.
ताज्या घडामोडी Current Affairs

व्हिव्हाम इंडियन टी.व्ही. मॅगरो


वरचे शीर्षक वाचून तुम्ही नक्की बुचकळ्यात पडाल. तुम्हाला वाटेल की ही काय नवी भानगड आहे. परंतु पोर्तुगीज भाषेतले हे एक साधे वाक्य आहे. मायबोलीत याचा अर्थ होतो की ‘इंडियन टी.व्ही वरच्या सिरियल्स (SitComs) चिरायू होवोत. अर्थात एक गोष्ट आधीच कबूल करतो की मला पोर्तुगीज भाषा येत नाही. वरील वाक्यात काही चूक असली तर प्लीज दाखवून द्या. मी लगेच सुधारणा करीन. आता कोणाला असे वाटणे साहजिकच आहे की पोर्तुगीजमधले हे वाक्य मी शीर्षक म्हणून कशाला दिले आहे. त्याचे कारण देण्याआधी जरा खालचे चित्र बघा.

0,,21676701,00

काय वाटते हे चित्र बघून! हा शॉट आपल्या देसी टी.व्ही. वर चोवीस तास चालू असलेल्या ‘ मैं बोगनवेल तेरे आंगनमें ‘ टाइप सिरियलमधला नक्की असणार. पण तुमचा अंदाज पूर्ण चुकीचा आहे.

हा शॉट आहे ब्राझिलमध्ये सध्या एकदम हिट असलेल्या ‘ कॅमिन्हो डेज इंडियाज ‘ (Caminho das Indias) या सिरियलमधला. ही सिरियल पोर्तुगीज भाषेत आहे.(परत भाषांतराबद्दल शंका!) या नावाचा अर्थ होतो भारतीयांची पद्धत (Way of the Indias). ब्राझिलमधल्या टी.व्ही सिरियल्स निदान 200 भागांच्या तरी असतातच. तशीच ही पण आहे आणि गेले सहा महिने चालू आहे. प्रेक्षकांच्या मते या सिरियलमधे उत्साह आणि जोष आहे. अंदाजे 4 कोटी ब्राझिलियन तरी ही सिरियल बघतात.

0,,21689214,00

या सिरियलमधे,  गुलाबी भिंतींची घरे, चमचम करणार्‍या साड्या, बॉलीवुडचे नाच, सर्व काही आहे. या सिरियलमधे सुद्धा, ‘आनंद’ या नावाची एक मोठी फॅमिली आहे. टोनी रॅमोस हा साठ वर्षाचा आणि ब्राझिल टी.व्ही.वरचा एक बडा नट या कुटुंबाचा (अर्थातच परंपरावादी) प्रमुख आहे. या शिवाय माया नावाची एक उच्चवर्णीय तरुणी आणि बहुआन नावाचा एक छानछान दिसणारा दलित तरूण यांची प्रेमकहाणी व त्याला इतर कुटुंबियांचा असणारा विरोध हा यात आहेच. रॅमोसच्या मताप्रमाणे, या गोष्टीत, घरातील मोठ्या माणसांबद्दल जो आदर दाखवला जातो तो पाश्चिमात्य सिरियल्सपेक्षा अगदीच निराळा असल्याने ब्राझिलियन्सना आवडतो आहे.

0,,21679695,00

या सिरियलचे 3 आठवड्याचे शूटिंग़ राजस्थान, जयपूर, आग्रा येथे केले आहे. या शिवाय रॅमोस आणि इतर नट नट्या यांनी योगाचे, ध्यानाचे आणि भारतीय नृत्याचे धडे पण भारतात घेतले आहेत. या शिवाय ‘ग्लोबो’ या स्टुडियोमधे अनेक भारतीय गावे व गंगा नदी पण शूटींगसाठी बनवण्यात आली आहे.

ही सिरियल इतकी लोकप्रिय होत चालली आहे की ‘अरे बाबा’ सारखे शब्द, लोक आपल्या बोलण्यात वापरू लागले आहेत. भारतीय नाचाचे क्लासेस, रिओ मधे चालू झाले आहेत. भारतीय कपडे दुकानात मिळू लागले आहेत. भारताबरोबर असलेले ब्राझिलचे राजनैतिक संबंध, नेहमीच उत्तम राहिलेले आहेत. पण या सिरियलमुळे सर्वसामान्य ब्राझिलियन्सचे भारताबद्दलचे कुतुहुल खूपच वाढत चालले आहे. अर्थात काहींच्या मते या सिरियलमधे दाखवला जाणारा दलितांबद्दलचा तिरस्कार फारच अतिरंजीत आहे.

0,,21679674,00

असे जरी सगळे असले तरी ही सिरियल भारतात दाखवली जाण्याची सुतराम शक्यता नाही. भारतीय वातावरणनिर्मितीसाठी आग्रा आणि जयपूर इथल्या शूटींगबरोबरच रिओ च्या समुद्रकिनार्‍यावरचे शॉट्सही या सिरियलमधे मधून मधून येतात. या बीचवर पहुडलेल्या अल्पस्वल्प वस्त्रांमधील अंगना भारतीय टी.व्ही वर दाखवले जाणे कठिणच आहे. सर्वात मुख्य म्हणजे ब्राझिलमधल्या प्रेक्षकांना मिटक्या मारत ही सिरियल बघता यावी म्हणून माया आणि बहावून यांच्या तले गरमागरम शॉट्स या सिरियलमधे असतातच. ते बघितले तर आपल्याकडच्या प्रेक्षकांना, टी.व्ही समीक्षकांना आणि सरकारी अधिकार्‍यांना बहुदा भोवळच येईल.

तेंव्हा आपण एवढेच म्हणूया की व्हिव्हाम इंडियन टी.व्ही. मॅगरो.

20 ऑगस्ट 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “व्हिव्हाम इंडियन टी.व्ही. मॅगरो

 1. Namaskar,

  I have gone through in a fast mode through your writings and must say you have good observations. Particularly this one. Because of my profession I have covered on video variety of unrelated seminars and subjects, there I heard interesting comments about India. Those comments in short are ” India is big warehouse, everything is available from needle to atomic bomb.” “One can not compare India with any other country in any and every matter or topics, India is a world out of this world, very complex, hard to grasp but easy to comment, but impossible to ignore.” Take the example of Swine flue world apart media coverage hours, medicine and related peripherals sold in last three months only in cities, but in small towns and villages no body knows what is Swine flue and what is Tamiflue and who is earning millions by killing the innocents. MERA BHARAT MAHAN ???????? in every aspects.

  Posted by VK | ऑगस्ट 26, 2009, 2:01 pm
  • Thanks for your comments. We Indians, for no reason, believe that there is no other country like India. No doubt, India has its unique features, but so also the other countries. I try & point out such highlights from other countries in my blogs.

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 26, 2009, 2:16 pm
 2. please do wite on kk…kkkk series in india so that our so called literate people will gain some knowledge

  Posted by sunil shinde | सप्टेंबर 14, 2009, 3:31 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: