.
History इतिहास

पेशव्यांचे मराठी सैन्यदल


लहान असल्यापासून आपण सर्वजण, मराठ्यांचा इतिहास ऐकतो आणि वाचतो. ज्या मराठी सैन्याने दिल्लीपर्यतचा प्रदेश पादाक्रांत केला होता व नंतर ज्या सैन्याला इंग्रजांकडून पराभव पत्करावा लागला होता, ते मराठी सैन्य होते तरी कसे? त्याची अधिकार-साखळी (Chain of Command) कशी असायची? त्यांची शस्त्रे काय असत? ते दिसत कसे असे? त्यांचे कच्चे दुवे कोणते होते? या बद्दल मला नेहमीच जबरदस्त कुतुहुल होते व त्याबद्दल माहिती करून घेण्याचीही इच्छा होती.

मला सैनिकी आयुष्याची थोडीफार आवड तशी प्रथमपासूनच असल्याने, मी शाळा कॉलेजात असताना N.C.C.चा कॅडेट चार पाच वर्षे तरी होतो. N.C.C.च्या या शिक्षणात, परेड करणे, रायफल व मशिन गन चालवणे, मॅप रिडिंग करणे यासारख्या सैनिकी कला, थोड्याफार आत्मसात करण्याची संधीही मला मिळाली होती. तसेच वर्षातून एकदा दहा बारा दिवस होणार्‍या कॅम्प्समधे मी सैनिकी जीवनही अनुभवले होते. त्यामुळेच आधुनिक भारतीय सैन्याबद्दल, मला प्राथमिक तरी माहिती आहे असे नक्कीच म्हणता येईल. सैन्य किंवा सेनादल म्हटले की साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर, 26 जानेवारीच्या परेडमधे शिस्तबद्ध रितीने चालणारे जवान उभे रहातात. त्याच वेळी बहुदा ती जवानांची तुकडी कोणत्या पथकातील आहे? त्यांनी कोणत्या लढायांच्यात मर्दुमकी गाजवली वगैरेची वर्णने आपल्याला रेडियो किंवा टीव्हीवर ऐकायला मिळतात.

आधुनिक भारतीय सैन्यदले जरी कितीही प्रभावी आणि शक्तीशाली असली तरी त्यांची मूळ बैठक ही इंग्रजांनीच बसवलेली आहे हे नाकारणे शक्य नाही. त्यांच्या सर्व जुन्या तुकड्या, मराठी सैन्यासकट इतर अनेक सैन्यांबरोबर इ.स. 1700 ते 1800 मधे लढलेल्या आहेत. त्यामुळेच आधुनिक भारतीय सैन्याबद्दल कितीही माहिती असली तरी त्यावरून मराठी सैन्याची कल्पना करणे केवळ अशक्य आहे. मध्यंतरी मला एक जुना संदर्भग्रंथ सापडला आणि माझ्या बर्‍याच दिवसांच्या या कुतुहलाचे समाधान झाले.

जेम्स फोर्ब्स या सोळा वर्षाच्या इंग्रज तरुणाला, इ.स 1764मधे, कंपनी सरकारच्या मुंबई किल्यात, लेखक म्हणून नोकरी मिळाली. तो चित्रेही उत्तम काढत असे. इ.स 1784मधे जेम्स इंग्लंडला परत गेला. तो सैनिक कधीही नव्हता. त्या काळची परिस्थिती, सैन्याच्या मोहिमा, वगैरे गोष्टींबद्दलचे रेकॉर्ड लिहिण्यासाठी त्याची नेमणूक झाली होती. या काळात काही वर्षे त्याला इंग्रजी सैन्याबरोबर रहावे लागले. या कालात इंग्रजी सैन्य बर्‍याच वेळा मराठी सैन्याबरोबर, हैदर अली, टिपू सुलतान, निझाम यांच्या सैन्यांविरूद्ध लढले. याच कारणामुळे, जेम्सला मराठी सैन्य जवळून बघता आले. या कालातील मराठी सैन्य, सेनापती, आणि मराठी शासनयंत्रणा या बद्दलचे त्याचे निरिक्षण, सत्याला बरेच धरून असावे असे म्हणूनच मला वाटते.

मराठी सेनादल

मराठी सेनादल हे अनेक धर्मांच्या आणि अनेक देशांच्या सेनांचे मिळून बनलेले असते. त्यामुळे त्याच्यात एकसंधीपणाच नाही असे कोणाला वाटल्यास नवल नाही. त्यांना एक ठराविक असा गणवेश दिलेला नसतो आणि त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून त्यांच्यात फारशी शिस्त नसावी असेच बघणार्‍याला वाटते. चिलखतधारी सैनिक खूपच वैशिष्ट्यपूर्ण दिसतात. त्यांच्या डोक्यावरचा जिरेटोप कानावरून असतो व जवळ जवळ खांद्यापर्यंत येतो. अंगरखा कापसाच्या जाड रजईसारखा बनवलेला असतो व याच्यावर लोखंडी साखळ्यांची जाळी बसवलेली असते.

B000GBB0I4.01-A2HVZT81H1J2HN._SS500_SCLZZZZZZZ_V65169937_

मराठा सैनिक

सेनादलातील तुकड्या

हिंदुस्तानातील ज्या जातिजमातींचे लोक लढवय्ये म्हणून ओळखले जातात, असे सर्व हिंदू व मुसलमान लोक, सैन्यात पराक्रम गाजविण्यासाठी मोठे उत्सुक असतात. पेशवे स्वत: ब्राम्हण असले तरी त्यांनी सैनिकी पेशा पूर्णपणे अंगिकारलेला आहे. त्यांचेच अनुकरण करून अनेक ब्राम्हण कुटुंबांनी अगदी साध्या सैनिकाच्या हुद्यापासून हा पेशा स्वीकारलेला दिसतो. सैनिक किंवा सरदार यांना समाजात जो मान मिळतो तो राजकारण किंवा इतर कोणत्याही पेशातल्या व्यक्तीला मिळत नाही.

देशातील सर्वसाधारण हिंदू किंवा मुसलमान सैनिकापेक्षा उत्तरेकडून आलेले व्यावसायिक सैनिक जास्त कडवे वाटतात. या उत्तरेकडून आलेल्या सैनिकात, समरकंदकडून आलेले मुघल, इराणच्या व कंदहारच्या बाजूने आलेले पठाण व कास्पियन समुद्राजवळचे तुर्की या सर्वांचा समावेश होतो. यातले खूपसे सैनिक स्वत:चे हत्यार व घोडा घेऊन सैन्यात येतात. व युद्ध करण्याशिवाय त्यांना इतर काही रस नसतो. यातले काही पायी चालणारे सैनिक स्वत:ची बंदुक घेऊनही येतात यांना नजीब म्हणून ओळखले जाते. या सैनिकांनी युरोपियन सैन्यांची शिस्त अंगिकारली असल्याने त्यांना सैन्यात लगेच नोकरी मिळू शकते.

या शिवाय पेशव्यांच्या सैन्यात, रजपूत सैनिकांच्या स्वत:चा ध्वज असलेल्या तुकड्या असतात. रजपूत लढवय्यांच्यात, इतर सैनिकात अभावानेच दिसणारे, शौर्य, उदारपणा व खाल्या मिठाला जागण्याची वृत्ती हे गुण भरपूर असल्याने ते अतिशय सुप्रसिद्ध आहेत. हे सैनिक अजमेरच्या आजूबाजूच्या प्रदेशातून येतात व स्वातंत्र्याची महति यांच्याइतके दुसरे कोणीही जाणत नसतील. पूर्वेकडून आलेले पुरभय्ये सैनिकांच्याही स्वत;च्या तुकड्या असतात. हे सर्व व्यावसायिक सैनिक असल्याने यांच्यात नियमितपणा आणि त्यांना नोकरी देणार्‍या पेशव्यांच्याबद्दल संपूर्ण निष्ठा हे गुण आढळतात.

या लढवय्या सैनिकांखेरीज, मराठा सैन्यातील एक महत्वाचा घटक म्हणजे पेंढारी आणि बाजारबुणगे. या लोकांच्या हातात ठराविक हत्यार असे नसते. एकदा मुख्य सैन्याने एखादा प्रदेश काबीज केला की त्या प्रदेशात लूटमार करणे हे या लोकांचे काम असते. घराच्या कड्या, कुलपे, बिजागर्‍यांपासून ते साठवून ठेवलेले धान्य यापर्यंत सर्व गोष्टींची हे  लूट करतात. त्यांना पगार मिळत नाही पण मिळालेल्या लूटीत वाटा मिळतो.

सैन्य व अधिकारी वर्गाच्या सामानाची हलवाहलव करण्यासाठी उंटदलाचा वापर केला जातो. या साठी सैन्याच्या छावणीत एक उंटदल तयार असते.

B000GB9GHG.01-A2HVZT81H1J2HN._SS500_SCLZZZZZZZ_V65148326_

रघुनाथराव पेशवे

घोडदल

मराठ्यांच्या सैन्यातले घोडदल तीन वर्गांत विभागलेले असते. पहिल्या वर्गातले घोडेस्वार सैनिक, हुजुरत किंवा खाशीपागा या नावाने ओळखले जातात. हे घोडदल पेशव्यांचे स्वत:चे असते व त्यातील सैनिक अत्यंत वरिष्ठ दर्जाचे लढवय्ये असतात. दुसर्‍या वर्गातील घोडदल हे जहागिरदारांचे व मनसबदारांचे असते तर तिसर्‍या वर्गाच्या घोडदलात मुसलमान, पुरभय्ये वगैरे व्यावसायिक लढवय्ये मोडतात. घोड्यांची निगा राखणारे साईस या दलात दिसत नाहीत व सैनिकच स्वत: घोड्यांची निगा राखतात. जेंव्हा घोड्यांना खाण्यासाठी गवत किंवा इतर गोष्टी मिळू शकत नाहीत तेंव्हा हे सैनिक गवताची जमिनीत असलेली मुळे खणून काढतात व स्वच्छ धुवून घोड्यांना खायला देतात. मराठी सैनिक घोडे आणि रत्नसंपत्ती यांनाच सर्वात जास्त मान देताना दिसतात. अतिशय  उमदे असे अरबी घोडे जरी पागेत असले तरी मराठा सैनिक त्यांच्या भीमथडी तट्टांनाच युद्धासाठी प्राधान्य देतात.

अधिकार साखळी व अधिकारी वर्ग

मराठी सैन्यात कुशलता किंवा ज्येष्ठता यावर आधारित अशी अधिकार साखळी नसते. महत्वाच्या अधिकार्‍यांना मनसबदार म्हणतात. या अधिकारी किंवा सरदारांचे एका ठराविक संख्येच्या घोडेस्वार सैनिकांवर अधिपत्य असते.(उदा. पाच हजार, पाचशे). युरोपमधल्या जुन्या सरंजामशाही मधल्या सरदारांसारखी ही प्रथा आहे. या सरदारांना त्यांची वतने किंवा जहागिरी असतात, व या जहागिरीत ते स्वतंत्र्यरित्या कारभार चालवतात. जेंव्हा कधीही त्यांना पेशव्यांचा हुकूम होतो तेंव्हा आपल्या हाताखालचे इतर दुसरे सरदार व सैनिक घेऊन या जहागिरदारांना, पेशव्यांच्या सैन्यामधे सामिल व्हावे लागते. या व्यवस्थेमुळे युरोपियन सैन्यात जी अधिकार साखळी व शिस्त दिसते त्याचा काहीसा अभाव मराठी सैन्यात दिसतो. त्यामुळे कधी पहिली गोळी झाडायची किंवा कधी ताशे बडवायचे याची शिस्त लावणे हे सेनापतीसाठी मोठे कठिण काम बनते.

सेनादलातील तुकड्यांना स्वत:चे ध्वज असतात. पेशव्यांचा ध्वज हा त्रिकोणी आकाराचा व जांभळ्या रंगाचा असतो व त्यावर सोनेरी जरीचे काम केलेले असते. बहुतेक ध्वज लाल रंगाचे असतात. काही तुकड्या ते उंच उभारतात तर काही मध्यम उंचीवर असतात. अतिशय वरिष्ठ अधिकार्‍यांच्या घोड्यांचे खोगिर व डोके यावर तिबेटहून आणलेले तिबेटी गाईंच्या केसांची झालर लावलेली असते. या सरदारांच्या एका बाजूला असलेल्या एका सेवकाने त्यांच्या डोक्यावर जरीचे काम केलेली मखमली छत्री धरलेली असते तर दुसर्‍या बाजूचा सेवक चवरी ढाळत असतो. सेनापती त्यांना मिळालेल्या एखाद्या मानसन्मानाच्या बिरुदाने ओळखले जातात.

पेशवे आणि इतर अतिशय वरिष्ठ अधिकारी युद्धाच्या आणि इतरही वेळी हत्तींचा वापर करतात. या साठी एक हत्तीदल तयार ठेवले जाते.

maratha1

सवाई माधवराव पेशवे व मंत्री

निर्णय घेण्याची पद्धत

युद्धक्षेत्रावर असले तरी पेशव्यांची राज्यकारभार चालविण्याची पद्धत पुण्यातून चालणार्‍या कारभारपद्धतीसारखीच असते. रोज संध्याकाळी सर्व महत्वाचे अधिकारी आणि मंत्री पेशव्यांच्या दरबारात जमतात. राजकारण, युद्धाची हालहवाल, व इतर महत्वाच्या बाबतींवर चर्चा होते व पुढच्या दिवसासाठी फर्माने सोडली जातात. तक्रारी ऐकल्या जातात, अन्याय दूर केले जातात व न्यायही दिला जातो.

मराठ्यांच्या सैन्याची मला नवीन समजलेली एक व्युहरचना म्हणजे जेंव्हा शत्रुचे एखादे गांव काबीज करावयाचे असते त्या वेळी त्या गावाभोवती दिलेला वेढा. या व्युहामधे वेळ खूप लागत असला तरी एकदाही बंदुक न झाडता तुम्ही विजय मिळवू शकता.

Musket

ठासणीची बंदुक

शस्त्रे व हत्यारे

एका तुकडीतल्या सर्वांच्याकडे सारखीच हत्यारे कधीच नसतात. काही सैनिकांकडे ढाल तलवार असते. ठासून भरण्याच्या दारूच्या बंदुका(Musket) काही जणांकडे असतात. या शिवाय धनुष्य-बाण, भालाधारक सैनिकही दिसतात. काही जण अग्निबाण उडवण्यातले तज्ञ असतात. काही जणांजवळ परशु (Battle Axe) असतो. परंतु सर्व सैनिकांजवळ तलवार (Sabre) ही असतेच. तलवारी नेहमी धारदार व उत्तम रित्या परजलेल्या असतात. तुर्की किंवा इराणी सैनिक बहुतांशी वक्री(Curved Blade) तलवार वापरतात. घोडेस्वार मराठा सैनिकांना दुहेरी धारेची, सरळ तलवार पसंत असते. या तलवारीला ते ‘अल्मन’ (German) म्हणतात व दमास्कसवरून येणार्‍या या तलवारींसाठी ते कोणतीही किंमत मोजण्यास तयार असतात. त्यांची ही तलवार चालविण्याची कुशलता अतिशय उत्तम असते.

आम्हाला अतिशय त्रासदायक वाटणारे मराठ्यांचे अग्निबाण म्हणजे 2 इंच व्यासाची व 8 ते 10 इंच लांबीची एक लोखंडी नळी असते. ही नळी एखाद्या भाल्याला बांधली जाते. नंतर या नळीत दारू भरून ती वातीच्या सहाय्याने पेटविली जाते. हा अग्नीबाण जर योग्य दिशा देऊन सोडला तर शत्रूपक्षात मोठा गोंधळ आणि घबराट उडवून देतो. मात्र मराठ्यांना उखळी तोफेचे ज्ञान नसावे असे वाटते.

जेम्स फोर्ब्सची मराठी सैन्याबद्दलची वरील निरिक्षणे बघितले की दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. हिंदुस्थानावर कबजा करायचा असला तर एक ना एक दिवस, शेवटचे युद्ध आपल्याला मराठ्यांच्याच सैन्याशी करावे लागणार आहे, हे इंग्रज सेनानी पूर्णपणे जाणून होते. त्यामुळे शत्रूची बलस्थाने कोणती? त्याचे नाजुक अंग कोणते? याची संपूर्ण माहिती इंग्रज जमा करत होते. त्यासाठीच जेम्स फोर्ब्ससारखा कुशाग्र निरिक्षण करणारा त्यांनी 17 वर्षे फक्त निरिक्षण करणे आणि चित्रे काढणे यासाठी नोकरीवर ठेवला होता. याच्या उलट इंग्रज सेनेची अधिकार साखळी, शिस्त हे सगळे डोळ्यासमोर दिसत असून व त्याचे परिणाम सतत भोगायला लागत असून (पराभवांच्या रूपाने) पेशव्यांसकट सर्व मराठी सेनान्यांनी आपल्या सैन्यात व युद्धनीतीत काहीही बदल किंवा सुधारणा केली नाही. कदाचित अखेरीस झालेल्या त्यांच्या दुर्दैवी पराभवाचे एक कारण हा निष्काळजीपणाही असू शकेल.

6 ऑगस्ट 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

17 thoughts on “पेशव्यांचे मराठी सैन्यदल

 1. सुंदर माहिती. धन्यवाद.

  Posted by आल्हाद alias Alhad | ऑगस्ट 6, 2009, 12:25 सकाळी
 2. atyant bahumol mahiti majyasarkhya itihasat ras asnarya mansasathi…. aabhar !!!

  Posted by harshal | ऑगस्ट 6, 2009, 2:24 pm
 3. very good article and indeed very informative.
  i found army of tipu sultan much better organised than peshwa’s despite marathas being bigger power.
  People like me who have intrest in this subject will be greatful if you can write something about tipu’s army or for that matter mughal army.

  Posted by dilip | सप्टेंबर 3, 2009, 2:32 सकाळी
 4. Namaskar

  Aapan var sangitalya Pramane aaplyala kontatri juna sandrbh granth sapdala tyache nav samju shakel ka???

  Aani Mahiti dilya baddal khup khup aabhari aahot.

  Dhanyvad,

  Posted by Vaibhav Shinde | ऑक्टोबर 9, 2009, 7:40 pm
  • कोणत्या तरी एकाच संदर्भ ग्रंथातून ही माहिती घेतलेली नसल्याने नाव सांगणे अवघड आहे. जेम्स फोर्ब्ज व जेम्स मॅकिन्टॉश या दोघांची आत्मवृत्ते आंतरजालावर उपलन्ध आहेत. त्यातून बरीचशी माहिती मिळाली आहे. गूगलवर या नावानी शोध घेतल्यास ही पुस्तके सापडतील.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 10, 2009, 9:57 सकाळी
 5. चंद्रशेखर, आपले आभार!

  यात पेशव्यांच्या तोफखान्याविषयी माहिती नाही. (बहुदा त्या सायबाला ती मिळाली नसावी.)

  आमचे पूर्वज पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. पुण्यातला खडक पोलीस चौकी, मामलेदार कचेरी वगैरे भाग हा सरदार पानसे यांचा तोफांचा कारखाना होता. (नुकताच त्या भागातील एक वाडा पाडला, त्याच्याखाली तोफांचे जवळजवळ दोन हजार गोळे सापडले!)

  पानिपताच्या युद्धात पानशांची एक पिढीच्या पिढी कापली गेली. पानिपतात बलिदान करणार्‍या सरदार भीवराव पानशांच्या स्मृतिदिनी आजही आम्ही समाधीपूजन करतो.

  आपले आभार दोन कारणांसाठी – एक म्हणजे ही माहिती दिल्याबद्दल. आणि दुसरं म्हणजे सरदार पानसे यांचा इतिहास लिखित स्वरूपात उपलब्ध आहे – तो आंतरजालकावर टाकण्याची प्रेरणा आता आपण दिली आहे. धन्यवाद!

  Posted by आदित्य पानसे | मार्च 20, 2010, 5:47 pm
  • आदित्य

   तुमचे म्हणणे बरोबर आहे. जेम्स फोर्बज हा इंग्रज कंपनी सरकारच्या सेवेत रायटर म्हणून होता. त्याने केलेले मराठी सैन्यदलाचे वर्णन मुख्यत्वे रघुनाथराव पेशवे व इंग्रजी फौज यांनी मिळून केलेल्या गुजरातच्या मोहिमेमधले आहे. या फौजा पार खंबायतच्या आखातापर्यंत पोचल्या होत्या. त्यामुळे कदाचित या फौजेबरोबरचा तोफखाना इंग्रज असण्याची शक्यता वाटते. परंतु त्याने अग्नीबाणा सारख्या काही हत्यारांची माहिती दिलेली आहे.

   Posted by chandrashekhara | मार्च 20, 2010, 8:13 pm
 6. Changle kihile ahe!
  lihit raha itkech bolu shakto.

  Posted by mandar17390 | मे 14, 2010, 11:05 pm
 7. mala tya pustakachi sampurna mahiti havi aahe mala lakaratlawkar kalwane hi namra vinanti

  Posted by ajay kunjir | ऑक्टोबर 7, 2010, 2:17 pm
  • अजय

   आपल्याला कोणत्या पुस्तकाची माहिती हवी आहे याचे आकलन झाले नाही. ते कळवल्यास मला जी मदत करता येईल ती करण्याचा मी प्रयत्न करीन.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 7, 2010, 2:25 pm
   • sambhadhit utaryevishayi mahiti havi hoti
    9922461229 mob

    Posted by ajay devidas kunjir | एप्रिल 1, 2011, 12:27 pm
   • अजय

    तुम्हाला कोणत्या उत्तराविषयी माहिती हवी आहे ते समजले नाही. जास्त खुलासा देऊ शकलात तर मी माझ्या ज्ञानाप्रमाणे माहिती देण्याचा प्रयत्न करू शकेन.

    Posted by chandrashekhara | एप्रिल 1, 2011, 1:14 pm
 8. tumchya jawal alludincha diwa aahe ki kay rao tumhala kup kup mahiti asste ki ho?barya diwsanni tumchya bhetilla alyabaddal maf kara ?

  Posted by ajay d. kunjir d | जून 26, 2012, 4:19 pm
  • अजय —

   माझ्याजवळ खरोखरच एक अल्लाउद्दिनचा दिवा आहे.त्याचे नाव आंतरजाल किंवा इंटरनेट त्यावर आपल्याला हव्या असलेल्या माहितीचा खजिना क्षणात उपलब्ध होत असतो.प्रतिसादासाठी धन्यवाद.

   Posted by chandrashekhara | जून 27, 2012, 8:22 सकाळी
 9. Reblogged this on अक्षरधूळ.

  Posted by chandrashekhara | जुलै 29, 2013, 4:16 pm
 10. Marathi sainyabaddal navi mahiti vachun aanand zaala!

  Posted by mahadev naik | जुलै 30, 2013, 10:10 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: