.
ताज्या घडामोडी Current Affairs, Health- आरोग्य

प्लेग


प्लेगची साथ वगैरे शब्द, खरे म्हणजे आता किती जुन्या जमान्याच्यातले झाले आहेत. नव्या पिढ्यांमधल्या कित्येकांना माहितीही नसेल की एके काळी, नुसते हे दोन शब्द कोणाच्याही छातीत धडकी भरवत असत. माझे आजोबा, पुण्यात बर्‍याचदा येणार्‍या प्लेगबद्दल, आठवणी नेहमी सांगत असत. प्लेगची लागण झाल्याचे नुसते समजले तरी गावे ओस पडत असत. प्लेगवरची लस निघाली आणि या मृत्युदूत समजल्या जाणार्‍या रोगाची भिती, लोकांच्या मनातून पार गेली.

त्यामुळेच मी जर असे सांगू लागलो की जगात एके ठिकाणी प्लेगची साथ येऊ घातली आहे, तर माझ्यावर कोणी विश्वास तरी ठेवेल का याबद्दल मला शंकाच आहे. लोक म्हणतील की तुम्ही कुठल्या जमान्यात आहात. एकविसाव्या शतकात, 2009 सालात असले काही शक्यच नाही. पण ही सत्य परिस्थिती आहे.

0803-web-CHINAmap

चीन मध्ये, तिबेटच्या उत्तर-पूर्वेला, चिंघाय (Qinghai) हे राज्य किंवा प्रांत आहे. या प्रांताचा बहुतेक प्रदेश अतिशय डॉंगराळ असून त्यातील गावे अतिशय दुर्गम अशा ठिकाणी असल्याने त्यांच्याशी संपर्क ठेवणेही पुष्कळ वेळा कठीण असते. शिनिंग(Xining) ही चिंघायची राजधानी, बिजिंगपासून विमानाने प्रवास केल्यास अडीच तासात तुम्ही शिनिंगला पोचता. या राजधानीच्या दक्षिण-पश्चिमेला 144 किलोमीटर अंतरावर झिकेटान (Ziketan) 10000 लोकसंख्या असलेले एक गाव आहे. तिबेटियन वंशाचे लोक येथे प्रामुख्याने रहातात. या गावात रहाणार्‍या 32 वर्षाच्या एका मेंढपाळाला प्रथम लागण झाली व तो दगावला. त्याच्या पाठोपाठ 37 वर्षे वयाचा दुसरा एक शेजारी रहाणारा गावकरी व आता 64 वर्षाचा एक मेंढपाळ हेही दगावले आहेत. या मृत व्यक्तींच्या सहवासात आलेल्या 9 व्यक्तींना लागण झाली असल्याने वैद्यकीय उपचार चालू आहेत यापैकी दोन व्यक्ती तरी गंभीर रित्या आजारी आहेत. चिनी अधिकार्‍यांच्या हवाल्याप्रमाणे, झिकेटान गाव अतिशय दुर्गम अशा प्रदेशात असल्याने त्या गावाला पूर्णपणे एकाकी पाडणे (Isolation)शक्य झाले आहे. मृत व्यक्तींच्या सहवासात, 16 जुलैनंतर ज्या कोणी व्यक्ती आल्या असतील, त्यांचाही शोध घेणे चालू आहे. या गावात आता भितीचे एक प्रचंड सावट पसरले असून कोणीही व्यक्ती रस्त्यावर येण्यास सुद्धा तयार नाही.

Plague-AP

प्लेग हा जगाच्या इतिहासातला एक महाभयंकर रोग आहे. यर्सिनिया पेस्टिस, (Bacterium Yersinia pestis) या जंतुंमुळे हा रोग होतो. हा तीन प्रकारांनी लोकांच्यात फैलावू शकतो. न्यूमॉनिक प्लेग (Pneumonic Plague) हे या जंतूंचे सर्वात भयानक रूप आहे. कारण हवेतून, रोग्याच्या शिंकण्या-खोकण्यामुळे या रोगाचा प्रसार होऊ शकतो. दुर्दैवाने झिकेटान गावातला प्लेग याच स्वरूपाचा आहे व त्याला वेळीच आवर घालणे अत्यंत आवश्यक आहे. या रोगाची लागण झालेल्यांपैकी 70% लोक तरी दगावतातच असा अनुभव आहे. परंतु स्ट्रेप्टोमायसीन किंवा टेट्रॅसायक्लीन या सारख्या औषधांचा रोगाच्या प्राथमिक अवस्थेत उपयोग केला तर 85% रोगी तरी बरे होऊ शकतात.

dataplague

(Bacterium Yersinia pestis

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (World Health Organisation (WHO)) चे अधिकारी, चिनी अधिकार्‍यांच्या संपर्कात आहेत. “आम्ही हा रोग आवाक्यात आणण्याचे सर्व प्रयत्न करत आहोत. औषधे, क्ष-किरण यंत्रे आम्ही तेथे पाठविली आहेत” असे चिनी अधिकारी म्हणत आहेत. त्यांच्याजवळ या प्रकारची उत्तम यंत्रणा असल्याने हा रोग आटोक्यात ठेवण्यात त्यांना बहुदा यश मिळेल.परंतु जर काही कारणांनी हा रोग मर्यादित ठेवण्यात चिनी अधिकार्‍यांना अपयश आले तर स्वाईन फ्ल्यू किंवा सार्स( Sars or Influenza A (H1N1)) या रोगांच्या मानाने हा रोग इतका जास्त धोकादायक आहे की काय होऊ शकेल याची कल्पनाच करवत नाही.

या प्रकारच्या बातम्या समजल्या की पुष्कळ वेळा असे वाटते की रोगांचे निर्मूलन केल्याच्या आपल्या बढाया किती फोल आहेत ते.

4 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “प्लेग

 1. खूप माहिती पूर्ण लेख. आम्हाला तर हे काही माहितीच नाही. बर्‍याच गोष्टी कशा फिल्टर होऊन भारतात येतात त्याचे हे उदाहरण. देव करो अन ही साथ त्या कुठल्याशा झिकेटन गावापुरतीच मर्यादित राहो.
  आधीच स्वाईन फ़्लू ने आमच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

  Posted by आरती | ऑगस्ट 4, 2009, 2:59 pm
 2. चंद्रशेखरजी,
  आजची आपली ही पोस्ट वाचल्यावर आपणच लिहीलेल्या कालच्या पोस्टमधल्या खाली दिलेल्या ओळी किती योग्य आहेत हे जाणवतं..
  “माल्थस पुढे म्हणतो की असे जरी असले तरी निसर्गाने असे काही अडथळे (दुष्काळ, रोगराई, युद्धे,पूर) या लोकसंख्यावाढीच्या मार्गात निर्माण केले आहेत की जर माणसाने या बाबतीत काहीच केले नाही(शक्य असल्यास) तर जगातली लोकसंख्या आपोआपच मर्यादित राहील. जर मानवजातीने हे अडथळे दूर करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला तरच जगाची लोकसंख्यावाढ अनियंत्रितपणे मोठी होईल.”
  माणसाने कितीही प्रगती केली तरी मधुन मधुन निसर्ग आपली ताकद दाखवतोच…म्हणता म्हणता स्वाईन फ्लुने भरपूर औषधांचा साठा असुनही पुण्यांत १ ला बळी घेतलाच!आता हा प्लेग आवाक्यात राह्यला तर ठीक !

  Posted by anjali | ऑगस्ट 4, 2009, 3:14 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: