.
Health- आरोग्य

खाण्याची फॅडे


मदर इंडिया या नावाचे एक मासिक काही वर्षांपूर्वी निघत असे. या मासिकाचे संपादक कै. बाबूराव पटेल ही व्यक्ती वीस पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत एक बरीच जानी-मानी व्यक्ती होती. ते राज्यसभेचे सभासदही काही वर्षे होते. ते डॉक्टर होते की नाही ते मला माहिती नाही. पण मदर इंडिया प्रॉडक्ट्स या नावाची एक कंपनी ते चालवत असत. या कंपनीने काढलेली होमिओपॅथिक औषधे अजूनही लोकमान्य आहेत. या बाबूराव पटेलांची मते बर्‍याच वेळा विक्षिप्तपणाकडे झुकणारी असली तरी पटत असत. तीन पांढरी विषे, हे असेच एक त्यांचे मत होते. साखर-मैदा-दुग्धजन्य पदार्थ या पदार्थांना ते या नावानी संबोधत असत व सर्वांनी या पदार्थांचे सेवन टाळावे असे त्यांचे मत होते. गाई-म्हशींना दूध त्यांच्या पाडसांसाठी येते; मानवांसाठी नाही असे ते सांगत.

glass-of-milk2

मला त्यांचे हे मत पटत असले तरी मी मुळात गोडघाश्या असल्याने साखर सोडून देणे मला कल्पनेतही कठिण वाटले. तेंव्हा सुरवातीला मैदा व दुग्धजन्य पदार्थ आपण सोडून द्यावे असे मी काही दिवसांपूर्वी ठरवले. मैदा सेवन सोडणे हे त्या मानाने सोपे आहे. पण दुग्धजन्य पदार्थांचे काय? अलीकडे सोयाचे दूध टेट्रापॅक मधील डब्यात सगळीकडे उपलब्ध असते ते मी वापरायला सुरवात केली. वर्ष भर तरी मी माझे हे फॅड चालू ठेवले. मध्यंतरी मला एक छोटासा अपघात झाला व अस्थिभंग झाल्याने कॅल्शियम जास्त प्रमाणात घेण्याची गरज आहे असे डॉक्टरांचे म्हणणे पडले. अर्थातच दुग्धजन्य पदार्थांचे सेवन परत चालू करणे भाग पडले. आता खरे सांगायचे म्हणजे मला दुग्ध्जन्य पदार्थ सेवन केले किंवा न केले तरी कोणताच असा फरक जाणवला नाही. त्यामुळे मी आता हे पांढर्‍या विषांचे फॅड डोक्यातून काढून टाकले आहे.

6a00d8341cedee53ef011570b9722d970c-800wi

तुम्ही विचाराल की हे सगळे मी तुम्हाला कशासाठी सांगत बसलो आहे? परवाच मला असे समजले की मी जरी हे फॅड सोडून दिले असले तरी माझ्यापेक्षा अनेक पटीनी जास्त कडक अशी खाण्याची फॅडे संभाळणारे अनेक फॅडिस्ट या जगात गेल्या काही वर्षातच निर्माण झाले आहेत. त्यांची संख्या आता बरीच जास्त झाली असल्याने त्यांना आता ऑर्थोरेक्सिक्स (orthorexics) या वैद्यकीय नावाने ओळखले जाते. काही वर्षांपूर्वी ही फॅडिस्ट मंडळी, एडनॉस (Ednos) या नावाने संबोधली जात असत. एडनॉस म्हणजे ‘इतर कोणत्याही प्रकारचा बिघाड न झालेले’ लोक. 1997 मध्ये कॅलिफोर्निया मधील एक डॉक्टर, स्टीव्हन ब्रॅटमन (Steven Bratman) याने या मंडळींना ऑर्थोरेक्सिक्स हे नाव दिले आणि त्यांचे वागणे हे एक प्रकारचा सौम्य मनोवैज्ञानिक आजारच आहे असे प्रतिपादन केले. ब्रॅटमनने या आजाराला ऑर्थोरेक्सिया नरव्होसा (orthorexia nervosa) असे नाव दिले आहे.

Young-woman-eating-bowl-o-001

या डॉक्टरच्या मताप्रमाणे, हा आजार झालेल्या लोकांना, आपल्या आरोग्यास अतिशय पोषक असेच अन्न फक्त आपण खाल्ले पाहिजे असे सतत वाटत असते. कोणते अन्न खायचे आणि कोणते नाही याबद्दल ते अतिशय आग्रही असतात. खाण्याबद्दलचे इतर मनोवैज्ञानिक आजार झालेल्या मंडळींना, किती प्रमाणात अन्न खावे हे कळत नसते. या उलट, ‘ऑर्थोरेक्सिक्स’ मंडळी, आपण जे अन्न खातो त्याची गुणवत्ता काय आहे व ते शुद्ध आहे की नाही हे सतत डोळ्यात तेल घालून बघत रहातात. कोणते अन्न किती शुद्ध आहे या बद्दल त्यांच्या असलेल्या समजुतीप्रमाणे, त्यांच्या आहारात ते खाद्यपदार्थ किती प्रमाणात घ्यायचे हे ते ठरवतात व त्यावर त्यांचे एकूण डाएट अवलंबून रहाते. हे लोक सुरवातीला, साखर, मीठ, कॉफी, मद्यार्क, गहू, यीस्ट, सोया, मका आणि दुग्धजन्य या सारखे पदार्थ खाणे बहुदा सोडून देतात. किंवा सेंद्रीय उत्पादने, रासायनिक खते किंवा जंतुनाशके न वापरलेले अन्न खाण्यावरही यांचा भर रहातो. खाद्यपदार्थांचा एक संपूर्ण वर्गसुद्धा (उदा. दुग्धजन्य पदार्थ) हे लोक त्याज्य समजू शकतात. यामुळे यापैकी काही जणांना कुपोषण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

हे लोक मुख्यत: मध्यम वर्ग व सुशिक्षितांपैकी असतात व निरनिराळी मासिके, वर्तमानपत्रे, इंटरनेटवरची संकेतस्थळे बघून कोणते अन्न चांगले व कोणते वाईट हे स्वत:च ठरवतात. व आपण चांगलेच अन्न खाल्ले पाहिजे असे ठरवून त्या पद्धतीने वागतात. त्यांच्या मताप्रमाणे जे अन्न शुद्ध असते, ते खरेदी करणे त्यांच्या खिशाला सहज पेलवते. आवश्यकता म्हणून डायेट करणारे लोक व हे ऑर्थोरेक्सिक्स यांच्यात अतिशय सूक्ष्म असा फरक असल्याने, या लोकांना आपल्याला काही आजार झाला आहे हे लक्षातच येत नाही. स्वत:च्या शुद्ध अन्न सेवनाबद्दल, या लोकांना उगीचच अभिमान वाटत रहातो व त्यामुळे त्यांचे इतरांशी असलेले त्यांचे वैयक्तिक संबंध किंवा सामाजिक संबंध दुरावतात किंवा खालच्या पातळीवर जातात. इतरांबरोबर कॉफी किंवा मद्यसेवन करण्याचा साधा आनंदही ते लुटू शकत नाहीत व ते समाजात एकटे पडत जातात. काही तज्ञांचे तर असे मत झाले आहे की आधुनिक समाज, अन्नसेवनाबद्दलचा  आपला रस्ताच चुकत चालला आहे. आहारतज्ञ, व्यायाम शिकवणारे तज्ञ, नवनवीन पुस्तके ही सगळी मंडळी या गोंधळात फक्त भर टाकत चालली आहेत.

तर थोडक्यात सांगायचे काय की मी सध्या तरी ऑर्थोरेक्सिक्स होण्यापासून थोडक्यात बचावलो आहे. तुम्ही पण जरा डोकावून पहा ना! कुठे बसताय का यांच्यात!

18 ऑगस्ट 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “खाण्याची फॅडे

 1. Baburao Patel was born in 1904 and died in 1982, and was mostly forgotten by the time of his death. Nothing in you article has any important linkage to the time-frame, so your points remain valid despite the contention that ‘he was famous 20-25 years ago’ being way off the mark; FYI he was very famous in 1940s and 1950s. Even in 1970s (30-35 years ago, that is) old-timers used to recall him as a legend in film journalism who was leading retired life away from the limelight.

  Posted by Anonymous | ऑगस्ट 18, 2009, 1:00 pm
  • ऍनोनिमसजी

   माझे पोस्ट बारकाईने वाचून अनवधानाने झालेली चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. मला असे म्हणायचे होते ही 20-25 वर्षांपूर्वीपर्यंत बाबूराव पटेल एक जानी-मानी व्यक्ती होते. मी पोस्टमधे बदल केला आहे.

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 18, 2009, 2:06 pm
 2. चंद्र्शेखरजी,
  ‘व्यक्ती तितक्या प्रक़ृती’ असं जे म्ह्टलं जातं त्यानुसारच ही खाण्याची फॅडं असतात..किंवा कधी कधी अचानक एखादा गंभीर आजार झाला की आपण खडबडुन जागे होतो आणि आपल्या चुकीच्या आहारामुळेच आपल्याला अमुक एक विकार झाला असं समजून काही चांगले तर काही आपण म्हटल्याप्रमाणे मनोविकाराच्या पातळीवर जातील इतके drastic बदल करतो.पण काही चांगल्या गोष्टींचा वापर निश्चितच फायदेशीर ठरतो हे मात्र मी आपल्याला सांगू शकते.
  मला गेली अनेक वर्षे कुठल्याही ऋतुबदलाच्या काळांत,प्रथम सर्दि,मग घसा खवखवणे,आणि शेवटी ताप या चक्रातून जाणं अंगवळणी पडलं होतं. पण ४ वर्षांपूर्वी मला क़ॅन्सरचा सामना करावा लागला आणि त्या दरम्यान नेटवर कुठे तरी हळदीमध्य़े anti-cancer गुण असल्याचं वाचनांत आलं.तेव्हापासुन मी रोज रात्री अर्धा चमचा हळद,थोडी साखर हे १ कप गरम दुधात घेते.आता यामुळे माझा कॅन्सर आटोक्यात येईल किंवा काय ते येणारा काळच ठरवेल…पण माझे नियमीत सोबती…सर्दी,खोकला आणि ताप हे मात्र आता फारच क्वचित भेटीला येतात.आपल्या माहीतीसाठी कळवलं..कुणाला उपयोग झाला तर ऊत्तमच!

  Posted by nimisha | ऑगस्ट 18, 2009, 6:35 pm
  • निमिषा

   आपल्या प्रतिसादाबद्दल खरोखरीच आभारी आहे. आपला अनुभव कोणा वाचकाला उपयोगी पडला तर उत्तमच होईल. मला फक्त एवढेच म्हणावेसे वाटते की आपण जी हळद दुधातून रात्री घेता ती एक औषध योजनाच आहे. आपण आपल्या आहारात काहीच ड्रास्टिक बदल केलेले नाहीत. त्यामुळे आपण ऑर्थोरेक्सिक्स नक्कीच नाही.

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 18, 2009, 7:46 pm
 3. नमस्कार,

  एकदम उत्कृष्ट लेख! एखादे विशिष्ट नियम केल्याने काही लोकांना उगीचच अभिमान वाटत राहतो, हे बर्‍याच बाबतीत होते. पण सगळेच प्रकार बरोबर की चूक हे मात्र वेळ देऊन अनुभवानेच कळू शकते. असे अनुभव लिहून ठेवणे व योग्य प्रकारे संकलित करणे गरजेचे आहे.

  आधीपासून जमाना होता सर्वाव्हल ऑफ फिट्टेस्ट चा. म्हणजे जो अधिक जगला, तो काहीतरी चांगलं खाऊन / वागून. नंतर जेव्हा माणूस डोकं लढवून सर्वाव्हल ची लढाई जिंकू लागला, तेव्हापासूनच काय वाईट काय चांगलं याचा जमाना आला आहे. त्यात वाईट काहीच नाही. पण अती करणे अथवा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवणे टाळावे. अर्थात हे सामान्य माणसाच्या हातात असते असे नाही.

  आता मला असे काही लोकं आठवले जे विगन आहेत. हा एक नविनच आलेला प्रकार आहे. पाहूया की खरोखरच अश्या गोष्टींचा फायदा होतो की नाही.

  धन्यवाद!

  Posted by प्रशांत | ऑगस्ट 21, 2009, 10:52 pm
 4. Baburao patel was perfect critic about this three white things as food manufacturar I still today will respect his judgement

  Posted by sunil shinde | सप्टेंबर 14, 2009, 3:50 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: