.
Health- आरोग्य

लठ्ठंभारती


सिंगापूरमधले वास्तव्य संपवून, जेवढ्या वेळा मी भारतात परतलो आहे त्या प्रत्येक वेळी एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत राहिली आहे. इथे सिंगापूरला, सडसडीत स्त्री पुरुष बघण्याची एवढी सवय डोळ्यांना होते की भारतात विमानतळापासूनच, जवळपास प्रत्येक माणूस मला जाड वाटत रहातो. माझे मित्र, नातेवाईक हे सगळे मला दर वेळी जास्त जाड, दुहेरी हनुवटीचे, पोट सुटलेले दिसतात. परिचित महिलांचे तर विचारूच नका. त्यातली प्रत्येक स्त्री ही प्रमाणाच्या बाहेर अतिशय स्थूल झाली आहे हे जाणवत राहते. माझी इतके दिवस अशी समजूत होती की मी परिचितांची, इथल्या लोकांशी मनात तुलना करत असल्याने, मला ते सर्व, जाडू वाटतात. परवा एक दोन लेख वाचनात आले आणि असे लक्षात आले की हा माझ्या मनाचा खेळ नाही. सत्य परिस्थिती आहे.

fatboy

भारतातील लठ्ठ लोकांची राज्यवार असलेली संख्या या नावाचा एक अभ्यासलेख मी बघितला. या लेखाप्रमाणे सर्वात लठ्ठ लोक असलेल्या तीन राज्यांचे आकडे असे आहेत.

प्रथम क्रमांक- पंजाब  30.3% पुरुष, 37.5 % स्त्रिया प्रमाणाबाहेर लठ्ठ

द्वितिय क्रमांक- केरळ  24.3% पुरुष, 34%  स्त्रिया प्रमाणाबाहेर लठ्ठ

तृतिय क्रमांक- गोवा   20.8% पुरुष, 27 % स्त्रिया प्रमाणाबाहेर लठ्ठ

राजधानी दिल्लीमध्या 76% टक्के महिलांचे पोट प्रमाणाबाहेर सुटलेले आहे

महाराष्ट्राचा क्रमांक पहिल्या तीन मधे नसला तरी बराच वरचा आहे. तुम्ही म्हणाल की हे सगळे मोघम आहे. प्रमाणाबाहेर लठ्ठ म्हणजे काय? लठ्ठपणा मोजण्याची दोन मुख्य परिमाणे आहेत. पहिले म्हणजे ‘बॉडी मास इंडेक्स’ (BMI).  भारत सरकारच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या नवीनतम आकड्यांनुसार. एखाद्या व्यक्तीचा BMI हा जर 23 पेक्षा कमी असला तर ती लठ्ठ नाही. 23 ते 25 यामधे BMI असला तर ती व्यक्ती लठ्ठ समजावी व 25 पेक्षा जास्त BMI असलेली व्यक्ती ही अतीलठ्ठ (Obese) समजावी.  या  BMIच्या आकड्यावरून फारसा काही बोध होत नाही असे मला वाटते. आपल्याला उंची, फूट व इंचात माहिती असते तर वजन किलोग्रॅम मधे. त्यामुळे 23 व 25 या दोन BMI साठी वजन व उंचीचा एक सोपा तक्ता खाली दिला आहे.

उंची

23 BMI

25 BMI

साठी वजन

साठी वजन

इंचात

किलोग्रॅम

किलोग्रॅम

58

50

54

59

52

56

60

54

58

61

55

60

62

57

62

63

59

64

64

61

66

65

63

68

66

65

70

67

66

72

68

69

75

69

70

77

70

73

79

71

75

81

72

77

84

73

79

86

74

81

88

75

84

91

76

86

93

आपल्या उंचीच्या आडव्या रांगेत दुसर्‍या व तिसर्‍या स्तंभात दिलेल्या वजनांशी आपल्या वजनाची तुलना करावी. आपले वजन दुसर्‍या उभ्या स्तंभात दिलेल्या वजनापेक्षा कमी असले तर आपण लठ्ठ नाही. दुसर्‍या व तिसर्‍या स्तंभातील वजनांच्या मधे असले तर आपण लठ्ठ आहोत. ते तिसर्‍या स्तंभातील वजनाइतके किंवा जास्त असले तर आपण लठ्ठंभारती (Obese) आहोत हे समजावे.

Obesity.2007

लठ्ठपणाचे दुसरे परिमाण म्हणजे ‘कंबर व ढुंगण यांच्या परिमितींचे गुणोत्तर’ (Waist to Hip Ratio). साध्या कपडे मोजण्याच्या टेपने(ही सगळ्या घरांत असते.) या दोन परिमिती कोणालाही मोजता येतात. कंबरेच्या परिमितीला ढुंगणाच्या परिमितीने भागले की हे गुणोत्तर मिळते. लठ्ठ्पणा व हे गुणोत्तर यांचा तक्ता असा आहे.

पुरुष(गुणोत्तर)             स्त्रिया(गुणोत्तर)                  लठ्ठपणा

0.95 किंवा खाली          0.80 किंवा खाली          लठ्ठपणा नाही

0.96 ते 1.0              0.81 ते 0.85             लठ्ठ

1.0 आणि पुढे              0.85 आणि पुढे          अतीलठ्ठ

काही प्रगत राष्ट्रांच्यातल्या लठ्ठपणांच्या टक्केवारीत भारतामधील लठ्ठपणा कमी आहे हे खरे असले तरी भारत विकसनशील देशांमधील एकमेव असा देश आहे की ज्याच्यामधल्या लठ्ठपणाबद्दल, इंटरनॅशनल कॉंग्रेस ऑन ओबिजिटी ने भारतामधल्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी भारताला सभासद करून घेतले आहे.

fried-india-fat-food

1997 मधे भारतातील अतीलठ्ठपणाचे प्रमाण फक्त 7 ते 9% होते. त्यात एवढी प्रचंड वाढ कशी आणि का झाली असेल ही चिंतेची बाब आहे. भारतीय जेवणात तळलेले व भरपूर तेलतूप वापरलले पदार्थ खूप असतात. या शिवाय नवीन फास्ट फूडची आवड वाढत चालली आहे. या शिवाय व्यायाम, खेळ यांचीही आवड नवीन पिढीमधे कमीकमीच होत चालली आहे.

या लठ्ठपणाबरोबर येणार्‍या रोगांची नुसती आकडेवारी बघितली तरी धडकी भरते. सध्या भारतात 2.5 कोटी मधुमेही आहेत. 2025 पर्यंत ही संख्या 5.7 कोटीपर्यंत फुगेल असा अंदाज आहे. या शिवाय लठ्ठपणामुळे येणारे र्‍हदयविकारासारखे रोग निराळेच.

भारतात अक्षरश: लाखो लोकांना दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत असते. पण याच वेळी सुशिक्षित, उच्चभ्रू वर्ग मात्र लठ्ठंभारती होत चालला आहे. य़ा विरोधाभासाला काय म्हणायचे?

25 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “लठ्ठंभारती

 1. भारताबाहेरून आल्यावर मलाही हीच गोष्ट प्रकर्षाने जाणवली. विशेष म्हणजे ज्या व्यक्ती सडपातळ किंवा ज्यांचा बीएमआय २३ च्या खाली असतो त्यांच्याबद्दल “तब्बेत खराब झाली” असे सर्वसाधारण मत असते. अजूनही जाडजूड, ढेरी वाढलेली म्हणजे प्रकृती सुदृढ हा समज लोकप्रिय आहे. तक्त्याबद्दल आभार.

  Posted by Raj | जुलै 26, 2009, 12:11 pm
 2. Namaskar,

  Aplya lekha madhe ek vakya ahe “Bharatiya jevnat tallele va bharpur tel tup vap vaparlele padartha astat”.
  Mazya mate he chuk ahe. Aple nehemiche jevan je ahe tyamadhe phakta sharirala avaashyak tevdhyach pramanat tel va tup aste. uda, poli, bhaji, kiva amti madhe. Pan etar je padartha khalle jatat uda vada, samosa, tyamadhe telache praman matra jasta aste. Tyamule nehemiche jevan he culprit nahi ahe.
  Pan halli uth suth hotel madhe punjabi, chinese, cheese vale padardtha eg pizza burger hyavar konich kahi mhanat nahi.
  So actually all these things are the main culprits.
  So we need to stress on this.

  Dhanyawad
  Mandar Puranik

  Posted by Mandar Puranik | जुलै 28, 2009, 3:08 pm
  • मन्दार

   आपण महाराष्ट्रीय जेवणाचे केलेले वर्णन योग्य आहे. परंतु मला भारतीय जेवण म्हणजे मुख्यत्वे, उत्तर भारतीय, पंजाबी, गुजराती व मारवाडी हे जेवण अभिप्रेत आहे.

   Posted by chandrashekhara | जुलै 28, 2009, 4:21 pm
 3. dhungan kami karayacha ahe karan baki avayavanpeksha te jast mothe vatate pls lavkar upay sanga

  Posted by priyanka | सप्टेंबर 29, 2011, 11:07 सकाळी
  • प्रियांका –

   आपल्याला कोणत्या तरी जिम किंवा स्लिमिंग सेंटरचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे.

   Posted by chandrashekhara | सप्टेंबर 29, 2011, 3:09 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: