अक्षरधूळ कॅलिडिओस्कोप

अक्षरधूळ मध्ये काय वाचाल?

या महिन्याचे छायाचित्र

प्तमातृका, परिहार काल 9वे शतक, राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली.


भटकंती

 

लडाख डायरी

लेह, नुब्रा व्हॅली, श्योक व्हॅली, पॅन्गॉन्ग लेक  प्रवास वर्णनाची 7 भागातील मालिका
 

नाणे घाट

इ.स.पूर्व दुसर्‍या शतकात महाराष्ट्रावर राज्य करणार्‍यासातवाहन राजवंशाच्या पाऊलखुणांचा मागोवा घेणारी 3 भागांची मालिका
 

मलाका स्पाईस

मलेशियाच्या पश्चिम किनार्‍यावर असलेले एक सुंदर शहर (3 भागांची मालिका)

अक्षरधूळ हॉट पोस्ट

पदपथावरची साहसे 

Quantcast
  रोज सकाळी फिरायला जाताना, प्रथम काही अंतर, मला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पदपथावरून चालावे लागते. हा पदपथ म्हणजे एक संशोधनाचा विषय होऊ शकेल इतका रोचक आहे. या पदपथाचा रस्त्याच्या बाजूला असलेला जो हिस्सा आहे तो बहुतेक ठिकाणी मोकळा आहे परंतु या मोकळ्या भागाला सायकल मार्ग असे नाव दिलेले असल्याने एखादी सायकल जर कोणा धाडसी युवकाने येथून चालवण्याचे ठरवले तर तुम्ही त्या सायकलच्या मार्गाच्या मधे येऊ शकता. आता या पदपथाचा जो उर्वरित हिस्सा आहे त्यावर अनेक वेडी वाकडी झाडे वाढलेली असल्याने कपाळमोक्ष होणार नाही या पद्धतीनेच चालावे लागते. दोन वर्षांपूर्वी एकमेकात अडकवलेल्या कॉंक्रीट ब्लॉक्सनी हा संपूर्ण पदपथ (सायकल मार्ग व पादचारी मार्ग) मढवला गेला होता. परंतु थोड्याच दिवसात हे ब्लॉक उखडून टाकून तेथे एक मोठी पाईप लाईन पुरली गेली. ती पुरल्यावर वरच्या भागात परत हे कॉंक्रीट ब्लॉक्स होते तसे बसवण्याची काळजी कोणी न घेतल्याने, तेथील जमीन तशीच उघडी पडून राहिली आहे. सर्वच पदपथ इतका ऊंच-सखल आणि वेडा वाकडा आहे की डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. या शिवाय खणलेल्या मातीच्या व कामासाठी आणलेल्या वाळूच्या, मधून मधून ठेवलेल्या ढिगांनीही बरीच जागा व्यापलेली आहे. बरीच मंडळी या कारणांमुळे पदपथावरून न चालता रस्त्यावरूनच चालतात.

अक्षरधूळ शो केस

इंग्लिश, हिंग्लिश आणि मंग्लिशQuantcast

आंतरजालावर सध्या गाजत असलेल्या ‘कोलवेरी डी’ या गाण्याबद्दल बोलताना या गाण्याचे गायक धानुष यांनी हे गाणे टंग्लिश या भाषेत असल्याचे सांगितले आहे. टंग्लिश ही कोणती भाषा? याचा खुलासा करताना, तमिळ ढंगाने उच्चारलेले इंग्रजी शब्द या गाण्यात असल्याने या गाण्याची भाषा टंग्लिश आहे असे आपण म्हणतो आहोत असे त्यांनी सांगितले आहे. तसे बघायला गेले तर जगातल्या ज्या ज्या देशात इंग्रजी भाषा बोलली जाते त्या सर्व देशात (अर्थातच इंग्लंड हा देश सोडून) त्या देशाची खास इंग्लिश भाषा तयार झालेली आहे. अगदी अमेरिकेतील अमेरिकन इंग्लिश पासून सिंगापूर मधील सिंग्लिश, चिनी लोक बोलतात किंवा ज्या भाषेत ते इंग्रजीचे खून पाडतात ती चिंग्लिश अशा अनेक इंग्रजी आहेत. इंग्लंडचे घट्ट शेजारी असलेले आयर्लंड किंवा स्कॉटलंड हे देशही त्यांची स्वत:ची इंग्रजी भाषा बोलत असतात.

Read more of this post

कचर्‍याचे बेट ‘थायफुशि’

Quantcast
रोज सकाळच्या माझ्या फिरण्याच्या मार्गावर, मध्यवर्ती सरकारच्या एका संस्थेच्या कर्मचार्‍यांसाठी बांधलेली एक निवासी वसाहत आहे. या वसाहतीत आठ ते दहा निवासी संकुले आहेत व या संकुलांमध्ये व चारी बाजूंना, मोकळी जागा सोडलेली आहे. या वसाहतीचे कुंपण म्हणून एक सहा फूट तरी ऊंच अशी एक भिंत बांधलेली आहे. त्यामुळे रस्त्यावरून आत काय चालले आहे हे कळत नाही. परवाच्या दिवशी काही बांधकाम किंवा दुरुस्ती यासाठी या भिंतीचा काही भाग पाडण्यात आलेला आहे हे मला दिसले. सहज आत नजर टाकली असता आश्चर्याने थक्क होण्याची माझ्यावर पाळी आली. या कुंपणाच्या आतल्या बाजूस भिंतीला लागून एक कचरा पेटी ठेवलेली असावी. या कचरा पेटीचा कोठे मागमूसही दिसणार नाही एवढा प्रचंड कचर्‍याचा ढीग तेथे साठलेला दिसला. प्लॅस्टिकचे डबेडुबे यापासून ते फेकून दिलेल्या खाद्यपदार्थांपर्यंत सर्व काही त्या कचर्‍यात होते. या शासकीय वसाहतीत अनारोग्य व रोगराई निर्माण करण्याचा एवढा मोठा स्त्रोत रस्त्याला लागूनच आहे व त्याबद्दल या वसाहतीतील लोक काहीही करत नाहीयेत हे बघून मी थक्क झालो व वाईटही वाटले. ही शासकीय वसाहत व पुणे महानगरपालिका यांच्यात नक्की काहीतरी वादविवाद चालू असावा व परिणामी हा कचर्‍याचा ढीग साठत असावा हे माझ्या लक्षात आले.

Read more of this post

64, गोवर्धन धाम कॉलनी

Quantcast

मध्य प्रदेशातल्या उज्जैन या शहरात गोवर्धन धाम कॉलनी म्हणून एक वसाहत आहे. शहर सुधारणेचा एक भाग म्हणून ही व या पद्धतीच्या इतर काही कॉलनी इथल्या नगरपालिकेने विकसित केल्याचे शहर सुधारणा योजनेच्या परिपत्रकात म्हटलेले आहे. या कॉलनी मध्ये चांगली टुमदार घरे आहेत व घरांच्या एकूण रचनेवरून सुखवस्तू मंडळी येथे रहात असावीत अशीच कोणाचेही कल्पना व्हावी. या गोवर्धन धाम कॉलनीमधल्या काही रहिवाशांना दोन दिवसापूर्वी अचानक धनलाभ झाला. निदान थोड्या कालासाठी तरी त्यांना तसे भासले. त्यांच्या शेजारच्या एका घराच्या गच्चीतून त्यांच्या घरावर आणि घराच्या गच्चीवर अचानक नोटांची बंडले आणि इतर दागदागिने यांचा वर्षाव शेजारच्या एका घरातून सुरू झाला

Read more of this post

मारिओ मिरांडा – (Mario Miranda- An obituary)

Quantcast
1970 च्या दशकातील काही वर्षे मी मुंबईला नोकरी करत असे. अंधेरीला राहून रोज सकाळी लोकल ट्रेन पकडायची. मुंबईच्या प्रसिद्ध डबेवाल्यांमार्फत आलेला डबा लंच टाईम मधे खायचा व संध्याकाळी परत एकदा लोकल ट्रेनमधला गर्दीचा प्रवास करायचा असा माझा मुंबईच्या इतर हजारो किंवा लाखो चाकरमान्यांसारखा दिनक्रम असे. त्या वेळी करमणुकीची काही फारशी साधनेच उपलब्ध नव्हती. सिनेमा म्हणजे बहुधा हिंदी सिनेमे, ते सुद्धा ठराविक ठशाचे, हिरो, हिरॉइन, खलनायक, गाणी शेवटी ठिश्यां ठिश्यां! आणि गोड अखेर, या धर्तीचे! मासिके सुद्धा फारशी नसत. आणि जी काय मिळत त्यांची छपाई तितपतच असे. याच काळात नंतर इंदिरा गांधीनी आणीबाणी लागू केली. सर्वसामान्य माणसाचे जीवन आणखीनच नीरस व कळाहीन बनले.

Read more of this post

 

विशेष सदरे

काकु’ ज किचन

 माझ्या आईच्या कविता 

 माझी ई-पुस्तके

घडा भाजी

मूळ वैदर्भीय ओरिजिनची

मसालेदार भाजी

पुढे वाचा

आईचा जीव

चिमण्याला मी सोडून आले

आज किती हो दुरी

मन वेडे माझे जाई माघारीं

हात चिमुकला हालवुनी

मज निरोप देई मुदें

परि व्यथित होई मी त्या आनंदे

पुढे वाचा

 पुढे वाचा

अक्षरधूळ शो केस

विश्वासघात- 1

एक भारतीय नागरिक म्हणून तुमच्या आयुष्यात आलेला सर्वात अपमानास्पद व लाजिरवाणा प्रसंग कोणता? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर निर्विवादपणे मी 1962 च्या युद्धात चीनने भारताचा केलेला सपशेल व दारूण पराभव हेच उत्तर देईन. माझी खात्री आहे की माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा मोठे असे सर्व ज्येष्ठ नागरिक सुद्धा हेच उत्तर देतील. एखाद्या फुग्याला टाचणी लावावी तसे काहीसे चीनने आम्हा भारतियांच्या स्वाभिमानाला व अस्मितेला केले होते.

पळा पळा कोण पुढे पळे तो! -1

1962 मधे झालेल्या चींन बरोबरच्या लढाईत, भारताचा जो दारूण आणि सपशेल पराभव झाला त्याची पार्श्वभूमी व पूर्व लडाखमधला घटनाक्रम, आपण मागे बघितला आहे. परंतु हे युद्ध प्रत्यक्षात दोन आघाड्यांच्यावर लढले गेले होते. लडाखबरोबरच भारताच्या ईशान्य कोपर्‍यातल्या अरुणाचल प्रदेश या राज्याच्या सीमेवर या युद्धाची दुसरी व अतिशय महत्वाची आघाडी होती.

पेशव्यांचा गणेशोत्सवQuantcast

पेशवेकालीन पुण्यात साजर्‍या केल्या जाणार्‍या सार्वजनिक उत्सवांत, तीन प्रमुख असत, दसर्‍याचे सीमोल्लंघन, गणेशोत्सव आणि होळी. हे तिन्ही उत्सव अतिशय भव्य प्रमाणात आणि मोठ्या उल्हासाने साजरे केले जात. या उत्सवांचा सर्व खर्च पेशव्यांचा दरबारातून होत असे. या वेळी होणार्‍या कार्यक्रमांच्यात खेळ आणि करमणूकीचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असत.

यू- ट्यूब

माझ्या यू ट्यूब चॅनेल वरील व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा.

फ्लिकर

A karakoram peak
माझ्या फोटो गॅलरीवरचे फोटो बघण्यासाठी क्लिक करा

 

 

चर्चा

5 प्रतिसाद to “अक्षरधूळ कॅलिडिओस्कोप”

  1. sir new face of your blog is attractive keep it up

    Posted by anil | ऑक्टोबर 3, 2011, 6:16 pm
  2. कर्वे यांच्यावरचा लघुपट आवडला. धन्यवाद.

    Posted by anil manavi | ऑक्टोबर 4, 2011, 9:22 pm
    • अनिल मानवी-
      हा लघुपट दुर्मिळ व महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे असे मला वाटते.

      Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 5, 2011, 7:48 सकाळी
  3. तीन सफरचंद
    तीन सफरचंदांचा मानवाच्या जडनघडीतील वाटा फार मार्मिक वाटला. पहिल्याची खास माहिती नव्हती. परंतु संबंधित दोघे महामानव होते त्यांचा विसर जगाला कधीच पडणार नाही.

    भारतात सफरचंद काश्मीरमध्ये होतात.ते काश्मीरच सफरचंद आजही लटकतच आहे. हे सर्व भारतीयांच चौथ सफरचंद त्यांनचच असून त्याना त्याची गोडी ख~या अर्थानी कधी चाखायला मिळणार?

    APPLE BITE मन विषण्ण करत.

    उदय फणसे.

    Posted by Uday Phanse. | ऑक्टोबर 18, 2011, 7:07 सकाळी
    • उदय फणसे -

      प्रतिसादाबद्दल धन्यवाद -

      40/50 वर्षांपूर्वी भारतात सफरचंदे फक्त कश्मिर मधेच होत असत. ही फळे आकाराला मध्यम असून चवीला अतिशय छान असतात. त्या नंतर हिमाचल प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणात सफरचंदांची लागवड झाली व कश्मित मधल्या अस्थिर वातावरणामुळे तेथील कमी माल भारतीय बाजारपेठात येऊ लागला. परिस्थिती सुधारली तर आपल्याला परत एकदा कश्मिरी सफरचंदे खाण्य़ासाठी मिळू शकतील.

      Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 18, 2011, 7:37 सकाळी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 95 other followers