.
ताज्या घडामोडी Current Affairs

कृपया प्रतिक्षा करा. आपण रांगेत आहात.


आमचे एक मामा मुंबईला चर्नीरोड स्टेशनच्याजवळ, ताराबाग इस्टेट म्हणून एक चाळसमूह आहे त्यात पूर्वी रहात असत. या इस्टेटमधे एकूण पाच चाळी होत्या. प्रत्येक चाळीला 3 मजले आणि प्रत्येक मजल्यावर 10 बिर्‍हाडे अशी रचना होती. प्रत्येक मजल्यावरच्या बिर्‍हाडांसाठी 4 स्वच्छतागृहे त्या त्या मजल्याच्या एका टोकाला असत. त्यामुळे सकाळच्या पीक अवर्समधे, स्वच्छतागृह प्रवेशइच्छुकांची मोठी रांग समोरच्या व्हरांड्यात लागे. सकाळच्या वेळी हातात टमरेल, काही जणांच्या खाकेत पेपरची घडी किंवा खिशात सिगरेट्सचे पाकिट आणि चेहर्‍यावर कोणत्याही शब्दांनी वर्णन न करता येण्याजोगा शब्दांच्या पलीकडचा भाव, अशा परिस्थितीत ही मंडळी उभी असत. अलीकडे, बी.एस.एन.ल.च्या फोनलाईनवर जेंव्हा कधी मी, “कृपया प्रतिक्षा करा. आपण रांगेत आहात.” ही घोषणा ऐकतो तेंव्हा नेहमी मला ताराबागमधली ती रांग आठवते.

ताराबागेचे ठीक आहे हो! कारण गजबजलेल्या मुंबईच्या भरवस्तीतली ती एक चाळ आहे. पण कोट्यावधी डॉलर्स आणि अनेक प्रगत राष्ट्रांच्यातले सर्वोत्तम टॅलेंट वापरून बनवलेल्या व अवकाशात भ्रमण करत असलेल्या, आंर्तराष्ट्रीय अवकाशस्थानकातल्या (Space Station) रहिवाश्यांवर अशीच वेळ आली आहे हे तुम्हाला सांगितले तर खरे वाटेल का?

5-28-08-space-toilet

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने पाठवलेले एन्डेव्हर हे यान या अवकाशस्थानकावर जाऊन पोचले व या अवकाशस्थानक रहिवाश्यांची संख्या एकदम 13 झाली. या नंतर एन्डेव्हर मधल्या अंतराळवीरांनी उघड्या अवकाशात प्रयोग करता यावे म्हणून एक बाल्कनीसारखा प्लॅटफॉर्म या अवकाशस्थानकाच्या बाहेरील बाजूस बसवला. हा प्लॅटफॉर्म ज्या जागी बसवला गेला त्याच्या आतील बाजूसच अवकाशस्थानकाचे मुख्य स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहातून बाहेर फेकल्या जाणार्‍या पाण्याचा एक नळ या नवीन प्लॅटफोर्मच्या अगदी जवळ आला आहे. या नळातील पाणी प्लॅटफोर्मवर पडले तर तो दूषित होईल म्हणून तो बंद करण्यात आला. या स्वच्छ्तागृहात वापरल्या जाणार्‍या पाण्याचा पुर्नप्रयोग करण्याची यंत्रणा अवकाशस्थानकात आहे. परंतु सर्वच पाणी त्या यंत्रणेकडे जाऊ लागल्याने त्यावर जास्त ताण आला व ती मोडली.

5-28-08-toilet

रशियन स्वच्छतागृह

त्यामुळे या स्वच्छतागृहाच्या दारावर चक्क, कार्यवाहित नाही(Out Of Service) अशी पाटी लावणे भाग पडले आहे. अवकाशस्थानकाच्या, रशियाने बनवलेल्या भागात, आणखी एक स्वच्छता गृह आहे व त्यावरच आता काम चालू आहे. एन्डेव्हरच्या अंतराळवीरांना आता बाकी सर्व उद्योग सोडून स्वच्छतागृहातले कमोड दुरुस्त करण्याचे काम प्राथमिकतेने आले आहे. 13 अंतराळवीरांसाठी फक्त एक स्वच्छतागृह असल्याने त्यांना सकाळी तिथे, ताराबागसारखीच रांग लावावी लागत असली तर नवल नाही.

बिचारे अंतराळवीर! त्यांच्या नशीबाने सध्या तिथे कोणी अंतराळवीरांगना तरी नाही. नाहीतर त्यांच्या हालाला काही पारावारच उरला नसता.

21 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “कृपया प्रतिक्षा करा. आपण रांगेत आहात.

 1. Will like to read more.
  More technical and life issues.

  Posted by Arvind Purandare | जुलै 22, 2009, 8:58 सकाळी
 2. थोडक्यात काय, तर ताराबाग काय किंवा तारांगण काय … दोन्ही ठिकाणी ” थांबा आणि वाट पहा …” छानच आहे ब्लॉग …

  http://asachkahitari.wordpress.com/

  Posted by inkblacknight | जुलै 22, 2009, 1:33 pm
 3. me sahaj shodhata shodhata aapla blog sapadala aawadala me ajun ya khetramadhe navin aahe kahi chuklyas khamasva.

  Posted by shendevikas | जुलै 23, 2009, 6:08 pm
  • विकासजी
   या क्षेत्रात नवीन जुने असे काही असत नाही. आपणास मनापासून वाटते ते जरूर लिहा.

   Posted by chandrashekhara | जुलै 23, 2009, 6:25 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: