.
ताज्या घडामोडी Current Affairs

जुळ्यांचे गाव


केरळ राज्यात उत्तरेच्या बाजूला, सुमारे पंधरा हजार लोकवस्तीचे, ‘कोडिंजी’ या नावाचे एक गाव आहे. केरळामधल्या इतर सर्वसाधारण गावांसारखेच हे गाव आहे. गावाच्या चारी बाजूंना हिरवीगार भात शेती दिसते. भातशेती असल्याने खाचरांच्यात पाणी नेहमी भरलेले असते. पावसाळ्यात तर गाव पाण्याने वेढले जाते व गावाशी संपर्क ठेवणेही कठिण जाते. या गावात जर तुम्ही गेलात तर आपल्याला ड्बल व्हिजनचा त्रास होतो आहे की काय असे तुम्हाला वाटल्याशिवाय रहाणार नाही.

twins2_1400310c

दोन हजार कुटुंबे रहात असलेल्या या गावात, तब्बल 230 जुळी भावंडे आहेत. या गावातील प्रत्येक एक हजार बालजन्मांच्यात 45 जुळी भावंडे जन्मतात. जगभरच्या सरासरीपेक्षा ही संख्या 6 पटीने जास्त आहे. गावातील सर्वात वयस्कर जुळी भावंडे आज 65 वर्षाची आहेत. 15 जून 2009 रोजी जन्मलेल्या रिफा आणि रिथा या भगिनी सर्वात छोट्या जुळ्या बहिणी आहेत. या गावात ‘कोडिंजी ट्विन्स ऍंड किन्स असोसिएशन’ (TAKA) या नावाची, जुळ्यांची एक संस्थाही आहे. या संस्थेच्या माहितीप्रमाणे, गरोदर असलेल्या 5 आणखी स्त्रियांना, जुळी मुले पुढच्या काही महिन्यात होणार आहेत.

INDIA-TWINS/

पाश्चिमात्य जगात आणि भारतातील शहरी भागांत विवाहाचे वय, मुलींचे करीयर वगैरे सारख्या अडचणींमुळे पुष्क़ळ जोडप्यांना अपत्यप्राप्तीसाठी गर्भ रहाण्यासाठीची औषधे किंवा कृत्रिम गर्भधारणा यासारखी वैद्यकीय मदत अलीकडे घ्यावी लागते. यामुळे अशा मदतीतून जन्माला येणार्‍या बालकांत, जुळ्या भावंडांचे प्रमाण आधिक असते. परंतु कोडिंजी गावातील बहुतेक तरुण तरुणी, 18 ते 20 वर्षांपर्यंतच विवाहबद्ध होतात व त्यांना होणारी बालके ही कुठल्याही कृत्रिम उपायांशिवायच जन्मलेली असल्याने येथे जुळ्यांचे प्रमाण एवढे जास्त का आहे? हे अजून कोणालाच उमगलेले नाही. कोडिंजी गावात जन्माला येणारी बहुतांशी जुळी भावंडे ही एकासारखी न दिसणारी, असतात म्हणजेच ती निरनिराळ्या गर्भांपासून जन्मलेली असतात. (सारखी दिसणारी जुळी भावंडे एकाच गर्भाचे विभाजन झाल्यामुळे जन्मतात.) पाश्चात्य व शहरी लोकांच्या आहारात दुग्धजन्य पदार्थ खूप असतात. येथले लोक असा कोणताही विशेष आहार घेत नाहीत. कोडिंजी गाव तसे एकाकी आहे. गावातील लोकांना कोणतीच धोकादायक औषधे किंवा जंतुनाशके यांचा सामना करावा लागत नाही. त्यामुळेच येथे एवढी जुळी मुले का? हा डॉक्टर्सना पडलेला प्रश्नच आहे. काही लोकांना हा कोडिंजीच्या पाण्याचाच गुण आहे असे वाटते. परंतु याला अजूनतरी कोणताच शास्त्रीय आधार सापडलेला नाही.

LIFE-US-INDIA-TWINS

इतकी जुळी भावंडे या छोट्याश्या गावात असल्याने गावात गोंधळ, गंमत होण्याचे बरेच प्रकार सारखेच घडत असतात. बहुतेक भावंडांची नावे सारखीच असतात व ते सर्वसाधारणपणे सारखेच कपडे घालत असल्याने पालकांचा सुद्धा कोण झोपले आहे? आणि कोण खेळते आहे? हे सांगताना गोंधळ उडतो. शाळेत शिक्षकांचा सुद्धा असाच गोंधळ उडतो. पुष्कळदा ही भावंडे आजारी पण एकदमच पडतात. अर्थात त्यांच्यात फरक पण असतातच. एकाला क्रिकेट आवडत असले तर दुसर्‍याला फुटबॉल आवडतो.

या गावातल्याच अजमेर नावाच्या 12 वर्षाच्या मुलाची दुसरीच व्यथा आहे. तो म्हणतो की सगळे लोक गावातल्या जुळ्या भावंडांनाच महत्व देतात. आम्हाला कोणी विचारतच नाही.

8 ऑगस्ट 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “जुळ्यांचे गाव

 1. gammatach aahe nahi…

  Posted by Aparna | ऑगस्ट 8, 2009, 12:23 pm
 2. Solapurchi ek shala aahe tithe tabbal 14 juli mule aahet. Shikshakanchich pariksha! Malasudha julya muli aahet , 2 varshanchya.

  Posted by Leena | जुलै 14, 2010, 9:05 सकाळी
  • लीना

   फारच रोचक माहिती. तुमच्या शाळेबद्दल माहिती व फोटो पाठवलेत तर मी ब्लॉगमधे Add करू शकतो किंवा नवीन पोस्ट लिहू शकतो. माहितीबद्दल धन्यवाद

   Posted by chandrashekhara | जुलै 14, 2010, 9:22 सकाळी
 3. wah ! khupach chan gaon aahe, mala pan juli mule avadtat.

  Posted by Sampat | मार्च 20, 2012, 1:29 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: