.
ताज्या घडामोडी Current Affairs

कुजक्या अंड्यांच्या वासाचे घर!


समजा तुम्ही बॅंकेचे भले थोरले कर्ज काढून एखादी नवी सदनिका किंवा घर खरेदी केलेत आणि थाटामाटाने वास्तूपूजन वगैरे करून त्या घरात रहायला गेलात. थोड्याच दिवसात तुमच्या असे लक्षात येते की घराच्या भिंतींना कुजक्या अंड्यांचा वास येतो आहे. तुम्ही डीओडरंट मारा, धूप जाळा, तो काही केल्या जात नाहिये. आणखी थोड्याच दिवसात तुमच्या लक्षात येते की घरातल्या मंडळींना श्वास घ्यायला त्रास होतो आहे, अंगावर पुरळ उठते आहे. घरात नवीन बसवलेल्या ए.सी ची लोखंडी पार्टस गंजल्यासारखे वाटत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?

साहजिकच तुम्ही प्रचंड वैतागाल. डोक्यावरचे केस उपटाल. पण त्याने प्रश्न सुटणार नाही. मग तुम्ही घर विकून टाकण्याचा विचार कराल. तेंव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्या भागात नवीन बांधलेल्या बहुतेक घरांना हाच प्रॉब्लेम आहे आणि या घरांना गिर्‍हाईकच नाही.

220

मी वर केलेले वर्णन काही एखादी काल्पनिक कथा नाहीये. अमेरिकेतल्या 23 राज़्यांमधे  गेल्या दोन तीन वर्षांत बांधल्या गेलेल्या अनेक घरांना हा प्रॉब्लेम सतावतो आहे. इतकेच नव्हे तर आता या प्रॉब्लेमने गंभीर रूप धारण करण्यास सुरवात केली आहे. या संकटाचा विचार करण्यासाठी अमेरिकन कॉंग्रेसने 14 सदस्यांची एक समितीही नियुक्त केली आहे. या समितीच्या एका सदस्याला असे आढळले आहे की या घरात रहाणार्‍या लोकांना ब्रॉंकॉयटिस, न्यूमोनिया या सारख्या श्वसनसंस्थेच्या रोगांनी पछाडले आहे. डॉक्टर्स गरोदर स्त्रियांना, त्यांच्या पोटातील बाळांना इजा पोचू नये म्हणून घराबाहेर दुसरीकडे रहाण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. या समितीकडे आजतायागत 820 घरमालकांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. ही घरे बांधणार्‍या बिल्डर्सच्या विरूद्ध अंदाजे 2000 तरी खटले निरनिराळ्या कोर्टांच्यात दाखल झाले आहेत. नुसत्या एका फ्लॉरिडा राज्यात अशी 400 तरी वास येणारी अशी घरे आहेत आणि यांची दुरुस्ती करण्यास निदान 40 मिलियन डॉलर्स तरी खर्च करावे लागतील असा अंदाज आहे.

हा प्रॉब्लेम खरोखर आहे तरी काय? अमेरिकेतली किंवा युरोपमधली घरांची बांधणी आपल्या इथल्या घरांसारखी नसते. तिथली घरे बांधताना प्रथम पायाचे खड्डे घेतात व त्या खड्ड्यांत लाकडाचे मोठे खांब कॉंक्रीटमधे गाडतात. या लाकडी खांबांच्यावर घराचा सबंध लाकडी सांगाडा उभा केला जातो. भिंती बांधण्यासाठी सर्वात बाहेरील बाजूस प्लायबोर्डचे मोठे तक्ते या लाकडी सांगाड्यावर खिळ्यांनी ठोकतात. या तक्त्यांच्या आतील बाजूस जिप्सम या खनिजाचे दाबून तयार केलेले तक्ते बसवतात. यानंतर प्लंबिंगचे नळ, इलेक्ट्रिकल वायर्स वगैरे टाकल्यावर आतल्या बाजूस परत प्लायबोर्ड किंवा तत्सम तक्ते ठोकतात. या घाण वासाच्या प्रॉब्लेमचे मूळ भिंतीच्या आतील बाजूस बसवलेल्या जिप्समच्या तक्त्यात आहे.

Gypsum-Board

गेल्या चार पाच वर्षांपर्यंत जिप्समचे हे तक्ते अमेरिकेतच बनत असत. पण त्याची किंमत जास्त असल्याने बिल्डर्सनी हे तक्ते चीनहून आयात करण्यास सुरवात केली. आता असे लक्षात आले आहे की चिनी जिप्समचे हे तक्ते, सल्फर-डाय-ऑक्साइड हा वायू हवेत सोडत रहातात. हा वायू कुजक्या अंड्यांचा वास येणारा व त्याच्या आसपास असलेल्या धातूंवर गंज चढविणारा असतो. या जिप्समच्या तक्त्यांच्यापुढे प्लम्बिंग आणि वायरिंग केलेले असल्याने, त्याच्यावरही याचे दुष्परिणाम होत आहेत. या पूर्वी इतर काही चिनी उत्पादनात मोठे प्रॉब्लेम आढळून आले होते. दूध आणि टूथ पेस्ट आणि पाळीव प्राण्यांचे अन्न यात सापडलेले मॅलॅमिन ही याची उदाहरणे आहेत. पण ही सगळी उत्पादने दुकानांतून काढून टाकल्यावर हे प्रॉब्लेम संपले होते. परंतु या जिप्सम ड्रायवॉलचे अंदाजे 62 लाख तक्ते अमेरिकेत आयात केले गेले आहेत व ते भिंतीच्यां आतील बाजूस बसवलेले असल्याने या अडचणीवर उपाय शोधणे तितकेसे सोपे नाही.

drywall_detail

सुमारे 20 तरी चिनी जिप्सम ड्रायवॉलचे उत्पादक, हे सुवासिक(?) उत्पादन करत असावेत असा अंदाज आहे. या समस्येचे मूळ, चीनमधल्या शानडॉन्ग प्रांतातली ल्यूनेन्ग इथली जिप्समची खाण (Luneng mine in Shandong province)असावी असे वाटते. या खाणीतल्या जिप्सम खनिजामध्ये, गंधकाचे प्रमाण बरेच जास्त असते. चीनमधल्या जिप्सम ड्रायवॉलचे उत्पादक, हे खनिज, बहुदा गंधक काढून न टाकता तसेच वापरत असावेत. या उद्योगात, गुणवत्ता नियंत्रणाचा एकूण अभावच असल्याने, असे घडत असावे.

आता अमेरिकेतले अधिकारी, चिनी कंपन्या व तिथले सरकार, चर्चाचर्विरण करून कोण दोषी? कोणी नुकसान भरून द्यायचे? वगैरे ठरवण्याच्या मागे आहेत. त्यातून शेवटी काही मार्ग निघेलही.

परंतु ज्या हजारो घर मालकांना व त्यांच्या कुटुंबियांना गेली दोन तीन वर्षे नवीन घराचा आनंद लुटता न येता अतिशय मानसिक व शारिरिक त्रास सहन करायला लागला आहे त्याची भरपाई कोण करणार?

19 ऑगस्ट 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “कुजक्या अंड्यांच्या वासाचे घर!

  1. bhari aahe prakaran…!!

    Posted by mugdhamani | ऑगस्ट 19, 2009, 1:40 pm
  2. ऐकावं ते नवलच!

    Posted by आल्हाद alias Alhad | ऑगस्ट 19, 2009, 6:34 pm
  3. ज्यांना भिंतीवर सरपटणार्या पालींची भिती वाटते,अशा लोकांसाठी ही घरं उत्तम कारण पालीना पिटाळून लावण्यासाठी घरांत अंड्याचे कवच टांगुन ठेवावे असे म्हणतात…इथे तर चक्क कुजक्या अंड्यांचा वासामुळे संपूर्ण एरियाच ‘पाल’विरहीत होत असणार……..!

    Posted by nimisha | ऑगस्ट 19, 2009, 10:22 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: