.
ताज्या घडामोडी Current Affairs

मूर्खपणाचा कळस


तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या तळहातावरून किंवा अंगावरून मी मोटर सायकल चालवून दाखवतो असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही काय कराल? त्या माणसाला घरातून हाकलून द्याल की नाही! पण तामिळनाडूमधल्या विलुपुरम जिल्ह्यातल्या (Keezhperumpakkam) कीझपेरुम्पक्कम या गावातल्या सरकारी प्राथमिक शाळेचे, डिसेंबर 2008 पासून असलेले हेडमास्तर, श्री. रामानुजम, यांना मात्र हा मूर्खपणा म्हणजे शौर्याचे लक्षण वाटते. अर्थात हे त्यांचे वाटणे त्यांच्या शाळेत शिकणार्‍या मुलांच्याबद्दल असावे. त्यात त्यांची स्वत:ची मुले आहेत की नाही ते माहित नाही.

IndiaTv87363e_stunt

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री कै. कामराज यांच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तामिळनाडूमधे एक जन्मोत्सव साजरा केला जात आहे. त्या उत्सवाचा एक भाग म्हणून हे शौर्यप्रदर्शन आयोजित केले होते. प्रथम किरकोळ कराटेची प्रात्यक्षिके झाल्यावर या मुख्य शौर्यप्रदर्शनाला सुरवात झाली. यात पहिली ते पाचवी मधल्या मुलांना जमिनीवर हात पसरून झोपवण्यात आले व त्यांच्या कोवळ्या पंजांच्यावरून एका अचरटशिरोमणीने मोटर सायकल चालविली. त्यानंतर एका मुलीला उताणे झोपवून तिच्या अंगावर एक फळी ठेवण्यात आली व त्यावरून मोटर सायकल चालविली गेली.

STUNT

या कार्यक्रमात मुलांना फुकट गणवेश आणि इतर शिक्षण साहित्य तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री के पोनमुडी यांच्या एका ट्रस्टमार्फत देण्यात येणार होते. त्यामुळेच बहुदा या मुलांच्या पालकांनी या अचरटपणाला संमती दिली असावी. या मंत्रीमहोशयांच्या पत्नी या कार्यक्रमाला हजर होत्या. ही दोन शौर्यप्रदर्शने झाल्यावर या बाईंच्या डोक्यात बहुदा प्रकाश पडला व त्यांनी हेडमास्तरना सांगून हा अचरटपणा थांबविला.

शाळेतली मुले शिक्षकांचे सर्व ऐकतात म्हणून त्यांना काय काहीही करायला लावायचे का? या कोवळ्या मुलांना त्यांचे काही हक्क आहेत की नाही? या मुलांना काही इजा झाली असली तर जबाबदार कोण? किमान या श्री. रामानुजन यांच्यावर तरी काही कारवाई होणार आहे का? मनात अनेक प्रश्न उभे राहिले.

29 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “मूर्खपणाचा कळस

  1. अरे बापरे.. काय हे वाचलंय आत्ता.. विश्वासंच बसत नाही.. असे प्रयोग करणाऱ्या हेडमास्तरांच्या अंगावरुन XXXX चालवुन बघितला पाहिजे..

    Posted by Mahendra | जुलै 29, 2009, 12:20 pm
  2. दाक्षिणात्य सिनेमात असे स्टंटस बरेच बघितले होते.. मात्र लहान मुलांच्या जीवाशी केलेला हा खेळच नव्हे का?
    त्या बिनडोक बाईंनी – मास्तरांना आपली अक्कल गहाण ठेवलेली दिसते!

    Posted by भुंगा | जुलै 29, 2009, 12:34 pm
  3. कोवळ्या मुलांच्या हातावर गाडी चालवणारा नराधम, या सगळ्या प्रकाराला संमती देणारे पालक, या सगळ्यांना त्या रांगेत जितकी मुले होती तितके फटके द्यायला हवेत. दहा द्यायचे अन् एक मोजायचा.

    राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि बालकल्याण आयोग यांनी संबंधितांना किमान नोटिसा पाठवल्या असतील अशी अपेक्षा करायची का? त्याबद्दल वृत्तपत्रांतही काहीच नव्हतं.

    Posted by Shailesh S. Khandekar | जुलै 29, 2009, 4:19 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

नुकतीच प्रकाशित केलेली ब्लॉगपोस्ट्स

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

%d bloggers like this: