.
Environment-पर्यावरण

रासायनिक कारंजी


पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी या गावाजवळ, भीमा नदीवरचे एक अतिशय मोठे धरण आहे. उजनी धरण या नावाने ओळखल्या जाणार्‍या या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 1517 गिगालिटर्स (GigaLitres) एवढी प्रचंड आहे. क्षमतेच्या बाबतीतला या धरणाचा क्रमांक कोयना व जायकवाडी यांच्यानंतर तिसरा लागतो. या धरणात पोचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळामुठा सारख्या अनेक नद्यांमधून येत असते. एवढी मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो.

ujani dam

लॅन्डसॅटने घेतलेला उजनी धरणाचा फोटो

मंगळवार तारीख 28 जुलैला कुमार नगरे आणि त्याचे इतर सहकारी मच्छीमार हे आपल्या होड्या घेऊन मच्छीमारीसाठी गेले होते. त्यांच्या होड्यांच्याजवळ पाणी अचानक उकळल्यासारखे उफाळू लागले. यामुळे घाबरून जाऊन त्यांनी त्वरेने होड्या काठावर आणल्या. याच दिवशी गोरख सल्ले, नवनाथ कनिचे व सुरेश परे हे या जलाशयाच्या कुंभारगाव भागात होड्या नेऊन मच्छीमारी करत होते.  त्यांना पाण्यातून सहा ते सात फूट उंच फवारे उडताना दिसले. फवार्‍याने उडणारे पाणी काळ्या रंगाचे, रासायनिक व दुर्गंधी येणारे होते. गोरख परसय्या हा मच्छीमार एका थर्मोकोलच्या प्लॅटफॉर्मवर बसून मासे पकडत होता. त्याचा प्लॅटफॉर्म तर खाली पाणी उफाळू लागल्याने हवेत उडाला. या उफाळणार्‍या पाण्याने होड्या भोवर्‍यात अडकल्यासारख्या झाल्या व काही काळ त्यांना काठाकडे जाणेही शक्य होईना. या प्रकारामुळे मच्छीमार मंडळी हादरली व  तीन चार दिवस मच्छीमारी बंदच आहे.

गेले काही आठवडे भीमा नदीतून या जलाशयाकडे येणारे पाणीच या प्रकाराला जबाबदार असावे असे वाटते. पुणे व तिथून दौंडपर्यंतचे असलेले प्रकल्प यांच्याकडून येणारे सांडपाणी व रासायनिक प्रदुषणयुक्त पाणी या पाण्यात मोठ्या प्रमाणात मिसळलेले आहे. उजनीच्या पात्रामधे बरीच वर्षे साठलेले रासायनिक घटक व हे सांडपाणी यांची प्रक्रिया व त्याचा धरणाच्या पाण्यात असलेल्या सेंद्रीय पदार्थांवर होणारा कुजण्यासारखा परिणाम यामुळे मिथेन (Methane) वायु तयार होतो व तो उफाळून वर आल्याने हे फवारे उडतात.

ujanidam_16513

उजनी धरण

गेल्या तीन वर्षांपासून उजनीचे पाणी पिण्यासही योग्य नसल्याचे आढळून आले आहे. दुधासारखा तवंग मधून मधून पाण्यावर दिसतो. पाण्यातील शंख शिंपल्यांसारखे प्राणी, मृत होत आहेत. फिल्टरेशन करूनही पाण्याला दुर्गंधी येते. बारामती नगरपालिकेने तर उजनीचे पाणीच नको अशी भूमिका घेतली आहे. अर्थात बाकीच्या छोट्या मोठ्या गावांना हेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.

एवढ्या मोठ्या प्रकल्पातील जलाशयाचे पाणी पुरेसे स्वच्छ नसून ते प्रदुषणयुक्त आहे ही गोष्ट, खरोखरच पोल्यूशन कंट्रोल बोर्डाच्या व जलसंपत्तीचे नियोजन करणार्‍या अधिकार्‍यांसाठी लांछनास्पद आहे. परंतु खरे जर कोणी बळी जात असतील तर ज्यांना हे पाणी वापरण्याशिवाय तरणोपाय नाही असे काठावरच्या गावांमधले शेतकरी.

1 ऑगस्ट 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “रासायनिक कारंजी

 1. Shaheb( Sharadchandrashaeb Pawar) Please Take care of Ujani dam which become part of Madha constituency. This is 2nd highest storage capacity dam will undergoing to be most polluted dam Maharashtra with in 3 year of time. Methane gas was found in Ujani dam. This is self explanatory how deadly this river is polluted.
  There was time when we use go for swimming in this dam during period of 1991-95 & enjoyed our most of the life. But today we scare to touch this water. Its smelling dangerous day by day. We have voted for you as most & highly liable person who can change polluted dam in to clean water resource.

  Please Shaheb. Do the needful for all of us who are staying around Ujani dam.

  Yours Faithfully
  Rahul Godse

  Posted by Rahul Godse | ऑगस्ट 7, 2009, 3:28 pm
 2. साहेब २०-२० मध्ये बिझि आहेत … नन्तर बोला …

  चांगला लेख.

  Posted by vijay | जुलै 26, 2010, 8:03 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: