.
ताज्या घडामोडी Current Affairs

विक्षिप्तपणाची कमाल


बाझिल देशाची राजधानी असलेले रिओ-डी-जानिरो हे जगातील एक अत्यंत सुंदर शहर म्हणून समजले जाते. या शहराच्या डाउनटाउन जवळ असलेला शहराचा एक जुना पण गजबजलेला भाग गेले दोन तीन महिने बघ्यांची गर्दी खेचत आहे. या भागातील एका जुन्या इमारतीकडे लांब अंतरावरून बघितले तर या इमारतीच्या एका बाजूचा छताजवळचा भाग लाल पिवळ्या रंगात रंगविलेला दिसतो. कुतुहुल वाटून तुम्ही या इमारतीच्या जवळ गेलात तरा या लाल पिवळ्या भिंतीवर, घरातले सर्व फर्निचर खिळे मारून पक्के बसवलेले दिसते. हा काय प्रकार आहे असे कोणालाही साहजिकच वाटेल.

primobros4

Photo API

या शहरात रहाणारा एक 27 वर्षाचा तरूण चित्रकार ‘टियागो प्रायमो’ व त्याचा 20 वर्षाचा भाऊ गॅब्रिएल या दोघांनी मिळून, जमिनीपासून 33 फूट (10 मीटर) उंचीवर असलेले, हे एक उभे (Vertical) कला प्रदर्शन निर्माण केले आहे. यात एक पलंग, एक हॅमॉक, सोफा, जेवणाचे टेबल, खुर्ची हे सर्व भिंतीला पक्के बसवले आहे. त्यांच्या या अजब घरात एक जुना फोनो व सजावटीसाठी एक फुलझाड व एक चित्रही त्यांनी लावले आहे.

primo bros2

Photo API

गंमतीची गोष्ट म्हणजे टियागो आणि गॅब्रिएल त्यांच्या या घरात रोज 12 ते 14 तास मे महिन्यापासून घालवत आहेत. त्यांच्या या घरात इकडून तिकडे जाण्यासाठी, रॉक क्लाइंबिंग करणार्‍या लोकांचे साहित्य व बूट, हे दोघे वापरतात. आणि शरीरधर्मांचे काय? त्यासाठी शेजारीच असलेल्या एका कला दालनातील सोईचा त्यांना वरच्या वरच वापर करता येतो. त्यांच्या या कलाकृतीने जाणार्‍या येणार्‍यांची बरीच करमणूक मात्र नक्की होते आहे. 20 ऑगस्ट पर्यंत तरी त्यांचे हे अजब कला दालन चालू राहील असे दिसते.

primo bros47971185

Photo API

हे असे कशासाठी केले आहे या प्रश्नाला उत्तर देताना टियागो म्हणतो की त्यांच्यातील सृजनशीलतेला वाव मिळेल अशी आडवी (Horizontal) जागाच न मिळाल्याने त्यांनी हे उभे प्रदर्शन निर्माण केले आहे.

असे हे कलाकार आणि अशी ही त्यांची सृजनशीलता!

10 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

नुकतीच प्रकाशित केलेली ब्लॉगपोस्ट्स

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 384 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

%d bloggers like this: