पिंजर्‍यातील मनोरुग्ण

मलेशिया देशाची राजधानी ‘कुआला लुम्पुर’च्या उत्तरेला एक ते दीड तासाच्या मोटरने केलेल्या प्रवासानंतर, टेकड्यांच्या मधे वसलेले ‘कुआला कुबु बारू’ हे गाव लागते. अतिशय निसर्गरम्य असलेल्या या गावात 1984 मधे मधे मलेशियन सरकारच्या जनकल्याण विभागाने, ‘तामन सिनार हरापान’ या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेमधे सुमारे 400 अतिशय मतिमंद मुलांची काळजी घेण्यासाठी सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. 25 वर्षांपर्यंतची मुले व तरूण मानसिक रुग्ण या संस्थेत रोगी म्हणून दाखल करून घेतले जातात.

खूप इम्प्रेस झालात ना? पण सत्य काही वेगळेच आहे. एका खाजगी वर्तमानपत्राच्या वार्ताहरांच्या एका पथकाने, त्यांना काही कुणकुण लागल्याने, नुकतीच या मतिमंद मुलांच्या संस्थेला भेट दिली. संस्थेच्या काही कुलुपबंद खोल्यांमधे त्याना लोखंडी पिंजर्‍यांमधे लोखंडी साखळ्यानी जेरबंद केलेले काही मनोरुग्ण तरूण आढळले. हे तरूण पूर्णपणे नग्नावस्थेत होते व त्यांचे सर्व आंग त्यांच्याच मलमूत्राने माखलेले होते. सर्व मनोरुग्ण, पाप्याची पितरे दिसत होते. विश्वास नाही ना बसत! हा फोटो बघा.

humans or monkeys photo star/asia

जे मनोरुग्ण पिंजर्‍यांत नव्हते त्यांना लोखंडी कॉट्सना लोखंडी साखळ्यांनी बांधून ठेवण्यात आले होते. कॉट्सवर गाद्या उशा वगैरे काहीच नव्हते. त्या मनोरुग्णांनी आत्महत्येचा प्रयत्न करू नये म्हणून म्हणे ही काळजी घेण्यात आली होती. याच कारणासाठी त्यांना कपडे पण देण्यात आले नव्हते. सर्व नग्नावस्थेतच होते. मला तर वाटते की या परिस्थितीत असलेला एखादा शहाणा सुरता सुद्धा आत्महत्याच् करायला प्रवृत्त होईल.

मनोरुग्णांची काळजी घेण्याची ही पद्धत किती भयानक आणि क्रूर आहे. तुम्हाला नाही वाटत?

6 जुलै 2009

Explore posts in the same categories: ताज्या घडामोडी Current Affairs

Tags: , , , , ,

You can comment below, or link to this permanent URL from your own site.

2 Comments on “पिंजर्‍यातील मनोरुग्ण”

  1. sachin Says:

    he khoopach ghrunaspad aahe, aani manavi hakkanchi paaymalli karanar aahe. pan aapalyahi deshat phaar vegali paristithi aahe ashatali gosht nahi. don varshapoorvi mi gujaratmadheel custodial institutes madheel quality of care yaa vishayavar abhyas kela hota. tithe sakhalyani bandhun jari thevat nasale tari atishay bhayanak stithi hoti. angavar neet kapade nahit, payjama aahe, tar tyala nadi det nahit..ka tar mhane tyane galphas ghetil. gadya nahit, angavar ghyayala purese pangharun nahi, jyanchyajaval nadi aahe, tyani swatajaval je kaahi asel te tyala gathi bandhun gaalyat latkaval aahe. santhechya aavarat bhayanak khurati jhade majaleli. junaat, damat britishkalin imarati…unch-uncha bhinti! bahercya jagashi sampark hou dyayachaa nahi ha prashasanacha prayatn.
    sagalikade “over-crowding” ha motha issue aahe. 100 capacity asanarya sansthet 400 lok.
    sarsakat sagalyana ekadatari ECT treatment. ajunparyant kahi thikani direct ECT dila jaat hota…1912 lunacy act badalala…pan practices ajunahi baba aadamchya jmanyatalya aahet.

  2. inkblacknight Says:

    म्नोरुगणाना अशा हिंस्त्र प्रकारे दिलेली वागणूक पाहून अंगावर शहारे आले …

    http://asachkahitari.wordpress.com/


Comment: