ताज्या घडामोडी Current Affairs

लडाख मधील सूर्य-दर्श; Solar Telescope in Ladakh

लडाखच्या पूर्व भागात असलेले व एका प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील एक गाणे त्या ठिकाणी चित्रित केले गेले असल्यामुळे प्रसिद्धी मिळालेले, पॅनगॉन्ग सरोवर भारतातील एक अत्यंत निसर्गसुंदर असे स्थळ आहे. बर्फाच्छादित शिखरे असलेले सभोवतालचे डोंगर, त्यामध्ये असलेले या सरोवराचे निळेशार पाणी यामुळे येथे आलेला प्रत्येक पर्यटक अतिशय भारावून जातो. हे सरोवर 14270 फूट उंचीवर असून 134 किमी लांब व 5 किमी रूंद आहे. सध्याच्या परिस्थितीप्रमाणे हे सरोवर भारताच्या सीमेवर असून याचा 3/4 भाग चीनच्या ताब्यात आहे.

भारत सरकारच्या तंत्रज्ञान व शास्त्र विभागाने या सरोवराच्या काठावर असलेल्या ‘मेरक’ या खेड्याजवळ, 6 फूटापेक्षा सुद्धा मोठा व्यास(2 मीटर) असलेला एक सूर्य-दर्शक (Solar Telescope) बसवण्याचे ठरवले आहे. या ठिकाणी सूर्य प्रकाशाचे तास सर्वात जास्त आहेत व हवेत प्रदुषणाचे प्रमाण जवळ जवळ शून्य असल्याने या ठिकाणाची निवड करण्यात आली. येथे जवळ असलेल्या स्पॅन्गमिक सारख्या एक दोन खेड्यांत अगदी तुरळक वस्ती आहे व पश्मिना लोकर देणार्‍या मेंढ्यांचे पालन व पर्यटन या शिवाय या भागात उपजीविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने या प्रकल्पाने स्थानिक लोकांना काम धंदाही मिळू शकेल.

 

सूर्यावरील आणिक प्रक्रियेने तेथे सतत बदल होत असतात. यात सूर्य अग्नीज्वाला (Solar flairs) व सूर्यावरील काळे ठिपके (Dark spots) यांचा समावेश आहे. सूर्यावरील या बदलामुळे. पृथ्वीवर मोठी चुंबकीय वादळे येतात तर सूर्याकडून अवकाशात अतिसूक्ष्मकणांचा जो भडिमार (Solar Wind) होत राहतो त्यामुळे अवकाशातील उपग्रहांना मोठा धोका असतो. या साठी जगात अनेक ठिकाणी असे सूर्य-दर्शक(Solar telescope) बसवलेले आहेत. या मध्ये स्पेन मधील ला-पालमा बेटावरील 1 मीटर व्यासाचा स्वीडिश सूर्य-दर्शक व अमेरिकेतील ऍरिझोना राज्यातील मॅकमथ-पिअर्स हा 1.6 मीटर व्यासाचा सूर्य-दर्शक हे सर्वात मोठे समजले जातात. भारतातील हा सूर्य-दर्शक तयार झाल्यावर जगातील सर्वात मोठा सूर्य-दर्शक होईल.
स्वीडिश 1 मी. व्यासाचा सूर्य-दर्श
सूर्य-दर्शकांच्या बांधणीत दोन मुख्य अडचणी येतात. एक म्हणजे या सूर्य-दर्शकाच्या आवरणाच्या बाहेरची जमीन तापल्याने जमिनीलगतच्या हवेत छोटे प्रवाह निर्माण होतात. अशा प्रवाहांच्यामुळे या दर्शकांच्या रेझोल्यूशन वर परिणाम होतो. या साठी असे दर्शक एक मोठा मनोरा बांधून त्यात बसवले जातात. दुसरी अडचण या दर्शकाच्या नळीच्या आतील हवा तापल्यामुळे येते. या साठी अशा दर्शकांत हवा थंड करण्याची यंत्रणा बसवावी लागते. लडाखमध्ये अतिशय विषम हवामान असल्याने अशी यंत्रणा लागेलच.
हा सूर्य-दर्शक पॅनगॉन्ग सरोवराजवळ बसवण्याची कल्पना अतिशय उत्तम आहे हे त्या ठिकाणाला भेट देऊन आलेला कोणीही पर्यटक लगेच सांगू शकेल. या ठिकाणी असलेली अतिशय स्वच्छ हवा आणि आकाश अभ्राच्छादित अतिशय क्वचितच असणे या गोष्टींमुळे जागेची ही निवड अतिशय योग्य आहे यात शंकाच नाही.
हानले, लडाख येथील दूरादर्श
लडाखच्या चांगथांग भागातील स्कार्चू नदीजवळ असलेल्या हानले या गावाजवळ एक मोठा दूरादर्श उभारण्यात आलेलाच आहे. त्याच्या जोडीला हा सूर्य-दर्श बसवण्यात येणार आहे.
8 जानेवारी 2012

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog Stats

  • 137,379 hits

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 85 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected
Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 85 other followers