.
अनुभव Experiences

एक सुखद सकाळ


रोज सकाळी जाग आली की प्रथम मी खोलीची खिडकी उघडतो आणि बाहेर बघतो. आज सकाळी बाहेर बघताना रस्त्यावर नेहमीची वाहनांची गर्दी दिसत नव्हती. एकदम लक्षात आले की आज सुट्टी आहे. आकाशही अभ्राच्छादित होते आणि छान वारा सुटला होता. एकदम मनात आले की कुठेतरी बाहेर जायला किती छान हवा आहे! आश्चर्य म्हणजे घरातल्या बाकी सर्व मंडळींना बहुदा तसेच वाटले होते. त्यामुळे ईस्ट कोस्ट पार्कला ब्रंच घ्यायला जायचा बेत लगेचच ठरला. बच्चे मंडळींना तयार केले आणि आम्ही निघालो सुद्धा.

kallang_paya_lebar0.MainPar.0015.Image

मागच्या वर्षी एक नवीन जलद मार्ग वापरासाठी खुला झाला होता तो आम्ही बघितलाच नव्हता. त्यामुळे या नवीन मार्गाने म्हणजे ‘कालांग-पाया लेबॉ एक्सप्रेसवे’ने जायचे ठरले. 12 किलोमीटर लांबीच्या या 6 पदरी रस्त्याचा 9 किलोमीटर लांबीचा भाग पूर्णपणे जमिनीखालून जातो.

या रस्त्याने प्रवास करणे हाच एक मोठा सुखद अनुभव वाटला. पोटातले पाणी सुद्धा हलणार नाही इतका सपाट रस्ता. शास्त्रीय विचार करून केलेली दिव्यांची व्यवस्था व प्रत्येक एक्झिटच्या आधी व्यवस्थित पाट्या यामुळे जमिनीखालचा रस्ता आताच सुरु झाला असे वाटत असताना तो संपला देखील आणि आम्ही ईस्ट कोस्ट पार्क पर्यंत पोचलो देखील.

ecp2new

ईस्ट कोस्ट पार्क हा समुद्र किनार्‍याला लागून असलेला अंदाजे 15 किलोमीटर लांबीचा पार्क आहे. या पार्क मधे ‘बिग स्प्लॅश’ नावाचे एक नवीन क्रीडा केंद्र सुरू झाले आहे.

IMG_0023new

तिथे गाडी पार्क करून आम्ही आत शिरलो. अर्थातच सगळ्यांची पावले प्रथम बीच कडे वळली.

IMG_0024new

IMG_0053New

स्वच्छ पिवळट-पांढरी वाळू आणि मागे अतिशय नाजूकपणे किनार्‍यावर येणार्‍या लाटा हे या किनार्‍याचे वैशिष्ट्य आहे.

IMG_0057lowbit

त्यामुळे वाळूत हात खूपसून बच्चे मंडळींच्या बरोबर वाळूचे किल्ले बनवायला खूपच मजा येते. किनार्‍याच्या कडेने पळत सुटावे. मधूनच पाण्यात उभे राहून नाजूकपणे येणार्‍या लाटा पायावर झेलाव्यात. वेळ भरकन पुढेच सरकतो.

IMG_0056lowbit

पुष्कळ मंडळी स्वत:चे तंबू घेऊन येतात व किनार्‍यावर तो उभा करून त्यात आराम करतात.

IMG_0071lowbit

किनार्‍याच्याच कडेने एक रस्ता केलेला आहे. त्यावर जॉगिंग करणारे खूप जण दिसतात. इथे सिंगल सीट, डबल सीट अशा सायकली पण भाड्याने मिळतात. त्या घेऊन सायकली फिरवणारेही खूप जण दिसतात.

IMG_0072lowbit

वेळ कसा गेला ते जरी कळले नसले तरी पोटातले कावळे कोकलायला लागल्यावर आपसुकच पावले जरा पलीकडे असलेल्या कोणत्या तरी स्टॉलकडे वळतात. आम्हाला एक बिस्ट्रो सापडला. त्याच्याकडचा ब्रेकफास्टचा मेन्यू बघुनच तोंडाला पाणी सुटले.

IMG_0075lowbit

लोणी व जॅम लावलेले लुसलुशीत टोस्ट, स्क्रॅम्बल्ड एग्ज, बेकन, पॅनकेक्स, ऍपल ज्यूस आणि शेवटी इंग्लिश ब्रेकफास्ट टी चा कप असा मजबूत ब्रेकफास्ट झाल्यावरच सगळ्यांनी घड्याळ्याकडे बघितले.

IMG_0078lowbit

घड्याळ तर दुपारचे 12 वाजून गेल्याचे दाखवत होते.

13 ऑगस्ट 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “एक सुखद सकाळ

 1. चंद्र्शेखरजी,
  तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे हा जमीनीखालून जाणारा रस्ता नक्कीच छान असेल यांत वादच नाही.
  पण ९ क़ी.मी.चे अंतर जमीनीखालून पार करताना मात्र मला सतत दिवे गेले तर काय होईल या विचाराने पोटात गोळा येईल….ज्या लोकांना बंद जागा कींवा तळघराची भिती वाटते त्यांनी अशा रस्त्यांपासुन दूरच राहावे हे बरे!

  Posted by anjali | ऑगस्ट 16, 2009, 3:16 सकाळी
  • अंजली

   सिंगापूरमधे दिवे कधीच जात नाहीत. काही वर्षांपूर्वी एकदा काही मिनिटासाठी वीज बंद झाली होती तेंव्हा वीज कंपनीला सिंगापूर सरकारने काही मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावला होता. त्यानंतर वीज बंद असल्याचे मी तरी ऐकलेले नाही.

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 17, 2009, 2:22 pm
 2. bhariy.. photos apratim!

  Posted by bhagyashree | ऑगस्ट 20, 2009, 7:04 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: