.
ताज्या घडामोडी Current Affairs

अमेरिकन स्ट्रॉबेरी


स्ट्रॉबेरी हे फळ पूर्वी निदान पुण्यात तरी दुर्मिळच असे. सीझनमधे क्वचित एखादा विक्रेता कॅम्पातल्या दोराबजीच्या दुकानासमोर पथारी मांडून स्ट्रॉबेरीचे वाटे विकताना दिसलेला मला आठवतो. म्हणूनच त्या दिवसांत महाबळेश्वरची चक्कर झाली की स्ट्रॉबेरी घेऊन खाणे हा एक महत्वाचा कार्यक्रम असे. त्यावेळी स्ट्रॉबेरीची फळे बांबूच्या करंडीतून मिळत. खाली वर पाला आणि मधे लाल केशरी फळे, इतकी लोभसवाणी दिसत की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय रहात नसे. नंतर पाचगणीला स्ट्रॉबेरी उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झाले व पुण्याच्या बाजारात प्लास्टिकच्या पारदर्शी डब्यांच्यात भरलेली फळे सर्व फळविक्रेत्यांकडे मिळू लागली. पण तरी सुद्धा ती फळे सीझनमधेच मिळत. गेल्या चार पाच वर्षात मात्र स्ट्रॉबेरीची फळे सदा सर्व काळ उपलब्ध असतात. जर हे डबे नीट निरखून पाहिले तर लक्षात येईल की ही स्ट्रॉबेरीची फळे, कॅलिफोर्नियामधे उत्पादित आहेत. ही कॅलिफोर्नियाची स्ट्रॉबेरी फळे आकारानी मोठी असतात, दिसतात तर छानच पण खाण्यासही अतिशय मधूर असतात.

straberry2006_mar_01_2

अमेरिकेतील कॅलिफोर्निया हे राज्य, उद्योग-धंद्यांची वाढ होण्याआधीपासूनच, फळे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अंदाजे 80000 टन स्ट्रॉबेरी फळांचे या राज्यात उत्पादन होते. व ही फळे जगभर विक्रीसाठी पाठवली जातात. असे जरी असले तरी गेल्या काही वर्षांपासून कॅलिफोर्नियामधला हा फलोत्पादनाचा व्यवसाय एका वादळात सापडला आहे. इ.स. 2005 पर्यंत हे फलोत्पादक, मेथाइल ब्रोमाइड (Methyl Bromide) हे कीटकनाशक या पिकावर फवारत असत. या वेळी असे लक्षात आले की हे कीटकनाशक, पृथ्वीच्या डोक्यावरचा ओझोनचा थर कमी करण्यास, आपल्या रेफ्रिजिरेटर किंवा एअर कंडीशनरमधील फ्रेऑन वायुसारखेच एक कारण आहे. त्यावेळचे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर डेव्हिस यांनी एक फर्मान काढून या कीटक नाशकाचा उपयोग 2005 मधे बंद केला.

पुढच्या एक दोन वर्षांत अर्थातच योग्य कीटकनाशक नसल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला. यामुळे कीटकनाशके बनविणार्‍या कंपन्यांनी मेथाइल आयोडाइड (Methyl Iodide) हे नवीन कीटकनाशक बाजारात आणले. व उत्पादकांनी ते वापरून बघितले व त्यांना उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे लक्षात आले.

strawberries

2007 मधे निरनिराळ्या महत्वाच्या विद्यापीठांच्यातून संशोधन करणारे रसायनतज्ञ व डॉक्टर्स यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांना एक पत्र लिहून मेथाइल आयोडाइडच्या अनियंत्रित वापरावर बंदी घालण्याची विनंती केली. या शास्त्रज्ञांच्या मते “हे कीटकनाशक जरी ओझोन थराला हानीकारक नसले तरी ते अतिशय तीव्र शक्तीचे कीटकनाशक आहे. ते फवारल्यानंतर त्या जमिनीतले सर्व जीव जंतू नष्ट होतात. एवढेच नव्हे तर् गर्भवती स्त्रिया, गर्भ, लहान मुले, म्हातारी माणसे, शेत मजूर या सर्वांवर या रसायनाच्या होणार्‍या परिणामांची आम्हाला काळजी वाटते.”

प्रयोगशाळांच्यामधे प्राण्यांच्यावर मेथाइल आयोडाइड वापरून केलेल्या प्रयोगांच्यात थायरॉइड ग्रंथी व मेंदूमधील पेशी यावर या रसायनाचे दुष्परिणाम झाल्याचे आढळून आले आहेत. इतकेच नव्हे तर यांचा परिणाम झालेल्या प्राण्यांच्यात गर्भपाताचे प्रमाणही लक्षणीय रित्या जास्त आहे. हे सर्व दुष्परिणाम लक्षात आल्यावर, कॅलिफोर्निया मधल्या बर्‍याच शेतकर्‍यांनी सेंद्रीय(Organic) कीटकनाशके वापरून स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यास सुरवात केली आहे.

organic-strawberry-field-300x225

सेंद्रीय शेती

पुढच्या वेळी कॅलिफोर्निया मधल्या स्ट्रॉबेरी खरेदी करायला जाल तेंव्हा त्यावरचे लेबल नीट वाचा. जर ते फळ सेंद्रीय (Organic) शेतीने उत्पादित असेल तरच घ्या अथवा Risk is all yours!

20 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “अमेरिकन स्ट्रॉबेरी

  1. I simply liked your Blog.
    How Much is straw berry production in India.As per you some recommendations to expand area of cultivation?Increase in production9Of course non hazardous chemical or say organic).

    Posted by Arvind Purandare | जुलै 22, 2009, 9:04 सकाळी
  2. wow i didn’t know this ! ata mi strawberries organic ch ghyavyat asa vichar kartiy!
    tumcha blog amazing ahe! khup awdla..

    Posted by bhagyashree | जुलै 29, 2009, 2:35 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: