.किमान एखाद्या दिवाळी अंकात तरी आपण लिहावं अशी आग्रहाची विनंति आहे.

  Posted by nimisha | सप्टेंबर 1, 2009, 5:08 सकाळी
 3. काका
  मी आपला नेहमीचा वाचक आहे. keep writting.
  राजीव

  Posted by REMESH | सप्टेंबर 4, 2009, 6:59 pm
 4. Dear Mr.Chandrasekhar I realy admires your perfection & study in this articles because I am supplier for wall mart & tesco in UK Realy its great observation

  Posted by sunil shinde | सप्टेंबर 14, 2009, 3:09 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: