.
People व्यक्ती

मायकेल जॅक्सन-एक प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष बाप


मायकेल जॅक्सन हे नाव जरी घेतले तरी आपल्या डोळ्यासमोर उभा रहातो एक पॉप डान्सर व ब्रेक डान्सर. त्याची वेषभूषा, अंगविक्षेप, त्याने शल्यक्रियेने आणि ब्लीचिंगच्या द्वारे करून घेतलेले आपल्या शरीरावरचे बदल या सगळ्यामुळे आपल्या मनात त्याची एक विशिष्ट छबी निर्माण झालेली आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर झालेले आरोप व नंतर त्याच्यावरचा चाललेला खटला यामुळे त्याचे फॅन्स सोडले तर बहुतेकांचे त्याच्याबद्दलचे मत कलुषितच आहे.

US-MUSIC-ENTERTAINMENT-JACKSON-MEMORIALमाझे वडील जगातले बेस्ट वडील होते हे सांगताना रडू न आवरता येणारी पॅरिस

मेमोरिअल सर्व्हिस जुलै 7

मायकेलची तीन मुले आहेत. 12 वर्षाचा मायकेल जोसेफ ज्युनियर किंवा प्रिन्स मायकेल हा सर्वात मोठा आहे. त्याच्या पाठची पॅरिस मायकेल कॅथेरिन ही 11 वर्षाची आहे. सर्वात लहान 7 वर्षाचा प्रिन्स मायकेल दोन, ज्याला सर्व जण ब्लॅंकेट म्हणतात. त्याच्या सगळ्यात धाकट्या मुलाच्या जन्मानंतर बर्लिनमधल्या एका हॉटेलच्या बाल्कनीमधून मायकेलने त्याला लोंबकळत बाहेर धरून, प्रचंड संख्येने जमलेल्या, आपल्या फॅन्सना एक आश्चर्याचा धक्काच दिला होता. या थोड्याश्या विचित्र वागण्यानंतर मायकेलची मुले परत फारशी कोणालाच दिसली नाहीत. इतर प्रसिद्ध लोकांच्या मुलांप्रमाणे मायकेलच्या मुलांचे फोटो किंवा त्यांच्याबद्दल लेख हे कोणत्याही वार्ताहराला कधीच लिहिता आले नाहीत. या मुलांचे सर्व शिक्षण घरीच चालू आहे. मोठमोठ्या प्रासादांच्यात किंवा हॉटेलमधे रहाणारी ही मुले कधीच बाहेर दिसली नाहीत. अगदी नाइलाजच असेल त्या वेळी त्यांचे चेहेरे ओढणीने किंवा मुखवट्यांच्या सहाय्याने झाकूनच ही मुले बाहेर दिसली.

त्यांच्या रहाण्यासाठी 1988 मधे मायकेलने 30 मिलियन यू.एस.डॉलर्स खर्च करून नेव्हरलॅन्ड रॅन्च या नावाची इस्टेट खरेदी केली होती. या इस्टेटीमधे त्याने एक खाजगी अम्युझमेन्ट पार्कच उभारले होते. या पार्क मधे काय नव्हते असे विचारता येईल. फुलांचे बनवेलेले एक मोठे घड्याळ, प्राणी संग्रहालय, थीम पार्क आणि दोन आगगाड्यांचे पूर्ण मार्गही यात आखलेले होते. यातल्या एका मार्गावर तर बाष्पशक्तीचे चालणारे इंजिन आणि चार डबेही धावत असत. या शिवाय Ferris wheel, carousel, zipper, spider, sea dragon, wave swinger, super slide, dragon wagon, kiddies roller coaster आणि bumper cars सारख्या अम्युझमेन्ट पार्कच्या राइड्सही त्यात मायकेलने उभारल्या होत्या.

मायकेलच्या मृत्युनंतर, ज्यू रबाय असलेला त्याचा एक मित्र, ‘शमुले बोटीच’ (Rabbi Shmuley Boteach) याने प्रथमच मायकेल आणि त्याची मुले यांच्या संबंधी माहिती दिली आहे. तो म्हणतो की मायकेल आपल्या मुलांना जितके सामान्य माणसाचे जिणे जगणे शक्य होईल तेवढे जगू देण्याचा ( त्याच्या सुप्रसिद्धिमुळे) नेहमीच प्रयत्न करीत असे. त्याचे इतर आयुष्य कसेही असले तरी आपल्या मुलांचा बाप म्हणून त्याने त्यांच्यासाठी केलेले प्रयत्न प्रशंसनीयच होते. आपल्या मुलांनी योग्य मूल्ये अंगिकारली पाहिजेत याबाबत तो अतिशय आग्रही होता. ‘बोटीच’, आपल्या मुलांना नेव्हरलॅन्ड पार्क मधे, मायकेलच्या मुलांच्या बरोबर, काही वर्षांपूर्वी, खेळायला पाठवत असे. त्यावेळी त्याची मुले, अम्युझमेंट पार्कमधल्या राइड्ससाठी धावत व हट्ट करत. मायकेलच्या मुलांना अशी शिस्त होती की या गोष्टी वाढदिवसांसारख्या विशेष प्रसंगांसाठी आहेत. त्यामुळे ती यासाठी कधीच हट्ट करत नसत.

मायकेलचा एक जवळचा मित्र आणि सल्लागार डॉक्टर टोहमे टोहमे (Dr Tohme Tohme) म्हणतो की “मायकेलपेक्षा आधिक चांगला बाप मी तरी बघितला नाही. तो आपल्या मुलांचा बाप आणि आई दोन्ही होता. त्यांना स्नान घालणे, कपडे घालणे यासारखी कामे तो स्वत: करत असे. मला माझ्या मुलांसाठीसुद्धा त्याच्याइतके करता येईल की नाही या विषयी शंकाच वाटते.” या मुलांना नेहमी बघणार्‍यांचे पण असेच मत आहे की ही तीन्ही मुले हुशार, सगळ्या गोष्टींत भाग घेणारी आणि उत्तम वागणारी वाटतात. त्यांनी कुठेही गेले तरी काय खावे, एकटे भटकू नये यासाठी या मुलांच्याकडे लक्ष देणार्‍या नोकरमाणसांना संपूर्ण सूचना असतात. छायाचित्रकार इयॉन बर्कले म्हणतो की ही सर्व मुले अतिशय स्मार्ट, उत्तम वागणारी आणि छान आहेत. ती तुमच्यावर आपली मोठी छान, छाप टाकतात.

प्रसार माध्यमांनी निर्माण केलेली आपल्या मनातली छबी आणि प्रत्यक्षातला, एक बाप म्हणून जगणारा, मायकेल हा माणूस यात जमिन अस्मानाचाच फरक दिसतो. काहीही असले तरी हा बाप पण चार चौघा बापांसारखाच, आपल्या मुलांची काळजी करणारा होता यात शंकाच नाही.

7 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “मायकेल जॅक्सन-एक प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष बाप

  1. मायकलच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा पैलू कळाला.धन्यवाद.

    Posted by देवेंद्र चुरी | जुलै 7, 2009, 2:19 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: